Lokmat Sakhi >Food > आता फक्त हिवाळ्यांतच नाही तर वर्षभर घ्या आवळ्याचा आस्वाद! आवळा स्टोअर करण्याची भन्नाट ट्रिक...

आता फक्त हिवाळ्यांतच नाही तर वर्षभर घ्या आवळ्याचा आस्वाद! आवळा स्टोअर करण्याची भन्नाट ट्रिक...

How to Preserve Amla for Long Time : How To Preserve Raw Amla Without Making Murabba & Achaar : Kitchen Hack: Simple Tips To Store Amla : How to Preserve Amla for months : best way to store amla for long time : वर्षभरात आवळ्याचे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी आवळा खराब न होता स्टोअर करण्याची पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2025 10:00 IST2025-01-05T10:00:00+5:302025-01-05T10:00:02+5:30

How to Preserve Amla for Long Time : How To Preserve Raw Amla Without Making Murabba & Achaar : Kitchen Hack: Simple Tips To Store Amla : How to Preserve Amla for months : best way to store amla for long time : वर्षभरात आवळ्याचे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी आवळा खराब न होता स्टोअर करण्याची पद्धत...

How to Preserve Amla for months How to Preserve Amla for Long Time How To Preserve Raw Amla Without Making Murabba & Achaar | आता फक्त हिवाळ्यांतच नाही तर वर्षभर घ्या आवळ्याचा आस्वाद! आवळा स्टोअर करण्याची भन्नाट ट्रिक...

आता फक्त हिवाळ्यांतच नाही तर वर्षभर घ्या आवळ्याचा आस्वाद! आवळा स्टोअर करण्याची भन्नाट ट्रिक...

हिवाळ्यात बाजारांमध्ये हिरवेगार आंबट - गोड , तुरट चवीचे आवळे फार मोठ्या प्रमाणात विकायला असतात. असे गोलाकार, टप्पोरे, गोलमटोल आवळे पाहून ते विकत घेण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. हिवाळ्याच्या दिवसांत मुळातच आवळा खाणे पौष्टिक आणि पाचक असते. ऐन कडाक्याच्या थंडीत प्रत्येक घरी (How to Preserve Amla for Long Time) आवळ्याचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार केले जातात. आवळ्याची चटणी, आवळा कँडी, आवळा सुपारी, आवळा ज्यूस (Kitchen Hack:  Simple Tips To Store Amla) असे अनेक झटपट होणारे पदार्थ तयार केले जातात. परंतु आवळा हा फक्त हिवाळ्यातच उपलब्ध असतो एरवी वर्षभर आवळा मिळत नाही. आवळा हे हिवाळ्यात येणारे एक सिझनल फळं आहे. यासाठीच थंडीच्या दिवसांत आवळा भरपूर प्रमाणात खाल्ला जातोच सोबत त्याचे वर्षभर टिकणारे अनेक पदार्थही केले जातात(How To Preserve Raw Amla Without Making Murabba & Achaar).

आवळा वर्षभर मिळत नसल्याने फक्त थंडीच्या दिवसातच त्याचा स्वाद घेता येतो. परंतु जर तुम्हाला फक्त हिवाळ्यातच मिळणाऱ्या या आवळ्याचा आस्वाद वर्षभर घ्यायचा असेल तर तुम्ही एका खास पद्धतीने आवळा स्टोअर (best way to store amla for long time) करु शकता. अशा एका खास पद्धतीने जर तुम्ही आवळा स्टोअर करून ठेवला तर तो खराब न होता वर्षभरासाठी चांगला टिकून राहतो. यासाठीच यंदाच्या हिवाळ्यात भरपूर आवळे आणून ते स्टोअर करून ठेवा, पाहा आवळे स्टोअर करण्याची सोपी ट्रिक.

साहित्य :- 

१. आवळे - २०० ग्रॅम 
२. कडीपत्ता - २० ते १५ पाने 
३. आलं - ५० ग्रॅम 

साचवून ठेवलेल्या तुपाला काही दिवसांनी कुबट वास येतो? तुपात २ पदार्थ मिसळा, तूप छान राहील...


ढोकळा कायम फसतो, फुगतच नाही? ८ टिप्स- विकतपेक्षा हलका ढोकळा करा घरच्याघरीच...

कृती :- 

१. सगळ्यात आधी आवळे स्वच्छ धुवून - पुसून संपूर्णपणे वाळवून घ्यावे. 
२. आता या आवळ्याचे सुरीने लहान लहान तुकडे करून घ्यावेत. 
३. त्यानंतर आलं सोलून त्याचे देखील लहान तुकडे करून घ्यावेत. 
४. त्यानंतर एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यात आवळा, आल्याचे लहान तुकडे घालावेत. त्यानंतर कडीपत्त्याची पाने घालावीत. 

मूग डाळीचा पराठा खाऊन तर पाहा, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक झटपट पदार्थ...

५. आता हे तिन्ही जिन्नस पाणी न घालताच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. 
६. हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्यानंतर एका गाळणीच्या मदतीने हे सगळे मिश्रण गाळून आवळ्याचा रस आणि चोथा वेगवेगळा काढून घ्यावा. 
७. त्यानंतर आवळ्याचा रस बर्फाच्या ट्रे मध्ये ओतून फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावे. 
८. २ ते ३ तासानंतर या बर्फाच्या ट्रे मध्ये आवळ्याचा रस व्यवस्थित सेट होऊन त्याचे क्यूब तयार झाले असतील. 
९. असे क्यूब काढून आपण एका झिप लॉक बॅगमध्ये स्टोअर करून पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवू शकता. अशाप्रकारे आपण आवळा वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. 

अशाप्रकारे आपण आवळ्याचा रस खराब न होता वर्षभरासाठी स्टोअर करुन ठेवू शकतो. हा आवळ्याचा रस वापरून आपण इतर अनेक पदार्थ वर्षभरात तयार करू शकतो. हे आवळा क्यूब वापरण्याआधी थोड्यावेळासाठी फ्रिजरमधून बाहेर काढून ठेवावे. त्यानंतर इतर पदार्थांमध्ये घालून आपण त्या पदार्थाला आवळ्याची चटपटीत, आंबट - गोड टेस्ट आणू शकता. यात आल्याच्या तुकड्यांचा वापर केला असल्याने हे आवळ्याचे क्यूब्स वर्षभर खराब न होता दीर्घकाळ चांगले टिकून राहतात.

Web Title: How to Preserve Amla for months How to Preserve Amla for Long Time How To Preserve Raw Amla Without Making Murabba & Achaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.