Join us  

वरण-भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा व्हेज पुलाव-हॉटेलपेक्षाही चविष्ट बनेल, पाहा रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 9:25 AM

Instant Vegetable Pulao Recipe (Veg pulao kasa krayacha) : व्हेज पुलाव बनवताना तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकता. हिवाळ्याच्या दिवसात बाजारात बऱ्याच ताज्या भाज्या दिसतात.

रोज काय जेवण करावे हे चुकत नाही. (Cooking Hacks) अशावेळी घरातल्या माणसांची नेहमी नवनवीन पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणाला हलका आहार म्हणून अनेकजण वरण भात किंवा खिचडी करतात. (How to Make Veg Pulao at Home) यापेक्षा तुम्ही व्हेज पुलाव बनवू शकता. घरात कोणतीही पाहूणे आले असतील किंवा तुम्ही घरच्याघरी छोटी पार्टी करणार असाल तर पुलाव हा उत्तम पर्याय आहे. (Veg pulao recipe dakhva)

व्हेज पुलाव बनवताना तुम्ही आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकता. हिवाळ्याच्या दिवसात बाजारात बऱ्याच ताज्या भाज्या दिसतात. फ्लॉवर, फरसबी, टोमॅटो, बटाटे, राजमा, कॉर्न यापैकी काहीही घालू शकता. यातून तुम्हाला पोषण आणि चव दोन्ही मिळेल. पुलाव बनवण्यासाठी तुम्ही तेलाऐवजी तूपाचाही वापर करू शकता. परफेक्ट  व्हेज पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. या पद्धतीचा पुलाव तुम्ही सकाळी घाईच्या वेळेसही पटकन करू शकता.

व्हेजिटेबल  राईस करण्यासाठी लागणारं साहित्य (Veg Pulao Making Process)

1) स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ- १५० ग्राम

2) पाणी- गरजेनुसार

3) मीठ- चवीनुसार

4) बिर्याणी मसाला- २ टिस्पून

5) वाटाणे- १ वाटी

6) स्वीट कॉर्न- १ वाटी

7) गाजर - ३० ग्राम

8) फरसबी- १ वाटी

 इस्टंट व्हेज पुलाव कसा करायचा? (How to make Instant Veg Pulao at Home)

१) सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून घ्या पुलावसाठी तुम्ही जाड तांदूळ न घेता बासमती तांदूळ किंवा बारीक तांदळाचा वापर करा. 

२) उकळ्यात पाण्यात १ चमचा मीठ, २ चमचे बिर्याणी मसाला घाला. नंतर यात कॉर्न, गाजर, बीट,फरसबी तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. नंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घाला. 

३) झाकण ठेवून तांदूळ १५ ते २० मिनिटांसाठी शिजवून घ्या. भात शिजल्यानंतर गॅस बंद करा तुम्ही गरजेनुसार यात अजून पाणी घालू शकता.

थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; सोपी रेसिपी-मऊ खिचडीचा बेत होईल मस्त

४) ही सेम पद्धत तुम्ही कुकरमध्येही करू शकता पण कुकरमध्ये भात शिजवताना पाण्याचे प्रमाण कमी करावे लागेल नाहीतर भात खूपच गचगचीत होईल.

५) भात शिजल्यानंतर गरमागरम पुलाव एका ताटात काढून  घ्या. शेजवान चटणी किंवा कोशिंबीरीबरोबर तुम्ही पुलाव सर्व्ह करू शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स