घरी एखादा धार्मिक कार्यक्रम असेल तर नारळ आवर्जून आणलं जातं. आपण कुठे मंदिरात गेलो तर तिथेही बऱ्याचदा नारळ मिळतं. असं कोणत्या ना कोणत्या निमित्ताने नारळ तर घरात येतं. पण ते फोडणं हे जरा किचकट काम असल्याने आपण ते करायला टाळाटाळ करतो. आज नारळ फोडू, उद्या फोडू असं म्हणत म्हणत कित्येक दिवस उलटून जातात. पण ते नारळ काही आपल्याकडून फोडणं होत नाही. हळूहळू मग नारळातलं पाणी संपूण जातं आणि त्याचं खोबरं होतं (how to preserve unbroken coconut for long). किंवा कधी कधी नारळ आतल्या बाजुने सगळं सडलेलं निघतं. असं होऊ नये आणि नारळ जास्तीतजास्त दिवस फ्रेश राहावं म्हणून काय करायचं ते पाहा...(simple trick to store whole coconut for long)
नारळ जास्तीतजास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी उपाय
नारळ जास्तीतजास्त दिवस फ्रेश राहण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ alshihacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
डब्यांचे झाकण, त्यांचे रबर पिवळट- तेलकट झाले? १ खास उपाय, रबर- झाकण होईल नव्यासारखं चकाचक
यामध्ये असं सांगितलं आहे की नारळ सोलल्यानंतर त्यावर ३ ठिपके दिसतात. त्याला काही ठिकाणी नारळाचे डोळे असंही म्हणतात. या ३ ठिपक्यांच्या भागाला जर नारळाचं पाणी आतल्याबाजुने लागलं नाही तर नारळ बरेच दिवस फ्रेश राहाते. ते सुकतही नाही आणि आतून सडतही नाही. त्यामुळे एक वाटी किंवा कटोरी घ्या आणि नारळाचे ३ ठिपके वर राहतील अशा पद्धतीने ते ठेवा. नारळ बरेच दिवस फ्रेश राहील.
हे देखील लक्षात घ्या
न फोडलेलं नारळ रुम टेम्परेचवर एखादा आठवडा चांगलं राहू शकतं.
हरबरे, राजमा खाल्ल्याने पोट फुगतं- गॅसेस होतात? १ सोपी ट्रिक- बिंधास्त खा, त्रास होणार नाही
हे नारळ जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलं तर ते दोन ते तीन आठवडे फ्रेश राहतं.
आणि जर तुम्ही ते नारळ एखाद्या प्लास्टिकच्या एअरटाईट बॅगमध्ये घालून फ्रिजरमध्ये ठेवलं तर ते तुम्ही २ ते ३ महिने चांगलं ठेवू शकता. एकदा असाही प्रयोग करून पाहा.