Lokmat Sakhi >Food > खमंग खुसखुशीत खांदेशी बट्टी करण्याची सोपी रेसिपी, होऊन जाऊ द्या डाळ बट्टीचा मस्त बेत

खमंग खुसखुशीत खांदेशी बट्टी करण्याची सोपी रेसिपी, होऊन जाऊ द्या डाळ बट्टीचा मस्त बेत

how to prepare dal bati at home | varan batti recipe खांदेशी डाळ बट्टी म्हणजे पोटभर जेवणाचा आनंद, फक्त बट्टी मस्त जमायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 12:45 PM2023-07-21T12:45:54+5:302023-07-21T12:50:02+5:30

how to prepare dal bati at home | varan batti recipe खांदेशी डाळ बट्टी म्हणजे पोटभर जेवणाचा आनंद, फक्त बट्टी मस्त जमायला हवी

how to prepare dal bati at home | varan batti recipe | खमंग खुसखुशीत खांदेशी बट्टी करण्याची सोपी रेसिपी, होऊन जाऊ द्या डाळ बट्टीचा मस्त बेत

खमंग खुसखुशीत खांदेशी बट्टी करण्याची सोपी रेसिपी, होऊन जाऊ द्या डाळ बट्टीचा मस्त बेत

महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य आहे. सर्व भागांमध्ये विविध खाद्यपदार्थ केले जातात. काही ठिकाणी पुरणपोळी स्पेशल आहे तर, काही ठिकाणी वडा पाव. पदार्थातील वेगळेपणामुळे हे पदार्थ त्या - त्या भागात फेमस आहे. खांदेशात डाळ बट्टी चांगलीच प्रसिद्ध आहे. कुरकुरीत बट्टी त्यासोबत खमंग डाळ चवीला अप्रतिम लागते.

एक प्लेट डाळ बट्टी खाल्ल्याने भूक तर भागतेच, यासह आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. परंतु, अनेकदा बट्टी करताना प्रमाण चुकते, ज्यामुळे बट्टी हवी तशी कुरकुरीत - परफेक्ट बनत नाही. जर आपल्याला झटपट, जास्त मेहनत न घेता बट्टी तयार करायची असेल, तर या पद्धतीने तयार करून पाहा(how to prepare dal bati at home | varan batti recipe).

बट्टी करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

रवा

ओवा

डाळ-तांदूळ न भिजवता, पीठ न आंबवता फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट हलकीफुलकी इडली

मीठ

तेल

जिरं

हळद

पाणी

तेल

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये ३ कप गव्हाचं पीठ घ्या, त्यात एक कप रवा, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा तेल, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद घालून साहित्य एकजीव करा, त्यात गरजेनुसार पाणी मिक्स करून पीठ मळून घ्या. पीठ घट्टसर मळायचे आहे.

अर्धी वाटी खोबरं - एक चमचा तेल, ५ मिनिटात करा खोबऱ्याची चटकदार चटणी

पीठ मळून  झाल्यानंतर त्याचे ४ भाग तयार करा. दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा, स्टीमर गरम झाल्यानंतर त्यात पीठाचे गोळे ठेवा. झाकण ठेऊन पीठाचे गोळे वाफवून घ्या. वाफवून घेतल्यानंतर पीठाचे गोळे थंड करण्यासाठी परातीत ठेवा. त्यानंतर त्याचे काप करा. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर तयार वाफवलेली बट्टी तळून घ्या. अशा प्रकारे खमंग क्रिस्पी बट्टी वरणासोबत खाण्यासाठी रेडी.

Web Title: how to prepare dal bati at home | varan batti recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.