भारतात साऊथ इंडिअन खाद्यपदार्थांमधील डोसा खूपच लोकप्रिय आहे. तव्यावर खरपूस भाजलेल्या कुरकुरीत डोसाच्या एक तुकडा मस्त चटणी किंवा सांबरमध्ये बूडवून खाणं हे स्वर्गसुखापेक्षा नक्कीच कमी नाही. म्हणूनच भारतातच नाही तर जगभरात डोसा रेसिपी हा प्रकार अप्रतिम खाद्यपदार्थांच्या यादीत टॉप लिस्टमध्ये आहे. एवढंच नाही तर डोशाचे निरनिराळे प्रकार लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे एकाच प्रकारच्या बॅटरपासून तुम्ही डोशाचे विविध प्रकार तयार करू शकता. त्याचप्रमाणे डोसा तुम्ही विविध प्रकारच्या चटण्या आणि सांबरसोबत खाऊ शकता.
डोसा तयार करायचा म्हटलं की आपल्याला त्यासाठी डाळ, तांदूळ भिजत घालून त्याचे पीठ तयार करावे लागते. हे पीठ आपल्याला आंबवून घ्यावे लागते. डोशाचे पीठ तयार करणेच काहींना नीट जमत नाही. डाळ, तांदुळाचे प्रमाण बिघडले की डोसा हवा तसा खरपूस बनत नाही. डोसा बनवायचा म्हटलं की त्याचे पीठ तयार करण्यापासून जय्यत तयारी करावी लागते. डोसा बॅटर व्यवस्थित आंबून तयार झाले तर डोसे चवीला छान लागतात. याउलट डोसा बॅटर बनवताना काही चुका झाल्या की डोशांच सगळं गणितचं फसत. परंतु आता काही केल्या डोसा बनवताना फसणार नाही, इतकेच काय तर मस्त उडप्यासारखा कुरकुरीत होईल. फक्त डोसा परफेक्ट कुरकुरीत होण्यासाठी त्यात आपल्या स्वयंपाक घरातला एक रोजचाच पदार्थ मिसळायचा आहे. कोणता आहे तो खास पदार्थ पाहूयात(how to make udupi style crispy dosa at home).
साहित्य :-
१. तांदूळ - ३ कप २. पांढरी उडीद डाळ - १ कप ३. पोहे - १ कप ४. मेथी दाणे - १ टेबलस्पून ५. पाणी - गरजेनुसार६. मीठ - चवीनुसार ७. साखर - १ टेबलस्पून ८. बेसन - २ टेबलस्पून
इडली -डोशाचे पीठ छान आंबावे म्हणून त्यात सोडा घालता? तज्ज्ञ सांगतात, ते तातडीने बंद करा कारण...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये तांदूळ, पांढरी उडीद डाळ घेऊन ते दोन्ही जिन्नस पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर त्यात पोहे, चमचाभर मेथी दाणे घालावेत. या सगळ्या मिश्रणात आता गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. आता हे मिश्रण किमान ७ ते ८ तासांसाठी तसेच पाण्यांत भिजत ठेवावे. ७ ते ८ तास सगळे जिन्नस व्यवस्थित पाण्यात भिजून फुलून आल्यानंतर त्यातील पाणी पाणी संपूर्णपणे काढून घेऊन हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यावे.
२. हे डोशाचे मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्यानंतर ते एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावे. हे मिश्रण एका भांड्यात काढून घेतल्यानंतर हातांच्या मदतीने ४ ते ५ मिनिटे चांगले फेटून घ्यावे. (पीठ हातांच्या मदतीने ढवळत असताना ते केवळ एकाच बाजूने फिरवावे) त्यानंतर या तयार पिठावर हवाबंद झाकण न ठेवता, पिठाच्या भांड्यात हलकेच हवा खेळती राहील असे झाकण अलगद ठेवावे. (यामुळे पिठाच्या भांड्यात नैसर्गिक हवा खेळती राहते तसेच बाहेरचा उबदारपणा देखील आपोआप पिठाला मिळतो, यामुळे पीठ नैसर्गिकरित्या फुलून येते.) आपण हे इडली, डोशाचे पीठ तयार होताना ते हवाबंद डब्यांत ठेवतो हीच आपली सर्वात मोठी चूक आहे.
काही केल्या इडल्या फुगून येत नाहीत ? वापरा झटपट सोप्या टिप्स... इडली फुगेल पुरीसारखी टम्म...
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत...
३. आता या तयार पिठातील थोडेसे पीठ एका वेगळ्या बाऊलमध्ये घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालावी. मग चमच्याच्या मदतीने पीठ व्यवस्थित ढवळून घ्यावे. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे, या पिठाचे डोसे करण्याआधी ते कुरकुरीत होण्यासाठी त्यात २ चमचे बेसन घालून पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. (डोशाच्या पिठात बेसन घातल्याने डोसा अजिबात मऊ न पडता एकदम कुरकुरीत होतो.त्यामुळे डोसा तयार करताना त्याच्या पिठात बेसन घालायला विसरू नये.)
४. आता गॅसच्या मंद आचेवर एक पॅन गरम करत ठेवावा. पण मध्यम गरम झाल्यावर त्यावर थोडेसे तेल सोडून डोशाचे बॅटर चमच्याने गोलाकार आकारात पसरवून घ्यावे. परत डोशाच्या चारही बाजुंनी तेल सोडून डोसा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा. डोश्याला खरपूस सोनेरी रंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत डोसा पॅनमध्ये भाजून घ्यावा.
आता हा गरमागरम खरपूस डोसा चटणी आणि सांबारसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.