Join us  

नवरात्र स्पेशल : साबुदाणा व भगर वापरून चटकन बनवा उपवासाचा डोसा, खायला कुरकुरीत, बनवायला सोपा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 3:58 PM

Navratra Special : Instant Dosa for Fast : नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणाऱ्यांना काय खावे असा प्रश्न पडतो, अशावेळी एक झटपट होणारा सोपा पर्याय...

नवरात्र म्हटलं की आपल्यापैकी बरेचजण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. नऊ दिवस उपवास करायचा म्हटल्यावर नेमकं उपवासाला खायचं काय असा पहिला प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो. सलग नऊ दिवस उपवास करायचा म्हटलं की उपवासाचे तेच ते ठरलेले (Recipe to Make in Fast) मोजकेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी या नऊ दिवसांत काहीतरी वेगळे खावेसे वाटते. उपवासाचे काही मोजकेच पदार्थ आपण वापरुन झटपट होणारे उपवासाचे नवीन पदार्थ तयार करु शकतो(Upvasacha Dosa).

'डोसा' हा असा पदार्थ आहे की जो आपण कधीही (farali dosa) खाऊ शकतो. डोसा हा नाश्त्याला किंवा जेवणाला अशा दोन्ही वेळा खाऊ शकतो. यासोबतच उपवासाला आपण साबुदाणा खिचडी किंवा वडा असेच रोजचे पदार्थ खातो. परंतु आपल्याला या नऊ दिवसांत काहीतरी वेगळे खावेसे वाटते. डोसा (instant farali dosa recipe crispy and tasty) हा आपण एरवी नाश्त्याला तर खातोच. पण उपवासाच्या वेळी डोसा (upvasache dose & upvas green chutney) खायची इच्छा झालीच तर आपण चटकन साबुदाणा व भगर याच्या पिठाचा डोसा बनवून खाऊ शकतो. झटपट होणाऱ्या या उपवासाच्या डोस्याची सोपी कृती पाहूयात(How to make Upvasacha Dosa).  

साहित्य :- 

१. साबुदाणा - १ कप २. भगर - १ कप ३. बटाटा - १ (कच्चा बटाटा लहान तुकड्यात कापून घेतलेला)४. दही - १/४ कप ५. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)६. आलं - १ टेबलस्पून (किसून घेतलेलं)७. जिरं - १ टेबलस्पून ८. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)९. मीठ - चवीनुसार१०. पाणी - गरजेनुसार

गाजर न किसता अगदी १० मिनिटांत करा टेस्टी झटपट गाजर हलवा, जिभेवर ठेवताच अलगद विरघळेल असा स्वाद...

कृती :- 

१. सर्वात आधी एका कढईमध्ये साबुदाणे घेऊन ते कोरडे भाजून घ्यावेत. २. हे कोरडे भाजून घेतलेले साबुदाणे थोडे थंड होण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घ्यावेत. ३. साबुदाणे थंड झाल्यावर त्यात भगर व कच्च्या बटाट्याचे तुकडे घालावेत. 

नवरात्र स्पेशल : साबुदाण्याची खिचडी - वडे नकोसे वाटतात ? ट्राय करा उपवासाची मऊ, जाळीदार इडली, झटपट रेसिपी...

उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...

४. आता या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून घ्यावे व त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून पेस्ट होईपर्यंत बारीक वाटून घ्यावे. ५. हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले बॅटर एक बाऊलमध्ये काढून त्यात दही, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं, जिरं, चिरलेली कोथिंबीर, गरजेनुसार मीठ व पाणी घालून घ्यावे. ६. हे बॅटर किंचित पातळ करून घ्यावे. १५ ते २० मिनिटे हे बॅटर तसेच झाकून ठेवावे. ७. त्यानंतर पॅनला तेल लावून व्यवस्थित गरम झाल्यावर हे बॅटर तव्यावर सोडून डोसे तयार करुन घ्यावेत. 

चटणीची कृती :- 

१. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, जिरं, हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं, भाजलेले शेंगदाणे, मीठ व गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. २ ते ३ मिनिटे मिक्सर फिरवून चटणी तयार करून घ्यावी. 

आपले उपवासाचे गरम डोसे खाण्यासाठी तयार आहेत. हे डोसे चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023अन्नपाककृती