Lokmat Sakhi >Food > एका मिनिटांत नारळ फोडून खोबरं हातात; शेफ कुणाल कपूर सांगतात भन्नाट ट्रिक, नारळ फोडा सहज

एका मिनिटांत नारळ फोडून खोबरं हातात; शेफ कुणाल कपूर सांगतात भन्नाट ट्रिक, नारळ फोडा सहज

How to Open Coconut Without Any Tools : नारळ फोडणं म्हणजे खूपच किचकट काम वाटतं. नारळ फोडण्यासाठी काही सोपे हॅक्स फॉलो केले तर तुमचं काम काही मिनिटांत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:31 AM2024-05-11T11:31:10+5:302024-05-11T18:26:38+5:30

How to Open Coconut Without Any Tools : नारळ फोडणं म्हणजे खूपच किचकट काम वाटतं. नारळ फोडण्यासाठी काही सोपे हॅक्स फॉलो केले तर तुमचं काम काही मिनिटांत होईल.

How to Open Coconut Without Any Tools : How To Open Coconut With 3 Simple Methods | एका मिनिटांत नारळ फोडून खोबरं हातात; शेफ कुणाल कपूर सांगतात भन्नाट ट्रिक, नारळ फोडा सहज

एका मिनिटांत नारळ फोडून खोबरं हातात; शेफ कुणाल कपूर सांगतात भन्नाट ट्रिक, नारळ फोडा सहज

नारळाचे पदार्थ चटणी आणि लाडू बनवण्यासाठी नेहमीच वापरले जातात. इतकंच नाही तर पुजा-पाठ करतानाही नारळाचा वापर केला जातो. (Home Hacks) चवीला उत्तम  असलेल्या नारळाच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात.   नारळ हे रसाळ फळ त्यातील पोषक तत्वांमुळे  उत्तम मानले जाते. पण किचनमध्ये कोणताही पदार्थ बनवण्याआधी किंवा मंदिरात प्रसाद चढवताना  नारळ फोडलं जातं. (How To Open Coconut Easily)

नारळ फोडणं म्हणजे खूपच किचकट काम वाटतं. नारळ फोडण्यासाठी काही सोपे हॅक्स फॉलो केले तर तुमचं काम काही मिनिटांत होईल. (Easy Tricks To Open Coconut) काही मिनिटांत नारळ फुटून खोबरं हातात येईल.  शेफ कुणाल कपूर यांनी काही ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्या  नारळाची चटणी करण्यासाठी फायदेशीर ठरतील. (How To Open Coconut With 3 Simple Methods)

ऋतिक रोशनच्या ट्रेनरनं सांगितलं वेट लॉस सिक्रेट; हे १ काम करा, पटापट वजन कमी होईल

सगळ्यात आधी हे काम करा

आपलं काम सोपं करण्यासााठी सगळ्यात आधी नारळाची सालं काढून टाका. नारळाच्या रेशा थोड्या कडक असतात. हलका जोर दिल्यानंतर केस लगेचच निघतील. त्यानंतर हातांनी खेचून पूर्णपणे नारळ फोडून वेगळं करा. साल न काढता नारळ फोडणं कठीण काम आहे. 

नारळ फोडण्याची ट्रिक

सगळ्यात आधी नारळ व्यवस्थित पाहा त्यात तुम्हाला साईड लाईन दिसेल. नारळावर एक नॅच्युरल मोठी लाईन दिसून येईल. शेफ कुणाल कपूर यांनी दिलेल्या टिपनुसार नारळावर हलका फटका मारल्याने ते सहज फुटून बाहेर येईल. अशा स्थितीत तुम्ही लाटणं किंवा हतोडीने लाईनवर मारावं लागेल त्यानंतर २ ते ३ नारळ दोन तुकड्यांमध्ये तुटून जाईल. 

हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल

नारळ फोडून असं बाहेर काढा

नारळ फोडणं जितकं कठीण काम तितकंच नारळ काढणं कढीण असते. हे काम सोपं करण्यासाठी शेफ कुणाल करून सांगतात की नारळ फोडल्यानंतर गॅस स्टोव्हवर उंच आचेवर  ३० ते ३५ सेकंदासाठी शेकून घ्या.  यामुळे त्यातील मॉईश्चर सुकू लागेल. नंतर सुरीच्या मदतीने नारळाच्या चारही बाजूंनी त्यावर मारून खोबरं बाहेर काढा.

Web Title: How to Open Coconut Without Any Tools : How To Open Coconut With 3 Simple Methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.