Join us  

फणसाचे गरे पोटाला बरे, म्हणूनच खा फणसाचे कुरकुरीत वेफर्स - कोकणी पद्धतीची पारंपरिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 11:49 AM

Tasty & Crispy Jackfruit Chips : कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी तर खातोच पण, पारंपरिक कोकणी पद्धतीचे चिप्स नक्की ट्राय करा...

सध्या बाजारांत सगळीकडेच फणस विकायला ठेवलेले पहायला मिळतात. आतून गोड बाहेरुन काटेरी असणारा फणस सगळ्यांचं खायला आवडतो. फणसाच्या गऱ्यांसोबतच त्यापासून बनलेले इतर पदार्थ देखील खायला चविष्ट लागतात. कच्च्या फणसाची भाजी, फणसपोळी असे बरेच पदार्थ फणसापासून बनवले जातात. फणस कापण्याचे काम कितीही कंटाळवाणे असले तरीही त्यातील गोड गरे आपल्याला खायला आवडतात(Raw jackfruit chips making recipe).

फणस म्हंटल की लगेच डोळ्यासमोर त्याचे पिवळे धम्मक गरे येतात. या गऱ्यांपासून लोणची, जॅम, जेली,साखरेच्या पाकात वाळवलेले गरे, गऱ्यांची पावडर, तसेच (Homemade Jackfruit Chips) पेय तयार केले जातात. कच्च्या कापा फणसापासून त्याचे कुरकुरीत चिप्स देखील बनवता येतात. कच्चा फणसाच्या गऱ्यांचे कुरकुरीत चिप्स कसे बनवावे याची पारंपरिक रेसिपी पाहूयात (How to prepare perfect jackfruit chips at home).     

साहित्य :-

१. कच्च्या फणसाचे गरे - २ कप २. खोबरेल तेल - तळण्यासाठी ३. हळद - १/२ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. पाणी - १/२ वाटी 

लाटताना चपाती पोळपाट किंवा लाटण्याला चिकटू नये म्हणून सोप्या ६ टिप्स, करा परफेक्ट गोल चपाती...

वाटीभर सुक्या खोबऱ्याची करा झणझणीत चटणी, तोंडी लावण्यासाठी म्हणून परफेक्ट...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी फणसाचे गरे काढून ते गरे सोलून त्याच्या बिया वेगळ्या काढून घ्याव्यात. २. आता या गऱ्यांचे चिप्स सारखे उभे लहान - लहान तुकडे कापून घ्यावेत. ३. एका मोठ्या कढईत खोबरेल तेल ओतून ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. ४. चिप्स सारखे उभे काप करून घेतलेले फणसाचे गरे या गरम तेलात सोडावेत. 

एकदाच बनवून ठेवा हे डोसा प्रिमिक्स आणि अगदी १० मिनिटांत करा उडुपी डोसा...

५. एका छोट्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात हळद, मीठ घालून ते पाण्यात विरघळवून घ्यावेत. ६. हळद - मिठाचे हे मिश्रण कढईत तळण्यासाठी ठेवलेल्या गऱ्यांवर चमच्याने सोडावे. ७. आत एका टिश्यू पेपरवर हे चिप्स काढून घ्यावेत जेणेकरुन यातील जास्तीचे तेल निघून जाईल. 

फणसाच्या गऱ्यांचे कुरकुरीत चिप्स खायला तयार आहेत.

टॅग्स :अन्नपाककृती