वडापाव आणि सँडविच हे भारतीयांचे दोन्ही आवडीचे पदार्थ आहे . वडापाव व सँडविच हे रस्त्याच्या कडेला असलेल्या ठेल्यांवर लगेच मिळतात. वडापाव आणि सँडविच हे दोन्ही पदार्थ स्ट्रीट फूड म्हणून खूपच लोकप्रिय आहे. सँडविच व वडापाव हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच आवडीचे पदार्थ आहे. दोन ब्रेड स्लाईसच्या मधोमध वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या भरून ते सँडविच खाण्याची मज्जा काही औरच असते. गरमागरम वडा चटणी लावलेल्या पावामध्ये भरून खाणे म्हणजे स्वर्गसुखच असते.
वडापाव आणि सँडविच असे दोन्ही पदार्थ आपण काहीवेळा घरी बनवून देखील आवडीने खातो. आजकाल वेगवेगळ्या पदार्थांचे कॉम्बिनेशन करून खाण्याची एक वेगळीच क्रेझ आहे. वडापाव सँडविच हा त्यापैकीच एक नवीन खास पदार्थ आहे. वडापाव सँडविच हा पदार्थ वडापाव आणि सँडविच यांचे कॉम्बिनेशन असलेला एक पदार्थ आहे. सॅन्डविचच्या ब्रेड स्लाईसमध्ये बटाटवड्याची भाजी भरून ते दोन्ही बाजुंनी खरपूस भाजले की तयार आहे गरमागरम वडापाव सँडविच. संध्याकाळच्या नाश्त्याला आपण हे गरमागरम वडापाव सँडविच खाऊ शकता. वडापाव सँडविच बनवण्याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(How To Make Vadapaav Sandwich At Home).
साहित्य :-
१. तेल - २ ते ३ टेबलस्पून २. मोहरी - १ टेबलस्पून ३. कढीपत्ता - ८ ते १० पाने ४. लसूण पाकळ्या - ६ ते ७ (बारीक चिरलेल्या)५. आलं - १ इंचाचा छोटा तुकडा (किसून घेतलेलं)६. हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरून घेतलेल्या)७. मीठ - चवीनुसार ८. हळद - चिमूटभर ९. बटाटे - ६ ते ७ (उकडून मॅश केलेले)१०. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)११. लिंबाचा रस - १ टेबलस्पून १२. ब्रेड स्लाइस - ५ ते ७ १३. हिरवी चटणी - २ ते ३ टेबलस्पून १४. चीज स्लाईस - २ ते ३ स्लाईस
उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...
कृती :-
१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, बारीक चिरलेला लसूण, आलं, कढीपत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद घालून खमंग फोडणी तयार करून घ्यावी. २. आता या खमंग फोडणीत उकडून मॅश केलेला बटाटा घालावा. आता ४ ते ५ मिनिटे ही बटाट्याची भाजी मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावी. ३. भाजी शिजून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा. हे सगळे जिन्नस व्यवस्थित चमच्याने ढवळून एकत्रित करून घ्यावे. ४. आता ही तयार झालेली भाजी एका मोठ्या वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी.
सकाळी नाश्त्याला घाईत फक्त १० मिनिटांत करा झटपट ‘मसाला पराठा’, चव उत्तम-नाश्ता पोटभर...
ढोकळा हवा तसा मनासारखा फुलून येत नाही ? सोडा घालण्याची पद्धत तर चुकत नाही ना...
५. त्यानंतर ब्रेड स्लाईसला आपल्या आवडीनुसार बटर व हिरवी चटणी लावून घ्यावी. ६. आता एका ब्रेड स्लाईसवर भाजी व्यवस्थित पसरवून घ्यावी सगळ्यात शेवटी त्या स्लाईसवर सुकी लसणाची चटणी भुरभुरवून घ्यावी. ७. आता त्यावर एक चीज स्लाईस ठेवावा व सर्वात शेवटी त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा. ८. एका पॅनमध्ये थोडे तेल सोडून त्यावर हे सँडविच ठेवून दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे.
आता चिकाच्या दुधाशिवाय बनवा तितक्याच सुंदर चवीचा खरवस...खरवसाची जिभेवर रेंगाळणारी चव..
वडापाव सँडविच खाण्यासाठी तयार आहे. हे सँडविच सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.