Lokmat Sakhi >Food > लालचुटूक कलिंगडाचे गारेगार आइस्क्रिम, कल्पनाच किती भारी आहे! घ्या सोपी रेसिपी- करा उन्हाळा साजरा...

लालचुटूक कलिंगडाचे गारेगार आइस्क्रिम, कल्पनाच किती भारी आहे! घ्या सोपी रेसिपी- करा उन्हाळा साजरा...

How To Make Watermelon Ice-Cream With Just 6 -Ingredients And 10 Min Of Time : कलिंगडाचे आइस्क्रिम सहसा घरी केले जात नाही, पण मोठं कलिंगड एकदम संपत नाही तर करा त्याच कलिंगडाचं मस्त आइस्क्रिम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 02:45 PM2023-04-12T14:45:22+5:302023-04-12T15:01:52+5:30

How To Make Watermelon Ice-Cream With Just 6 -Ingredients And 10 Min Of Time : कलिंगडाचे आइस्क्रिम सहसा घरी केले जात नाही, पण मोठं कलिंगड एकदम संपत नाही तर करा त्याच कलिंगडाचं मस्त आइस्क्रिम...

How To Make Watermelon Ice-Cream At Home | लालचुटूक कलिंगडाचे गारेगार आइस्क्रिम, कल्पनाच किती भारी आहे! घ्या सोपी रेसिपी- करा उन्हाळा साजरा...

लालचुटूक कलिंगडाचे गारेगार आइस्क्रिम, कल्पनाच किती भारी आहे! घ्या सोपी रेसिपी- करा उन्हाळा साजरा...

उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराला गारवा मिळावा म्हणून अनेकजण आईस्क्रीम खाण्याला पसंती देतात. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या  तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाढलेल्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले असून या उष्णतेपासून बचाव करण्यासाठीसाठी विविध पद्धतींचा वापर करत आहे. त्याचबरोबर काही लोक दिवसातून अनेकदा थंड पेय किंवा आईस्क्रीम खाऊन शरिरातली उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. उन्हाळ्यात गारेगार आईस्क्रीम खाणं हे घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप प्रिय असते. 

जसजसा उन्हाळा वाढत जातो तसतसे आपले आईस्क्रीम खाण्याचे प्रमाण अधिक वाढत जाते. कुल्फी असो किंवा कोन, स्लाइस आईस्क्रीम असो किंवा कँडी आईस्क्रीम म्हटलं की कोणीही त्याचा स्वाद घेण्यासाठी एका पायावर तयार असते. उन्हाळ्यांत आपण वेगवेगळ्या फळांचे ज्यूस आणि  तऱ्हेतऱ्हेचे फ्लेवर्ड  आईस्क्रीम खाण्यावर जास्त भर देतो. उन्हाळ्यात जास्त करुन मँगो, वॉटरमेलन, टेंडर कोकोनट अशा फ्लेवर्सचे आईस्क्रीम अधिक खाल्ले जातात. उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेटेड होण्यापासून बचाव करण्यासाठी आपण पाण्याचे प्रमाण भरपूर असलेली फळ खातो. कलिंगड हे त्यापैकी एक मुख्य फळ. या पाणीदार कलिंगडाचा वापर करुन आपण झटपट घरच्या घरी कलिंगडाचे आईस्क्रीम तयार करु शकतो(How To Make Watermelon Ice-Cream With Just 6 -Ingredients And 10 Min Of Time).  

साहित्य :- 

१. दूध - अर्धा लिटर 
२. साखर - १ कप 
३. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून 
४. कलिंगड - २ कप (बिया काढून घेतलेले- फक्त लाल भाग घ्यावा)
५. मिल्क पावडर - अर्धा कप 
६. लाल रंगाचा फूड कलर - चिमूटभर (पर्यायी)

शहाळ्याचं पाणी आणि मलईचं गारेगार मिल्कशेक पिऊन तर पाहा, उन्हाळा आवडायला लागेल...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध ओतून त्यात साखर घालूंन हे मिश्रण मंद आचेवर साखर संपूर्ण विरघळेपर्यंत चमच्याने ढवळत राहा. 
२. मिश्रण थोडं घट्टसर उकळून आल्यावर त्यात बेकिंग सोडा घालावा. हे मिश्रण थोडं दाटसर होईपर्यंत चमच्याने ढवळत राहावे. 
३. आता एका मिक्सरच्या भांड्यात मिल्क पावडर घेऊन त्यात कलिंगडाचा लाल गर काढून घ्यावा. (बिया संपूर्णपणे काढून टाकाव्यात आणि फक्त कलिंगडाचा लाल भाग वापरावा.)
४. मिल्क पावडर व कलिंगडाचा गर यांची एकत्रित मिक्सरला पातळसर पेस्ट बनवून घ्यावी. 

५. कलिंगड आणि मिल्क पावडरच्या एकत्रित वाटून घेतलेल्या मिश्रणात, साखर आणि दूध वापरून घट्टसर तयार केलेलं मिश्रण ओतावे. (आपल्या आवडीनुसार लाल रंगाचा फूड कलर घालावा. फूड कलरचा वापर करणे हे पर्यायी आहे.) हे दोन्ही मिश्रण एकजीव करुन मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.  
६. आता हे मिक्सरमधील आईस्क्रीमचे तयार मिश्रण आईस्क्रीमच्या साच्यात ओतावे किंवा मोठ्या बाऊलमध्ये ओतून फ्रिजमध्ये रेफ्रिजरेट होण्यासाठी ठेवावे. 
७. ८ ते १० तासानंतर रेफ्रिजरेट केलेले आईस्क्रीम खाण्यासाठी व्यवस्थित तयार होईल. 

काहीतरी गारेगार खावेसे वाटते? करा झटपट फ्रूट कस्टर्ड, करायला सोपे आणि खायला मस्त...

भर उन्हाळ्यांत कलिंगडाचे गारेगार आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: How To Make Watermelon Ice-Cream At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.