Join us  

कलिंगड लालबुंद-गोड रसरशीत आहे की नाही कसे ओळखाल? पाहा ३ टिप्स, निवडा परफेक्ट कलिंगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 2:55 PM

How to Pick a Watermelon: 3 Helpful Tips : आकारावरून ओळखा कलिंगड कोणते गोड-रवाळ आहे?

उन्हाळी हंगाम सुरु झाल्यानंतर कलिंगड खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. उन्हाच्या झळा बसल्यानंतर आपण रसरशीत लालबुंद कलिंगड खातो. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. शिवाय त्यात अनेक पौष्टीक घटक असतात. ज्यामुळे उन्हाळ्यातील अनेक आजारांपासून सुटका मिळते. पण कलिंगड लाल आणि गोड असेल तरच खायला मज्जा येते. या दिवसात रस्त्याच्या कडेला कलिंगडाचे स्टॉल पाहायला मिळतात. या स्टॉलवर लालबुंद कलिंगड असतात (Watermelon). पण प्रत्येक लाल रंगाचा कलिंगड चवीला गोड असेलच असे नाही.

काही कलिंगड वाढवण्यासाठी त्याला इंजेक्शन देण्यात येते (Summer Special Tips). अनैसर्गिकरित्या वाढणारे कलिंगड आरोग्यास हानिकारक ठरते. अशावेळी कलिंगड खरेदी कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या? गोड कलिंगड कसे ओळखावे? पाहूयात(How to Pick a Watermelon: 3 Helpful Tips).

जड आणि पिवळे ठिपके असलेले कलिंगड

चमकदार दिसणारे कलिंगड दिसायला आकर्षक असतात, पण प्रत्येक्षात ते आतून लाल आणि गोड नसतात. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना बाहेरून पिवळे आणि ठिपके असलेले कलिंगड खरेदी करा. कलिंगड वेलीवर पिकण्यास बराच वेळ घेत असल्याने ते पिवळे पडतात. शिवाय वजनदार कलिंगड खरेदी करा. वजनदार कलिंगडामध्ये ९२% पाणी असते. ज्यामुळे ते चवीला प्रचंड रसदार लागते.

तुमचा जोडीदार सतत तुमचा मोबाइल तपासतो, मेसेज वाचतो? हे प्रेम - पझेसिव्हनेस की अविश्वास?

कलिंगड दाबून आणि आवाज ऐकून खरेदी करा

कलिंगड खरेदी करताना त्यावर हाताने टॅप करा. आवाजावरून आपण कोणते कलिंगड गोड असेल हे ओळखू शकता. कलिंगड गोड असेल तर, ढक-ढक असा आवाज येईल. पण कलिंगड जर गोड नसेल तर, त्यातून आवाज येणार नाही. शिवाय फुटलेलं, कट झालेले कलिंगड खरेदी करू नका.

तोंडी लावण्यासाठी करा हिरव्या टोमॅटोची चटणी; आंबट-गोड चवीची चटणी एकदा खाल तर भूक खवळेल

आकार पाहा

अंडाकृती आकाराचे कलिंगड/ टरबूज बहुतेकदा गोडच असतात. त्यामुळे वाकड्या-तिकड्या आकाराचे किंवा गोल कलिंगड घेण्यापेक्षा फक्त अंडाकृती असलेला कलिंगड खरेदी करा. यासह कलिंगडावर कुठेही छिद्र कापलेलं किंवा फुटलेलं नसेल याची खात्री करून घ्या. 

टॅग्स :अन्नसमर स्पेशल