Join us  

२ कप ज्वारीचा करा कुरकुरीत पौष्टीक डोसा, ग्लुटेन फ्री रेसिपी वेट लॉससाठी उत्तम-चवीला जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2023 11:54 AM

How to make weight loss friendly Instant Jowar Dosa : तांदुळाचीच कशाला, २ कप ज्वारीचे करा क्रिस्पी हेल्दी डोसा, चवीला भारी-खा पोटभर..

नाश्ता (Breakfast) म्हटलं की पोहे, उपमा, पराठा, साऊथ इंडियन पदार्थ (South Indian Dish) आवडीने खाल्ले जातात. बरेच जण सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली, डोसा खाण्यास पसंती दर्शवतात. हे पदार्थ चवीला उत्तम व आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. पण साऊथ इंडियन पदार्थ करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. इडली, मेदू वडा, डोसा करण्यासाठी डाळ-तांदूळ भिजत घालावे लागते. डोसा करण्याचे अनेक प्रकार आहेत.

डाळ-तांदुळाचा डोसा आपण खाल्लाच असेल, पण कधी ज्वारीचा डोसा खाऊन पाहिलं आहे का? ज्वारीची भाकरी आपण खाल्लीच असेल, पण या विकेंडला हटके आणि पौष्टीक ज्वारीचे डोसे (Jowar Dosa) करून पाहा. ज्वारीमध्ये मिनरल, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रमाण असते. ज्यामुळे आरोग्याला फायदाच होतो (Cooking Tips). हिवाळ्यात ज्वारी खायलाच हवी, त्यामुळे चवीला भारी आणि करायला सोपी ज्वारीचे डोसे एकदा करून पाहाच(How to make weight loss friendly Instant Jowar Dosa).

ज्वारीचे कुरकुरीत-पौष्टीक डोसे करण्यासाठी लागणारं साहित्य

ज्वारी

उडीद डाळ

मेथी दाणे

पाणी

थंडी सुरु झाली-त्वचा कोरडी पडलीय? मुरुमांच्या डागांनी त्रस्त? हळदीत २ गोष्टी मिसळून बनवा फेसपॅक - चेहरा चमकेल

मीठ

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप उडीद डाळ, २ कप ज्वारी, एक चमचा मेथी दाणे व  त्यात एक ग्लास पाणी घालून सर्व साहित्य धुवून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेऊन ८ तासांसाठी भिजत ठेवा. ८ तासानंतर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घाला, व त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. साहित्य वाटताना आपण त्यात गरजेनुसार पाणी देखील घालू शकता. ज्याप्रमाणे आपण डोसा करण्यासाठी पीठ दळतो, त्याचप्रमाणे पीठ वाटून घ्यायचे आहे. नंतर त्यावर झाकण ठेऊन ६ ते ७ तासांसाठी पीठ आंबवण्यासाठी ठेवा. ७ तासानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

चेहरा उजळ पण मान काळवंडली? खोबरेल तेलाचे २ सोपे उपाय, करून तर पाहा-काही दिवसात उजळेल मान

गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर ब्रशने तेल पसरवा, नंतर चमच्याने बॅटर घालून पसरवून घ्या. ज्याप्रमाणे आपण डोसा तयार करतो, त्याचप्रमाणे डोसे तयार करून घ्या. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतल्यानंतर डोसा प्लेटमध्ये काढून घ्या. अशाप्रकारे ज्वारीचा कुरकुरीत पौष्टीक डोसा खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स