वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट सोबतच एक्सरसाइज करणे देखील महत्वाचे असते. यासोबतच, वजन कमी करण्यासाठी आपल्याला काही पौष्टिक पदार्थ खाण्याचा देखील सल्ला दिला जातो. वजन कमी करण्यासाठीच्या पौष्टिक आणि पोषक पदार्थांच्या यादीत वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर आणि सॅलेड (Weightloss veggies noodles Salad) यांचा समावेश असतोच.
वेटलॉस करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड खाणे अधिक फायदेशीर ठरते. रोजच्या जेवणात किंवा भूक लागली म्हणून काहीतरी हेल्दी आणि पौष्टिक खायचे असेल तर आपण झटपट तयार होणारे हे वेटलॉस स्पेशल व्हेजी नूडल्स सॅलेड खाऊ शकतो. हे सॅलेड दिसताना नूडल्स सारखे दिसते, ते खाताना आपल्याला नूडल्स खाल्ल्यासारखेच वाटते. अगदी कमी साहित्यात इन्स्टंट तयार करता येणारे असे हे वेटलॉस स्पेशल व्हेजी नूडल्स सॅलेड तुम्हांला वजन झटपट कमी (How To Make Weightloss Special Veggies Noodles Salad) करण्यास मदत करु शकते. असे हे वेटलॉस स्पेशल व्हेजी नूडल्स सॅलेड घरच्याघरी कसे तयार करायचे याची इन्स्टंट रेसिपी पाहूयात( Weightloss Salad recipes).
साहित्य :-
१. काकडी - १ २. गाजर - १ ३. बीटरूट - १४. डाळिंबाचे दाणे - १/२ कप ५. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)६. लिंबाचा रस - १ टेबलस्पून ७. लाल तिखट मसाला - चिमूटभर ८. चाट मसाला - चवीनुसार ९. मीठ - चवीनुसार
दही मस्त घट्ट लावण्याची ‘ही’ ट्रिक पाहा, फक्त १५ मिनिटांत दही विरजण्याची युक्ती...
डाळ - तांदुळ भिजत न घालता, फक्त वाटीभर कुरमुऱ्यांचा करा डोसा - सकाळचा नाश्ता होईल झक्कास!
कृती :-
१. सगळ्यांत आधी काकडी, बीटरुट, गाजर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर सालं काढून घेऊन काकडी, बीटरुट, गाजर स्वच्छ करून घ्यावे. २. त्यानंतर काकडी, बीटरुट, गाजर स्लाईझरच्या मदतीने किसून घेऊन त्याला न्युडल्स सारखा लांब आकार द्यावा. ३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेल बीटरुट, गाजर आणि काकडी एकत्रित घेऊन त्यात लिंबाचा रस, डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
४. सगळयात शेवटी या सॅलेडमध्ये चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि लाल तिखट मसाला घालावा. ५. आता चमच्याने सगळे जिन्नस एकत्रित हलवून एकत्रित करून घ्यावे.
वेटलॉस स्पेशल व्हेजी नूडल्स सॅलेड खाण्यासाठी तयार आहे. हे सॅलेड आपण जेवणासोबत किंवा इतर वेळी भूक लागेल त्यावेळी झटपट तयार करून खाऊ शकतो.