Join us  

२ मिनिटांत नारळ फुटून खोबरं येईल हातात; नारळ फोडण्याची युनिक ट्रिक, काम होईल सोपं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 6:39 PM

How to Open Coconut Shell at Home : सणासुदीच्या दिवसात जास्त जणांचा स्वयंपाक बनवायचा असतो त्यावेळी नारळ फोडायला, किसायला फारसाच वेळही नसतो.

 गणपती बाप्पासाठी मोदक असोत किंवा भाज्या, डाळी प्रत्येक पदार्थांत चवीसाठी ओलं खोबरं घातलं जातं. ओलं खोबरं घातल्यानंतर पदार्थांना अनोखी चव येते पण ओलं नारळ फोडण्यापासून ते किसण्यापर्यंत बरीच किचकट कामं करावी लागतात. सणासुदीच्या दिवसात जास्त जणांचा स्वयंपाक बनवायचा असतो त्यावेळी नारळ फोडायला,  किसायला फारसाच वेळही नसतो. अशावेळी नारळं पटकन कसं फोडायचं ते पाहूया. (How to Open Coconut Shell at Home)

१) कुकरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि पाणी उकळल्यानंतर त्यात नारळ घाला. नंतर कुकरचं झाकण घट्ट बंद करा. १० ते १५ मिनिटांनी कुकरचं झाकण काढून नारळ व्यवस्थित बाहेर काढून  घ्या. नंतर  सुरीने दोन भाग करून नारळाचा बाहेरचा भाग काढून घ्या. त्यानंतर नारळ किसा किंवा त्याचे बारीक काप करा.

२) नारळ फोडण्यासाठी तुम्ही ओव्हनचा वापर करू शकता. यासाठी सगळ्यात आधी नारळ ओव्हन ४० डिग्रीवर प्रीहिट करून घ्या. त्यानंतर नारळ ओव्हनमध्ये ठेवा १ मिनटं शिजू द्या. मग ओव्हन बंद करून हळूहळू नारळाचे साल काढा. त्यामुळे नारळाचं अगदी सहज फुटेल.

हॉटेलसारखी चविष्ट पनीरची भाजी घरीच करा; सोपी रेसिपी, जास्त मेहनत न घेता झटपट बनेल भाजी

३) नारळाचे साल काढण्यासाठी नारळ गॅसवर ठेवा त्यानंतर जवळपास २ मिनिटं शेकून घ्या. त्यानंतर जवळपास २ मिनिटं शेकून घ्या. त्यानंतर चाकूच्या मदतीने नारळाचे साल काढा. त्यानंतर वरच्या बाजूला होल काढून नारळाचं पाणी काढून घ्या. मग नारळाचे सुरीच्या साहाय्याने दोन भाग करून तुम्ही नारळ वापरू शकता.   

नारळ लवकर खराब होऊ नये यासाठी काय करावे?

नारळ एकदा करवंटीतून बाहेर आल्यानंतर स्टोअर कसं करायचं हा मोठा प्रश्न असतो. कारण नारळ व्यवस्थित ठेवलं नाही तर बुरशी लागते किंवा वास येऊ लागतो. नारळाचा किस तुम्ही एका स्वच्छ प्लॅस्टीक बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवू शकता. नारळ तुम्ही हातानं फोडू शकता पण त्यासाठी खूप ताकद लावावी लागते. असते.  कधीकधी जास्त ताकद लावल्यामुळे हाताला जखम सुद्धा होऊ शकते. म्हणून काळजीपूर्वक नारळ फोडा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नगणेशोत्सवगणेशोत्सव