Lokmat Sakhi >Food > बिर्याणी पातेल्यात खाली लागू नये म्हणून शेफ कुणाल कपूर सांगतात १ भन्नाट ट्रिक-बिर्याणी करा परफेक्ट...

बिर्याणी पातेल्यात खाली लागू नये म्हणून शेफ कुणाल कपूर सांगतात १ भन्नाट ट्रिक-बिर्याणी करा परफेक्ट...

Chef Kunal Kapoor Share Amazing Trick To Know Biryani Is Burning or Not Without Looking At It : पातेलं न उघडताच कळेल बिर्याणी करपतेय की मस्त शिजतेय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2024 07:54 PM2024-08-29T19:54:49+5:302024-08-29T20:08:21+5:30

Chef Kunal Kapoor Share Amazing Trick To Know Biryani Is Burning or Not Without Looking At It : पातेलं न उघडताच कळेल बिर्याणी करपतेय की मस्त शिजतेय..

How to prevent 'Biryani' from sticking at the bottom of a rice cooker and eventually for it to not burn | बिर्याणी पातेल्यात खाली लागू नये म्हणून शेफ कुणाल कपूर सांगतात १ भन्नाट ट्रिक-बिर्याणी करा परफेक्ट...

बिर्याणी पातेल्यात खाली लागू नये म्हणून शेफ कुणाल कपूर सांगतात १ भन्नाट ट्रिक-बिर्याणी करा परफेक्ट...

'बिर्याणी' फक्त नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटत. 'बिर्याणी' हा भाताच्या प्रकारांमधील सर्वात फेमस पदार्थ आहे. गरमागरम बिर्याणी सोबत पापड, रायतं हे तोंडी लावणारे पदार्थ बिर्याणीची चव आणखीनच वाढवतात. कुठलीही पार्टी असो ती बिर्याणी शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. बिर्याणी म्हटलं की घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. लग्न, पार्टी, सण, वाढदिवस प्रसंग कुठलाही असला तरीही प्रत्येक प्रसंगात परफेक्ट डिश म्हणून बिर्याणीने स्वतःची अशी एक जागा निर्माण केली आहे(Tips to make the Best Biryani Ever)

बिर्याणी मधील भात आणि बिर्याणी ग्रेव्ही या दोन प्रमुख गोष्टींमुळे बिर्याणीला चव येते. काहीवेळा ही चविष्ट बिर्याणी घरच्याघरी तयार करुन अगदी मनसोक्त खावी अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी सुट्टीच्या दिवशी घरच्याघरी बिर्याणी तयार करण्याचा खूप मोठा घाट घातला जातो. त्यानुसार सगळे साहित्य आणून, तयारी करुन फक्कड अशी बिर्याणी केली जाते. ही बिर्याणी तयार झाल्यावर सगळ्यात शेवटी आपण एक तवा गॅसवर ठेवून त्यावर या बिर्याणीचा टोप ठेवून बिर्याणी हळुहळु शिजवून घेतो. परंतु काहीवेळा आपला अंदाज चुकतो आणि आपली बिर्याणी करपू लागते. बिर्याणी काहीवेळा टोपाच्या तळाशी चिकटून बसते. जर का बिर्याणी करपली (secret tips that will help you make the perfect biryani) तर ती टॉपच्या तळाशी चिकटते, सोबतच या बिर्याणीला जळका वास देखील येतो. अशावेळी बिर्याणी खाण्याचा मूडच राहत नाही. त्यामुळे घरच्या घरी बिर्याणी करताना ती करपू नये किंवा टोपाच्या तळाशी चिकटू नये आणि त्याला  जळका वास येऊ नये म्हणून सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूरने (Chef Kunal Kapoor) एक खास ट्रिक शेअर केली आहे. या ट्रिकचा वापर करुन तुमची बिर्याणी अजिबात करपणार नाही तसेच त्याचा जळका वासही दूर करता येऊ शकतो(How to prevent 'Biryani' from sticking at the bottom of a rice cooker and eventually for it to not burn).

बिर्याणी जळू नये म्हणून सुती कापडाची जादू... 

सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूरने बिर्याणी जळू नये म्हणून काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. शेफ कुणाल कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिर्याणीबद्दल छान टिप्स देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त एका सुती कापडाच्या मदतीने बिर्याणी जळणार आहे की नाही किंवा बिर्याणी खाली करपून टोपाला चिकटली आहे का हे आधीच सहज ओळखू शकतो. 

पारंपरिक बेने डोसा फक्त १० मिनिटांत करण्याची पाहा भन्नाट कृती, पारंपरिक साऊथ इंडियन डोसा... 

जेव्हा बिर्याणी गॅसवर शिजण्यासाठी ठेवली असेल तेव्हा तुमच्याजवळ एक सुती कापडाचा मोठा रुमाल हाताशी ठेवा. झाकून ठेवलेल्या या बिर्याणीची वाफ हळुहळु बाहेर येत असते. या बाहेर येणाऱ्या वाफेजवळ हात भाजणार नाही याची काळजी घेऊन हे सुती कापड धरावे. या वाफेवर २ ते ३ मिनिटे हे सुती कापड धरुन ठेवावे. यामुळे त्या वाफेमार्फत आत शिजणाऱ्या बिर्याणीचा वास त्यात सुती कापडात उतरेल. नंतर या सुती कापडाचा वास घेऊन बघावा.

कारल्याची कुरकुरीत भजी खाऊन तर पाहा, भर पावसात कारल्याची भजीही लागतील खमंग...

जर का सुती कापडाला थोडासा हलका करपलेला वास येत असेल किंवा थोडा जळका उग्र वास येत असेल तर लगेच समजावे की बिर्याणी टोपात करपत आहे किंवा करपून खाली लागली आहे. अशावेळी लगेच गॅस बंद करून आधी बिर्याणी गॅसवरुन खाली उतरवून घ्यावी. त्यानंतर बिर्याणी चमच्याच्या मदतीने वरचेवर काढून घ्यावी.  चमचा टोपाच्या तळाशी घालून शेवटापासून बिर्याणी काढू नये, यामुळे करपलेल्या बिर्याणीचा स्वाद संपूर्ण बिर्याणीमध्ये पसरेल. त्यामुळे बिर्याणी करपली आहे की नाही हे तपासण्यासाठी सुती कापडाची ही साधीसोपी ट्रिक नक्की ट्राय करुन पाहा.


Web Title: How to prevent 'Biryani' from sticking at the bottom of a rice cooker and eventually for it to not burn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.