Lokmat Sakhi >Food > हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकाव्या, सडू नये म्हणून ‘हा’ खास उपाय- मिरच्या लवकर सडणार नाहीत...

हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकाव्या, सडू नये म्हणून ‘हा’ खास उपाय- मिरच्या लवकर सडणार नाहीत...

What is the best way to store green chilies : How to store green chilies so that they would stay for a long : हिरव्या मिरच्या स्टोअर करण्याची एक भन्नाट युक्ती, मिरच्या न सुकता टिकतील दीर्घकाळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 09:00 AM2024-08-02T09:00:00+5:302024-08-02T09:00:01+5:30

What is the best way to store green chilies : How to store green chilies so that they would stay for a long : हिरव्या मिरच्या स्टोअर करण्याची एक भन्नाट युक्ती, मिरच्या न सुकता टिकतील दीर्घकाळ...

How to preserve Green Chillies and prevent them from drying How to store green chilies so that they would stay for a long | हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकाव्या, सडू नये म्हणून ‘हा’ खास उपाय- मिरच्या लवकर सडणार नाहीत...

हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकाव्या, सडू नये म्हणून ‘हा’ खास उपाय- मिरच्या लवकर सडणार नाहीत...

हिरव्या मिरच्या या आपल्याला रोजच्या जेवणात लागतात. जेवणाला झणझणीत चव येण्यासाठी आपण हिरव्या मिरच्यांचा वापर करतो. अगदी चटणी असो किंवा फोडणी हिरव्या मिरचीच्या तडक्याशिवाय त्याला चवच येत नाही. हिरव्या मिरच्यांशिवाय स्वयंपाक करणे शक्यच नाही. भारतात हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. हिरव्या मिरच्यांशिवाय भारतीय जेवण अपुरेच आहे. भाजी, आमटी, डाळ यांना फोडणी देण्यासाठी मिरच्या लागतातच. कोणत्याही पदार्थात हिरव्या मिरच्या घातल्या की त्या पदार्थांची चव अधिकच छान लागते(How to preserve Green Chillies and prevent them from drying).

या हिरव्या मिरच्या रोजच्या वापरात लागतातच त्यामुळे आपण त्या फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतो. परंतु काहीवेळा या हिरव्या मिरच्या अगदी व्यवस्थित स्टोअर केल्या तरीही त्या लवकर खराब होतात. या स्टोअर (How to store green chilies so that they would stay for a long) करुन ठेवलेल्या हिरव्या मिरच्या लवकर खराब होतात किंवा त्यांची चव बदलते. अशावेळी या स्टोअर करुन ठेवलेल्या मिरच्या दीर्घकाळासाठी चांगल्या टिकून राहाव्यात म्हणून आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो. ही ट्रिक फॉलो केल्याने हिरव्या मिरच्या स्टोअर करणे सोपे जाईल, त्याचबरोबर त्या खूप दिवस टिकतील(How to store Green Chillies for months).

हिरव्या मिरच्या स्टोअर करण्याची नवी पद्धत कोणती ? 

१. सगळ्यांत आधी हिरव्या मिरच्यांचे देट काढून घ्यावेत. 
२. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून हळद घालून ही हळद पाण्यांत संपूर्णपणे मिसळून घ्यावी. 
३. त्यानंतर या हळदीच्या पाण्यांत देट काढून घेतलेल्या मिरच्या घालून त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. 
४. मिरच्या स्वच्छ धुवून झाल्यावर एका कॉटनच्या रुमालावर काढून पसरवून ठेवून व्यवस्थित वाळवून घ्याव्यात. या मिरच्यांमध्ये पाण्याचा अंश राहणार नाही याची खात्री करा. 

कुकरच्या झाकणाला पडलेले पिवळे चिकट तेलकट डाग काढण्याचे २ सोपे उपाय, झाकण होईल नव्यासारखे चकचकीत... 


नव्याकोऱ्या भांड्यांवरचे कागदी स्टिकर कसे काढायचे? शेफ पंकज भदौरीया सांगतात १ सोपी युक्ती...

५. त्यानंतर एक प्लॅस्टिकची झिपलॉक बॅग घेऊन त्यात या वाळवून घेतलेल्या मिरच्या भरुन ठेवाव्यात. 
६. या मिरच्या ज्या प्लॅस्टिक झिपलॉक बॅगेत भरुन ठेवत आहात त्यात दोन लसूण पाकळ्या सोलून घालाव्यात. या लसूण पाकळ्यांमुळे त्या मिरच्या लवकर खराब होत नाहीत. लसूण पाकळ्या त्यातील बॅक्टेरियाची वाढ होऊ देत नाही. त्यामुळे मिरच्या दीर्घकाळ चांगल्या टिकून राहतात.    
७. त्यानंतर आपण ही पिशवी फ्रिजरमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवू शकता. 

अशाप्रकारे आपण या हिरव्या मिरच्या दीर्घकाळासाठी स्टोअर करुन ठेवू शकता.

Web Title: How to preserve Green Chillies and prevent them from drying How to store green chilies so that they would stay for a long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.