Lokmat Sakhi >Food > उकडीच्या मोदकाची पारी फाटते-सारण बाहेर येतं? ५ टिप्स-सुबक, कळीदार-स्वादीष्ट मोदक होतील

उकडीच्या मोदकाची पारी फाटते-सारण बाहेर येतं? ५ टिप्स-सुबक, कळीदार-स्वादीष्ट मोदक होतील

Ganesh Chaturthi Special How to make Ukadiche Modak : मोदक करायचे म्हटले की तांदूळाची उकड काढण्यापासून मोदकाला आकार देईपर्यंत सर्व स्टेप्स परफेक्ट जमाव्या लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 06:17 PM2024-09-05T18:17:16+5:302024-09-06T15:37:11+5:30

Ganesh Chaturthi Special How to make Ukadiche Modak : मोदक करायचे म्हटले की तांदूळाची उकड काढण्यापासून मोदकाला आकार देईपर्यंत सर्व स्टेप्स परफेक्ट जमाव्या लागतात.

How to make Ukadiche Modak : 5 Tips To Make Perfect Soft Ukdiche Modak Steam Modak Recipe | उकडीच्या मोदकाची पारी फाटते-सारण बाहेर येतं? ५ टिप्स-सुबक, कळीदार-स्वादीष्ट मोदक होतील

उकडीच्या मोदकाची पारी फाटते-सारण बाहेर येतं? ५ टिप्स-सुबक, कळीदार-स्वादीष्ट मोदक होतील

गणेशोत्सवात (Ganesh Chaturthi) उकडीचे मोदक आवडीने खाल्ले जातात. उकडीचे मोदक हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी महत्वाचा मानला जातो. मोदकांशिवाय गणेश चतुर्थीचा सण अपूर्ण आहे. गणपती बाप्पांचे आवडते उकडीचे मोदक करणं काही सोपं  नाही. (Easy Way To Make Ukdiche Modak) हे मोदक करायचे म्हटले की तांदूळाची उकड काढण्यापासून मोदकाला आकार देईपर्यंत सर्व स्टेप्स परफेक्ट जमाव्या लागतात. उकडीचे मोदक फुटू नयेत, सारण पातळ होऊ नये यासाठी काही खास टिप्स पाहूया. ( 5 Tips To Make Perfect Soft Ukdiche Modak Steam Modak Recipe)

उकडीचे  मोदक परफेक्ट होण्यासाठी खास टिप्स

१) मोदकाचे सारण करताना गूळ आणि नारळात थोडा खवा घातला तर त्याची चव अधिक चांगली  लागते. मोदकांचं सारण तयार करण्यासाठी ओला नारळ एकसारखा खोवायला हवा. नारळ पांढराशुभ्र असेल तर सारण उत्तम बनतं. गूळ जास्त चिकट किंवा कडक असू नये अन्यथा सारण फसू शकतं. लालसर गूळ निवडावा. गुळाची निवड करताना योग्य काळजी घ्या.

२) उकडीचे मोदक करताना शक्यतो आंबेमोहोर तांदूळांचा वापर करा. जाड तांदूळ वापरू नका.  जेणेकरून मोदक चिकट होणार नाही. हळदीच्या पानांमध्ये मोदक उकडवल्यास त्याची चव चांगली लागते. मोदकपात्र कमीत कमी ५ मिनिटं आधी ठेवून गॅसवर पाणी गरम करत ठेवा.

वाटीभर गव्हाच्या पिठाची करा खुसखुशीत चकली; मऊ पडणार नाही की कडकही होणार नाही

३) मोदकपात्रात मोदक घालण्याआधी त्यावर केळीचे पाणी घालून तेल लावून मग मोदक आत ठेवावेत.  असं केल्यानं मोदक चिकटत नाही. केळीच्या पानांचा सुगंधही त्याचा येतो. मोदक ठेवताना जास्त एकमेकांना चिकटवून ठेवू नका. खाताना मोदक घशाला चिकटणार नाही याची काळजी घ्या.

४) मोदक करताना अनेकदा कळ्या व्यवस्थित पडत नाहीत. उकडीच्या मोदकाला चमच्याने सोप्या पद्धतीने कळ्या पाडू शकता. त्यासाठी तुम्हाला छोट्या चमच्याची मदत लागेल. उकडलेल्या  तांदूळाच्या पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घ्या. हरितालिकेच्या उपवासाचे ५ नियम; हरितालिकेला काय करावे, काय करू नये पाहा- उपवास फळेल

५) हाताला तेल लावून हातानं थोडं पीठ काढून पुरीसारखा खोल आकार बनवा. या पुरीत मोदकाचं सारण भरा त्यानंतर पुरी सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करा आणि मोदकाचा आकार द्या. नंतर  हे मोदक चाळणीवर ठेवून १५ मिनिटं वाफवून घ्या. 

Web Title: How to make Ukadiche Modak : 5 Tips To Make Perfect Soft Ukdiche Modak Steam Modak Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.