Lokmat Sakhi >Food > ६ महिने टिकेल घरी बनवलेली आलं-लसणाची पेस्ट; पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत 

६ महिने टिकेल घरी बनवलेली आलं-लसणाची पेस्ट; पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत 

How to preserve garlic ginger paste : कधी-कधी आलं-लसूण पेस्ट बराच काळ साठवून ठेवल्यावर ती हिरवी होऊ शकते. जर तुम्हाला हे रोखायचे असेल तर पेस्ट बनवताना थोडे व्हिनेगर घाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 02:38 PM2023-02-12T14:38:29+5:302023-02-13T13:17:26+5:30

How to preserve garlic ginger paste : कधी-कधी आलं-लसूण पेस्ट बराच काळ साठवून ठेवल्यावर ती हिरवी होऊ शकते. जर तुम्हाला हे रोखायचे असेल तर पेस्ट बनवताना थोडे व्हिनेगर घाला.

How to preserve garlic ginger paste : 4 Simple Ways to Store Ginger Garlic Paste | ६ महिने टिकेल घरी बनवलेली आलं-लसणाची पेस्ट; पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत 

६ महिने टिकेल घरी बनवलेली आलं-लसणाची पेस्ट; पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत 

स्वयंपाकाला चव येण्यासाठी आलं, लसणाचा वापर केला जातो. या दोन पदार्थांशिवाय कोणत्याही भाजीला चव येत नाही. रोज लसूण सोलणं म्हणजे खूपच किचकट काम.  रोजच्या इतर कामांच्या गडबडीत इतर कामांसाठी लसूण सोलायचं म्हणजे खूपच कंटाळवाणं काम वाटतं. (How to Make and Store Ginger Garlic Paste at Home) एकदाच खूप लसूण सोलून साठवून ठेवले तर रोजचं काम सोपं होतं. लसूण रोज  बारीक  करण्यापेक्षा एकदाच डबाभर पेस्ट बनवून  ठेवली तर कामं पटापट होऊ शकतात. (How to preserve garlic ginger paste) आलं लसणाची पेस्ट दीर्घकाळ  टिकवून ठेवण्यासाठी सोप्या टिप्स पाहूया.

हवाबंद डब्यांचा वापर

हवाबंद डब्यांमुळे अनेक घटक जपून ठेवण्यात मदत होते. ते केवळ वस्तू ताजे ठेवत नाहीत, तर त्यातील सामग्रीचा वास देखील कंटेनरमधून येत नाही. तुम्ही आले-लसूण पेस्ट बनवून हवाबंद डब्यात ठेवू शकता.

जिप लॉक बॅग

आलं लसणाची पेस्ट ताजी ठेवण्याकरीता जिप लॉक बॅगचा वापर करा.  जिपलॉक बॅग एखाद्या एअर टाईट कंटेनरप्रमाणे काम करते.  हा उपाय करताना जिपलॉक बॅक फाटणार नाही याची काळजी  घ्या.

मीठाचा वापर

स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी मीठाचा वापर केला जातो.  त्यामुळे पेस्ट बनवताना त्यात थोडे मीठ आणि तेल टाका. हे पेस्टला जास्त खराब होण्यापासून प्रतिबंधित करते. जर तुम्ही पेस्ट फ्रोजन करत असाल तर ते पूर्णपणे घट्ट होण्यापासून देखील प्रतिबंधित करेल.

व्हिनेगर

कधी-कधी आलं-लसूण पेस्ट बराच काळ साठवून ठेवल्यावर ती हिरवी होऊ शकते. जर तुम्हाला हे रोखायचे असेल तर पेस्ट बनवताना थोडे पांढरे व्हिनेगर घाला.  व्हिनेगर प्रिजरव्हेटीव्ह म्हणून काम करतो.

Web Title: How to preserve garlic ginger paste : 4 Simple Ways to Store Ginger Garlic Paste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.