बटाटा हा एक असा पदार्थ आहे, जो प्रत्येक भाजी व इतर पदार्थांमध्ये फिट होतो. बटाट्याचे पदार्थ लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतात. काही वेळेस बटाटा उकडून त्याचा वापर होतो, तर काही लोकं न उकडवताच चौकोनी काप करून बटाटा पदार्थात मिक्स करतात.
मात्र, बहुतांश स्नॅक्समध्ये जसे की, वडा पाव, पावभाजी, पाणी पुरी, मसाला डोसा, पराठा अशा पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर उकडवूनच केला जातो. मात्र, बटाटे उकडल्यानंतर, त्याला थंड करण्यासाठी ठेवले जाते. थंड झाल्यानंतर त्याची साल काढली जाते. याची प्रोसेस अनेकदा वेळखाऊ वाटते. जर आपल्याला हात न लावता झटपट बटाट्याची सालं काढायची असेल तर, ही ट्रिक नक्की वापरून पाहा. या ट्रिकमुळे काही मिनिटात बटाट्याची साल निघतील(How to Peel a Potato with Your Bare Hands).
साबुदाणा न भिजवता-बटाटा न उकडता करा साबुदाण्याचे कुरकुरीत वडे, नवरात्रासाठी झटपट उपवास रेसिपी
बटाट्याची साल काढण्यासाठी एक सोपी ट्रिक
घाईगडबडीत अनेक महिला बटाटे गरम असतानाच त्याची साल काढतात. ज्यामुळे हाताला चटके बसतात. बटाटे उकडले आणि ते गार नसले तर हात पोळतात. अशा वेळी बटाटे उकडवत ठेवताना, त्याचे दोन काप करा. यामुळे बटाटे लवकर शिजतील. बटाटे शिजल्यानंतर एका ताटात काढून ठेवा. नंतर पुरी तळण्यासाठी आपण जो झाऱ्या वापरतो, तो मोठा झारा घ्या. याच्या मदतीने आपण हात न लावता बटाट्यावरील साल काढून घेऊ शकता.
कोकणात करतात तशी पारंपरिक पद्धतीची भेंडीची भाजी करून पाहा, भेंडीची अशी चविष्ट भाजी खाल्ली नसेल कधी..
यासाठी झाऱ्यावर अर्धा उकडलेला बटाटा ठेवा, व त्यावर छोटी वाटी ठेवा, त्यानंतर हळुवारपणे दाब द्या. यामुळे बटाट्याचे साल झाऱ्यावर राहील, व उकडलेला बटाटा मॅश होऊन खाली ताटात पडेल. अशा प्रकारे हात न लावता सगळे बटाटे सोलून घ्या. या ट्रिकमुळे हात न लावता बटाटे तर सोलून निघतीलच, शिवाय मॅशही होतील.