Join us  

How to Pick a Perfect Mango : आंबा गोड आहे की आंबट कसं ओळखाल? खरेदी करण्याआधी 'ही' ट्रिक वाचा अन् गोड, रसाळ आंबे खा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 6:20 PM

How to Pick a Perfect Mango : आंबे घरी आणल्यानंतर कळतं की आंबे कच्चे किंवा खूपच आंबट आहे. पिकलेले, रसाळ, गोड आंबे विकत घेण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्हाला मदत होऊ शकते.

उन्हाळा म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आंबे. उन्हाळ्यात आमरसाचं जेवण म्हणजे स्वर्ग सुखंच. आंबे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. (Tips to Keep in Mind Before Buying Mangoes) आंबे खरेदी करताना अनेकदा गोंधळल्यासारखं होतं. आंबे घरी आणल्यानंतर कळतं की आंबे कच्चे किंवा खूपच आंबट आहे. पिकलेले, रसाळ, गोड आंबे विकत घेण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्हाला मदत होऊ शकते. (How to Choose a Perfect Mango?) 

आंबा गोड आहे की आंबट वासावरून ओळखा (3Ways to Pick a Good Mango)

आंबा खरेदी करताना गोड आहे की आंबट हे ओळखणं अगदी सोप्पं आहे. आंब्याच्या वासावरून तुम्ही माहीत करून घेऊ शकता. आंब्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला गोड, मधूर सुगंध आला म्हणजेच आंबा पूर्णपणे पिकला आहे. पण जर आंब्याला आंबट, एल्कोलिक वास जाणवला तर समूजन जा की असा आंबा गोड नाही.

फक्त १ जुडी कोथिंबीरीपासून बनवा ५ प्रकारच्या चविष्ट चटण्या; या घ्या सोप्या रेसेपीज

याशिवाय अति मऊ आणि हातांनी सहज दाबले जातील असे आंबे आतून खराब असू शकतात. म्हणून जास्त कडक किंवा जास्त सॉफ्ट आंबा घेऊ नका .कच्चे आंबे असतील तर तुम्ही रूम टेंपरेचरवर ठेवू शकता. आंब्याच्या पेटीत काही दिवस ठेवल्यानंतर किंवा एखाद्या टोपलीवर कापड घालून झाकून ठेवल्यानंतर आंबे सॉफ्ट होतील. 

आंबे लवकर पिकण्यासाठी पेटीत ठेवू शकता. पिकलेले आंबे जास्तीत जास्त एक आठवडा फ्रीजमध्ये राहतात. त्यामुळे तुम्ही पिकलेले आंबे फ्रीजमध्ये ठेवू शकता.

आंबा कापल्यानंतर त्यातून खूपच आंबट वास येत  असेल किंवा आतल्या बाजूनं जास्त काळा दिसत असेल तर अशा आंब्याचे सेवन करू नका. असा आंबा खाल्ल्यास पोटाचे विकार उद्भवू शकतात.

आंबा नेहमी वजनदार असावा हलका आंबा कदाचित प्रक्रिया केलेला असू शकतो. आंब्याच्या देठाजवळ किंवा तर कुठेही लहान लहान छिद्र दिसली तर तो आंबा घेणं टाळावं.

आंब्याच्या सेवनाचे फायदे (Benefits of mango)

आंबा ते मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. आंब्यामध्ये उच्च पातळीचे व्हिटॅमिन सी, फायबर आणि पेक्टिन असते आणि ते एक परिपूर्ण फळ बनवते जे उच्च कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

आंबा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ते तुमच्या शरीराच्या आतून तुमची त्वचा स्वच्छ करते. हे छिद्रांवर उपचार करते आणि तुमच्या त्वचेला चमक देते. त्यामुळे चांगली त्वचा मिळविण्यासाठी आंबा खा.

आंब्याची पाने खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात येतो. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी 5-6 आंब्याची पाने एका भांड्यात उकळून घ्यावीत. रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी लवकर गाळून घेतलेलं पाणी प्या. तसेच आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, आंबा कमी प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील असते, ज्यामुळे ते डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.

टॅग्स :अन्नआंबाकिचन टिप्स