Join us  

भात गचका होतो कधी पिवळसर दिसतो? शिजवतानाच ३ गोष्टी करा, मऊ मोकळा होईल भात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 2:49 PM

How to Make White Rice At Home : तांदूळात पाणी योग्य प्रमाणात असावे यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो  करायला हव्यात.

रोजच्या जेवणात भात असणं हे खूपच कॉमन आहे. भात करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. (Rice) कधी भात गचका होतो तर कधी जास्त कोरडा  पडतो. अनेकदा तांदूळ नीट शिजतही नाहीत.  (Perfect White Rice Recipe) काहीजण कुकरमध्ये भात बनवतात तर काही पातेल्यात. भात करण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर तांदूळ चांगला शिजतो आणि  त्यात जास्त पाणीसुद्धा राहत नाही. (How to Make White Rice At Home)

पाण्याशिवाय  तांदूळ शिजवणं कठीण होतं. जास्त पाणी  घातल्यामुळे याची चवही बिघडू शकते. यात पाण्याचे प्रमाण योग्य नसल्यामुळे तांदूळ पिवळे पडतात. गरजेपेक्षा जास्त तांदूळ खाल्ल्याने पिवळे होतात. जर डाळ-तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ले तर ते पिवळे पडू शकतात.  पुलाव किंवा इतर पदार्थांमध्ये पिवळा भात अजिबात  चांगले दिसत नाही. तांदूळात पाणी योग्य प्रमाणात असावे यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो  करायला हव्यात. या ट्रिक्समुळे फक्त तांदूळ पांढरेच होणार नाहीत  मोकळेसुद्धा शिजतील. (What Is The Process Of Making Rice White)

लिंबाचा रस वापरा

पांढरा भात बनवण्यासाठी पाणी आणि तांदूळ एका भांड्यात घाला. त्यात १ चमचा लिंबाचा रस आणि चिमुटभर मीठ घाला. एक शिट्टी वाजल्यानंतर ५ मिनिटांनंतर आच मंद ठेवा नंतर तांदूळ मंद आचेवर शिजू द्या.  यामुळे तांदूळ पिवळे होणार नाही.जर तुम्ही पातेल्यात भात बनवत असाल तर गॅसची आच मंद ठेवा. त्यानंतर तांदूळ झाकण ठेवून शिजू द्या. लिंबाच्या रसामुळे तांदूळ आंबट, पिवळे दिसत असतील तर असं अजिबात होणार नाही लिंबाच्या रसाचा वापर केल्याने भात मोकळा शिजतो आणि  चवही चांगली येते.  

भाजलेले की भिजवलेले? ९९ टक्के लोकांना माहीत नसते चणे खाण्याची योग्य पद्धत, आयुर्वेद सांगते की....

तूप किंवा तेलाचा वापर करा

अनेकदा तांदूळ चिकटतात. भात पिवळा होऊ नये म्हणून तुम्ही तांदूळ बनवताना तुपाचा वापर करू शकता. तांदूळ शिजवण्याच्या ३ तास आधी स्वच्छ धुवू शकता. असं केल्याने तांदूळातील माती कमी होईल आणि तांदूळ जास्त मोकळे शिजतील. तांदूळ जास्त परफेक्ट बनण्यासासाठी पातेल्यात शिजवा. यात चमचाभर तूप किंवा बटर घाला.  तूप किंवा तेल घातल्यास शिजण्यास चांगली मदत होते. तांदूळ मऊ मोकळे शिजतात आणि याचा  सुगंध संपूर्ण चांगला येतो. 

तांदूळ शिजवण्याची  योग्य पद्धत

भात व्यवस्थित न शिजवणं हे भात पिवळा होण्याचे कारण ठरू शकते. यासाठी १ कप पाणी घ्या त्यात बासमती तांदूळ घाला. एका भांड्यात झाकण किंवा जड प्लेट ठेवा. तांदळाला मंच आचेवर ठेवून शिजवा. तांदळाचा चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही पाणी मोजून घालू शकता.  तांदूळ शिजवताना तुम्ही यात बेकिंग सोडाही घालू शकता. ज्यामुळे तांदूळांना चांगला रंग येईल.

मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल

ब्रेडचा वापर

जर तुम्हाला तांदूळ एकदम परफेक्ट बनवायचे असतील तर तुम्ही या सोप्या ट्रिकचा वापर करू शकता. कुकरचं झाकण उघडून यात एक ब्रेडची स्लाईस घाला. त्यानंतर ५ मिनिटं शिजवा. ब्रेड तांदूळातील सर्व पाणी शोषून घेईल आणि रंगही चांगला येईल. तुम्ही  एका ऐवजी २ ब्रेडच्या स्लाईसही वापरू शकता.  कारण जास्त शिजवलं तर तांदूळ ओव्हर कुक होतील आणि मोकळे शिजणार नाहीत. २ ते ३ मिनिटांत तुमचं काम होईल.

टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न