Lokmat Sakhi >Food > ५ मिनिटांत पातेलंभर मक्याचे दाणे सोलून होतील, बघा स्वीटकॉर्न झटपट सोलण्याच्या २ पद्धती

५ मिनिटांत पातेलंभर मक्याचे दाणे सोलून होतील, बघा स्वीटकॉर्न झटपट सोलण्याच्या २ पद्धती

How To Peel Sweet Corn Or Corn Easily?: स्वीटकॉर्न किंवा मका सोलण्याचं वेळखाऊ काम झटपट कसं करायचं ते पाहा... (simple method for peeling sweet corn very quickly)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 02:47 PM2023-12-15T14:47:10+5:302023-12-15T15:11:25+5:30

How To Peel Sweet Corn Or Corn Easily?: स्वीटकॉर्न किंवा मका सोलण्याचं वेळखाऊ काम झटपट कसं करायचं ते पाहा... (simple method for peeling sweet corn very quickly)

How to peel sweet corn or corn easily? simple method for peeling sweet corn very quickly, How to peel corn very fast? 2 Simple tips and tricks for peeling corn, How to remove corn kernels in 1 minute | ५ मिनिटांत पातेलंभर मक्याचे दाणे सोलून होतील, बघा स्वीटकॉर्न झटपट सोलण्याच्या २ पद्धती

५ मिनिटांत पातेलंभर मक्याचे दाणे सोलून होतील, बघा स्वीटकॉर्न झटपट सोलण्याच्या २ पद्धती

Highlightsमक्याचे दाणे काढण्याचं काम एकदम जलद होणार असून अवघ्या ५- ७ मिनिटांत पातेलंभर मक्याचे दाणे सोलून होतील.

या दिवसांत स्वीटकॉर्न भरपूर मिळतात. पण केवळ ते सोलत बसण्याचा कंटाळा येतो किंवा ते काम खूप वेळखाऊ असल्याने तेवढा वेळच मिळत नाही, म्हणून अनेक जणी ते खरेदी करणं, खाणं टाळतात. तुम्हीही असंच करत असाल तर स्वीटकॉर्न किंवा मका अगदी कमी वेळात झटपट कसं सोलायचं ते पाहून घ्या (simple method for peeling sweet corn very quickly). यामध्ये आपण अगदी सोप्या अशा २ पद्धती पाहणार आहोत (How to peel corn very fast?). त्यामुळे तुमचं मक्याचे दाणे काढण्याचं काम एकदम जलद होणार असून अवघ्या ५- ७ मिनिटांत पातेलंभर मक्याचे दाणे सोलून होतील. (2 Simple tips and tricks for peeling corn)

मक्याचे दाणे सोलण्याच्या २ सोप्या पद्धती

 

पहिली पद्धत

ही पद्धत अगदी सोपी आहे. अगदी टीव्ही बघत किंवा गप्पा मारत मारतही तुम्ही हे काम करू शकता. त्यासाठी वेगळा वेळ देण्याचीही गरज नाही. यासाठी सगळ्यात आधी मक्याच्या कणासाची वरची पानं काढून घ्या.

गर्ल डिनर, पनीर आईस्क्रीम हे पदार्थ तुम्ही २०२३ मध्ये खाल्ले का? पाहा २०२३ मध्ये कोणते पदार्थ व्हायरल झाले

त्यानंतर मक्याचे कणिस दोन्ही बाजूंनी पकडा आणि त्याचे दोन समान तुकडे करून घ्या. आता कणिस तोडल्यानंतर मक्याच्या दाण्यांची जी सगळ्यात वरची रेष आहे, तिथले दाणे अंगठ्याने पुढच्या बाजुला वाकवून घ्या. पटापट दाणे तुटतील. अशाप्रकारे एकेका ओळीतले दाणे सोलत जा...

दुसरी पद्धत 

 

ही पद्धत देखील अगदी सोपी आहे. फक्त त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला सुरी किंवा चमच्याची गरज पडणार आहे. यासाठी कणिस मधोमध तोडण्याची गरज नाही.

थंडीमुळे मूग- मटकीला चांगले मोड येत नाहीत? करा २ सोपे उपाय- कडधान्यांना येतील छान लांबसडक मोड

यासाठी कणसाची दाण्यांची कोणतीही उभी रेषा पकडा आणि त्या रेषेवरचे दाणे चमच्याने किंवा सुरीने काढून घ्या. आता त्या रिकाम्या रेषेच्या डावीकडची किंवा उजवीकडची रेषा घ्या आणि अंगठ्याने वाकवून दाणे काढून घ्या. कितीतरी कणसं अगदी झटपट सोलून होतील. 

 

Web Title: How to peel sweet corn or corn easily? simple method for peeling sweet corn very quickly, How to peel corn very fast? 2 Simple tips and tricks for peeling corn, How to remove corn kernels in 1 minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.