मुंबईतील सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. वडापाव हा महाराष्ट्रातील प्रत्येकाचाच आवडता खाद्य पदार्थ आहे. स्वस्त आणि खाण्यास सोयीस्कर, भूक लागल्यानंतर पटकन सर्वत्र सहज मिळणारा, खमंग, झणझणीत अशा या वडापावचे फक्त एकच रुप नाही आहे. बदलत्या काळानुसार, वडापावचे रुप देखील बदलत गेले. एवढंच नव्हे तर आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे तसेच अनेक फ्लेवर्सचे वडापाव बाजारांत अगदी सहज मिळतात(Mumbai Street Style Vadapav Wrap).
तंदुर वडापाव, शेजवान वडापाव, उलटा वडापाव, चीज बर्स्ट वडापाव असे वडापावचे अनेक प्रकार आपण आवडीने खातो. असाच एक वडापावचा नवीन प्रकार म्हणजे (Vadapav Wrap) वडापाव रॅप. वडापाव रॅप या नवीन प्रकारात वडापाव तयार करण्यासाठीचे सर्व साहित्य आहे तेच वापरुन आपण हा नवीन प्रकार झटपट तयार करु शकतो. वडापाव रॅप तयार करण्यासाठीची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Vadapav Wrap At Home).
साहित्य :-
१. तेल - २ ते ३ टेबसल स्पून
२. हिंग - चिमूटभर
३. जिरे - १/२ टेबलस्पून
४. मोहरी - १/२ टेबलस्पून
५. लसूण पाकळ्या - ३ ते ४ पाकळ्या
६.आलं - २ टेबलस्पून (किसलेलं आलं)
७. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (पेस्ट करुन घेतलेली)
८. कडीपत्ता - ६ ते ७ पान
९. हळद - १/२ टेबलस्पून
१०. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
११. बटाटे - ३ (उकडवून घेतलेले)
१२. मीठ - चवीनुसार
१३. बेसन - १ कप
१४. पाणी - गरजेनुसार
१५. चीज - पर्यायी (आपल्या आवडीनुसार)
मेथीचा थेपला दोन-तीन दिवसांनीही मऊ राहण्यासाठी ६ टिप्स- थेपला राहील मऊ-लुसलुशीत!
फक्त १ कप सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांत करा सीताफळ फ्रुट क्रिम, मुलांसाठी खास पदार्थ...
कृती :-
१. एका मोठ्या कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी. त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपण नेहमी बटाट्याची भाजी तयार करतो तशी करुन घ्यावी.
२. आता दुसऱ्या एका बाऊलमध्ये बेसन आणि गरजेनुसार पाणी घेऊन मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करुन घ्यावे. आता एक पॅन घेऊन त्याला थोडेसे तेल लावून घ्यावे. त्यानंतर त्यावर तयार बेसनाचे बॅटर घालून ते डोशासारखे गोलाकार आकारात पसरवून घ्यावे. हा गोलाकार आकारातील डोसा २ ते ३ मिनिटे व्यवस्थित शिजू द्यावा. व्यवस्थित शिजल्यानंतर सूरी किंवा कात्रीच्या मदतीने हा डोसा खालच्या बाजूने बरोबर मधल्या केंद्रापासून खाली कापून त्याला एक कट द्यावा.
इडलीच्या पिठाचे करा खमंग - खुसखुशीत बटाटेवडे फक्त १० मिनिटांत! पाहा साधीसोपी भन्नाट रेसिपी...
३. कट दिल्यानंतर या डोशाच्या पाव भागावर बटाट्याची भाजी घालून घ्यावी. त्यानंतर पुढच्या पाव भागावर चिंच गुळाची चटणी आपल्या आवडीप्रमाणे लावून घ्यावी. सगळ्यात शेवटच्या भागावर आपल्या आवडीप्रमाणे चीज किसून घालावे आणि त्यावर वडापावची सुकी चटणी घालावी. आता ज्या भागावर बटाटयाची भाजी घातली आहे तो भाग वरच्या दिशेने फोल्ड करत एकावर एक घडी घालत याचे रॅप तयार करुन घ्यावे.
मस्त, चटपटीत वडापाव रॅप खाण्यासाठी तयार आहे. नेहमीच तोच वडापाव खाण्यापेक्षा तेच साहित्य वापरुन आपण वडापाव रॅप घरच्या घरी तयार करु शकतो.