Lokmat Sakhi >Food > मऊ पडलेली बिस्किटं पुन्हा कुरकुरीत-कडक करण्याच्या ३ भन्नाट ट्रिक्स, करुन तर पाहा

मऊ पडलेली बिस्किटं पुन्हा कुरकुरीत-कडक करण्याच्या ३ भन्नाट ट्रिक्स, करुन तर पाहा

How to Make Your Soggy Biscuits Crispy Again बिस्किटं मऊ झाली, सादळली की फेकून द्यावी लागतात, तसे कशाला करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 06:16 PM2023-03-24T18:16:50+5:302023-03-24T18:17:44+5:30

How to Make Your Soggy Biscuits Crispy Again बिस्किटं मऊ झाली, सादळली की फेकून द्यावी लागतात, तसे कशाला करायचे?

How to Make Your Soggy Biscuits Crispy Again | मऊ पडलेली बिस्किटं पुन्हा कुरकुरीत-कडक करण्याच्या ३ भन्नाट ट्रिक्स, करुन तर पाहा

मऊ पडलेली बिस्किटं पुन्हा कुरकुरीत-कडक करण्याच्या ३ भन्नाट ट्रिक्स, करुन तर पाहा

चहा असल्यावर बिस्कीटं लागतातच. चहाशिवाय बिस्कीटं खाण्याची मज्जा नाही. काही बिस्कीटं नुसती खाण्यात मज्जा आहे. सध्या बाजारात बऱ्याच प्रकारची बिस्कीटं मिळतात. बिस्कीटं पॅकेटमधून काढल्यानंतर लवकर मऊ पडतात. त्यांना हवा लागली की त्यांची चव निघून जाते. त्यातील क्रिस्पीपणा हा कमी होऊन जातो. बिस्कीटं क्रिस्पी नसली की ती खाल्ली जात नाही.

बहुतांश लोकं मऊ पडलेली बिस्कीटं फेकून देतात. त्यामुळे पूर्ण पुड्याची नासाडी होते. आपल्याला जर बिस्किटांमधील नमी काढून पुन्हा त्यामध्ये कुरकुरीतपणा आणायचा असेल तर, या काही टिप्स फॉलो करा. या ट्रिक्समुळे बिस्कीटं कुरकुरीत होतील यासह खायायला चविष्ट लागतील, व ती फेकलीही जाणार नाही(How to Make Your Soggy Biscuits Crispy Again).

बिस्कीटं लवकर मऊ का पडतात?

बिस्कीटांचं पॅकेट एकदा का खोलून ठेवलं की त्याला हवा लागते. बिस्किटांना हवा लागली की ते लगेच खराब होतात. बिस्कीटं मैदा, साखर व इतर साहित्यांचा वापर करून तयार होते. ज्यामुळे ते लगेच मऊ पडतात. पण ही बिस्कीटं फेकून न देता, काही ट्रिक्सच्या मदतीने त्यांना क्रिस्पी करू शकतात.

मटकीला भरपूर आणि लांबसडक मोड येण्यासाठी १ सोपी ट्रिक, मटकीची उसळ होईल चविष्ट

बिस्कीटांना मायक्रोवेव्ह करा

बिस्कीटं किंवा कुकीज हे मऊ पडले असतील, तर त्यांना मायक्रोवेव्ह करा. मायक्रोवेव्ह बिस्कीटांची नमी शोषून घेते. ज्यामुळे ते पुन्हा क्रिस्पी होतात. यासाठी मायक्रोवेव्हला पहिले १८० डिग्री सेल्सिअसवर प्री-हिट करा. एका प्लेटमध्ये सगळी बिस्कीटं पसरवून ठेवा. आता ही प्लेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवा, व त्यांना ५ मिनिटांसाठी बेक करा. आता ही बिस्कीटं रेडी झाल्यानंतर लगेच बाहेर काढा. २ मिनिटे प्लेटमध्येच ठेवा, त्यानंतर एका टाईट कंटेनरमध्ये स्टोर करा.

उकड न काढता, न थापता करा मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी, कोकणी स्टाईल रेसिपी

पॅनमध्ये क्रिस्प करा बिस्कीटं

काही लोकांकडे मायक्रोवेव्ह नसतात. अशा स्थितीत पॅनमध्ये देखील बिस्कीटं क्रिस्प करता येतील. यासाठी एक  पॅन घ्या. त्या पॅनला गरम करण्यासाठी ठेवा, गरम झाल्यानंतर त्यावर मीठ पसरवा. आता एका प्लेटमध्ये बिस्किटे ठेवा. मिठावर एक स्टँड ठेवा, त्या स्टँडवर ही बिस्किटांची प्लेट ठेवा. त्यावर झाकण ठेऊन मिडीयम फ्लेमवर ५ मिनिटे ठेवा. ५ मिनिटानंतर बिस्किटे बाहेर काढा, थोड्या वेळानंतर डब्ब्यात ठेऊन द्या.

कुकरमध्ये बासूंदी? करा झटपट ‘कुकर बासूंदी’, ना खाली लागण्याची भीती-न उतू जाण्याची..

तव्यावर गरम करा बिस्कीटं

आपण गरम तव्यावर देखील बिस्कीटं गरम करू शकता. सर्वपथम, तवा गरम करा. त्यानंतर त्यावर थोडं बटर पसरवून ग्रीस करा. ज्यामुळे बिस्कीटं जळणार नाही. आता लो फ्लेमवर ही बिस्कीटं दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. 

Web Title: How to Make Your Soggy Biscuits Crispy Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.