आल्याचा वापर किचनमध्ये जास्त होतो. आल्याशिवाय अनेक पदार्थ बेचव लागतात. आलं चहा अथवा भाजीतील ग्रेवीमध्ये मिक्स केल्यास त्याची चव दुप्पटीने वाढते. आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आल्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, आयर्न, झिंक आणि कॅल्शियम यासह इतर पौष्टीक घटक आढळतात.
कच्चे आले चघळल्याने सर्दी, खोकला, पोटदुखी, उच्च कोलेस्ट्रॉल, मायग्रेन यासह इतर आजारांपासून आराम मिळतो. मात्र, आलं सोलताना नाकीनऊ येतात. त्याच्या वाकड्या आकारामुळे ते सहज सोलता येत नाही. सोलताना अधिक भाग वाया जातो. आले जर झटपट सोलायचे असेल तर, एक ट्रिक आपल्या मदतीला येईल.
आले सोलण्यासाठी तीन ट्रिक मदत करतील
आल्याची सालं सुकवून घ्या
आले आपण फ्रिजमध्ये साठवून ठेवतो. त्याचा कमी वापर होत असल्यामुळे, आपण कापून बाकीचा भाग ठेवतो. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे आल्याची साले सुकून जातात. जेव्हा आल्याची गरज भासते, तेव्हा १५ मिनिटापूर्वी बाहेर काढून ठेवा. आल्याचे तापमान सामान्य झाल्यावर ते चाकूच्या साहाय्याने सहज सोलता येईल.
आले सोलण्यासाठी चमच्याचा वापर करा
आले सोलताना अधिक भाग निघून वाया जातो. अशा वेळी चमच्याची मदत घ्या. आल्याची साल पातळ असल्यामुळे. धारदार चमच्याने साल काढण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे काम सोपे होईल आणि जास्त वेळही लागणार नाही.
सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्कीट खाता? आरोग्याच्या ५ समस्या हमखास छळतात, बघा तसेच होते का?
आल्याचे तुकडे करा
आल्याचा आकार सरळ आणि सपाट नसतो, त्यामुळे त्याला सोलण्यात खूप अडचणी येतात. यासाठी आले सोलण्यापूर्वी, त्याचे लहान तुकडे करा, ज्याचा आकार 1 ते 2 इंच असावा. आता चमच्याने किंवा चाकूने ते सहज सोलता येईल.