Join us  

काही मिनिटांत सोलून होईल किलोभर लसूण, पाहा १ जबरदस्त ट्रिक - नखांनी सोलायची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 10:00 AM

How to Peel Garlic in 60 seconds : किलोभर लसूण २ मिनिटांत होतील सोलून, फक्त..

लसूण (Garlic) आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते (Kitchen Tips). पदार्थात लसूण घालताच रुचकर लागते. पण लसूण सोलण्याचे अनेकांना कंटाळा येतो. कारण लसणाच्या साली जाड आणि चिकट असल्यामुळे हाताला चिकटतात आणि सोलताना वास येतो (Garlic Peeling).

मोठ्या पाकळ्यांपेक्षा बारीक पाकळ्या असणारे लसूण सोलताना नाकीनऊ येतं (Cooking Tips). नखं तुटतात, झोंबतात, दुखतात अशा खूप समस्या येतात. परंतु, नखांशिवाय लसूण सोलता येत नाही. जर आपल्याला लसूण झटपट सोलायचे असतील तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. 

या घरगुती सोप्या उपायांमुळे अगदी काही मिनिटात किलोभर लसूण सोलून होतील. शिवाय नखांना त्रासही होणार नाही. मिनिटभरात किलोभर लसूण सोलून होतील(How to Peel Garlic in 60 seconds).

किलोभर लसूण झटपट सोलण्यासाठी टिप्स

- यासाठी आपल्याला एक मोठा चाकू लागेल. सर्व प्रथम, चाकूच्या मदतीने लसणाच्या पाकळ्या अर्ध्या कापून घ्या. यानंतर, पाकळ्या अशा प्रकारे ठेवा की कापलेला भाग तळाशी असेल.

- आता चाकूची सपाट बाजू लसणावर ठेवा आणि हलकेच टॅप करा. असे केल्यावर लसणाच्या पाकळ्याची साल लगेच वेगळी होईल आणि सर्व लसूण बाहेर येईल.

कपाळावर काळेपणा - मुरुमांचे डाग निघतच नाहीत? दुधात १ गोष्ट कालवून लावा; त्वचेवर येईल नैसर्गिक चमक

- या कामासाठी तुम्हाला 4 ते 5 सेकंदांचा वेळ लागणार नाही. अशा प्रकारे तुम्ही एका मिनिटात संपूर्ण लसूण सोलून काढू शकता.

- या एका ट्रिकमुळे आपण अगदी काही मिनिटात किलोभर लसूण सोलू शकता.

हिवाळ्यात हाडं ठणकतात? खा ड्रायफ्रुट्सचा १ प्रोटीनफुल लाडू, चेहराही चमकेल आणि केस गळणंही होईल बंद

- दुसरी ट्रिक म्हणजे, एक तवा गरम करा. त्यावर लसूण १-२ मिनिटे भाजून घ्या. आणि त्यात एक चमचा भरून मीठ घाला.

- पुन्हा लसूण 5 ते 6 मिनिटे भाजा. आता एका कॉटनच्या रूमालात लसूण काढून घ्या आणि रूमाल दुमडून लूसण चांगली चोळून घ्या.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.