नारळाचा (Coconut) वापर प्रत्येक भारतीय घरांमध्ये केला जातो. कोणी ओली नारळ वापरतं तर कोणाला सुकं नारळ प्रत्येक भाजीत लागतं. गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्याचे मोदक बनवयाचे म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे नारळ फोडण्याचं काम. नारळ (Coconut) फोडणं हे सर्वात कठीण वाटतं. भरपूर ताकद लावल्यानंतरही नारळ व्यवस्थित फुटत नाही. नारळ फोडण्याच्या काही सिंपल ट्रिक्स माहित करून घेतल्या तर तुमचं काम अधिकच सोपं होईल. नारळाला ताकद न लावता कसं फोडायचं ते पाहूया. (How To Open Coconut Easily)
अल्फा फूडी. कॉमच्या रिपोर्टनुसार नारळ हातानं फोडलं जाऊ शकतं पण हे करायला खूपच ताकद लावावी लागते. अनेकदा जास्त ताकद लावल्यानंतर हाताला जखमसुद्धा होऊ शकते. सगळ्यात आधी नारळ व्यवस्थित सोलून घ्या. नंतर त्यावरील ३ खुणांना स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने पंचर करन घ्या. यामुळे नारळाच्या आतील पाणी व्यवस्थित बाहेर येईल. (Coconut opening Hacks How To Open Coconut in Easy Way) नारळाचं पाणी एका भांड्यात काढून नारळाच्या मधोमध एक पाण्याची रेखा ओढा. असं केल्यानं नारळ त्यात ठिकाणाहून ब्रेक होईल जिथे तुम्ही रेषा बनवली आहे. हातोडीच्या मदतीने नारळ फोडणं सोपं होईल.
नारळाची करवंटी काढण्याची योग्य पद्धत
नारळ फोडणंच कठीण नाही तर त्याची साल काढणं सुद्धा कठीण काम आहे. नारळ फोडून झाल्यानंतर गॅस ऑन करा. गॅसवर सोललेलं नारळ ठेवा. करवंटीचा भाग खाली असायला हवा करवंटी गरम झाल्यानंतर थोडी सैल होईल. त्यानंतर चमच्याने किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही नारळाचं साल काढून टाकू शकता. २ मिनिटं नारळ गॅसवरच राहू द्या. नारळ गॅसवरून खाली घ्या. त्यानंतर करवंटी कोणत्याही जड साहित्यानं ठोका. असं केल्यानं शेल बाहेर येण्यास मदत होईल.
नारळ एकदा करवंटीतून बाहेर आले की त्याला स्टोअर करणं हे महत्वाचे काम असते. अन्यथा ते खराब होऊ शकते. नारळाला स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवा. जर तुम्ही २ ते ३ दिवस हे नारळ वापरणार असाल पाणी बदलत राहा. नारळ स्टोअर केल्यानंतर फ्रेश राहील आणि सॉफ्टनेससुद्धा टिकून राहील.