एकवेळ भाजी, वरण, भात या पदार्थांना आपण सुटी देऊ शकतो. पण पोळ्या किंवा चपात्या हा एक पदार्थ आहे ज्याला सहजासहजी सुटी देता येतच नाही. पोळ्या केल्याशिवाय स्वयंपाक पुर्ण होतच नाही. कधीतरी एखाद्या दिवशी पराठ्यांचा अपवाद असू शकतो. काही काही घरांमध्ये तर रात्रीच्या जेवणातही ताज्या, गरमागरम पोळ्या लागतात. अशावेळी त्या घरातली स्त्री सकाळीच दोन्ही वेळच्या पोळ्या होऊ शकतील एवढी कणिक मळून ठेवते. जेणेकरून सायंकाळी पुन्हा कणिक भिजविण्याचं काम पडणार नाही. पण अशी भिजवून फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडते (how to store chapati dough or atta for few hours without getting black) आणि तिच्या पोळ्याही वातड, कडक होतात. असं होऊ नये म्हणून काय करावं ते पाहा.. (tricks and tips for soft rotis)
मळलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर काळी पडू नये म्हणून...
मळून घेतलेली कणिक फ्रिजमध्ये काही तास ठेवल्यानंतरही काळी पडू नये, यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ masalakitchenbypoonam या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जर तुम्ही कणिक मळण्यासाठी बर्फाचं थंडगार पाणी वापरलं तर ती कणिक काळी पडणार नाही.
इमोशनल व्यक्तींच्या डोक्यात नेहमीच खूप कोंडा असतो? बघा केसांत कोंडा होण्याची ५ मुख्य कारणं
दुसरा उपाय असा की कणिक मळताना ती आधी एकदम घट्ट भिजवून घ्या. त्यानंतर तिच्यावर झाकण ठेवून ती ५ ते ७ मिनिटांपर्यंत सेट होऊ द्या. यानंतर आधी घट्ट असलेली कणिक हाताला थोडी मऊ लागेल. आता त्या कणकेवर पुन्हा थोडं पाणी टाका आणि त्यानंतर चांगली मळून घ्या. अशा पद्धतीने मळलेल्या कणकेच्या पोळ्या काही तासांनी केल्या तरी अजिबात वातड होणार नाहीत, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
हे देखील लक्षात घ्या..
१. मळून घेतलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवण्यापुर्वी तिच्यावर थोडासा तेलाचा हात फिरवा.
२. ज्या डब्याचं झाकण अगदी घट्ट बसणारं असेल त्यामध्ये ती कणिक ठेवा.
दिवसाची सुरुवात १ ग्लास पाणी पिऊन करा- ॲसिडीटी, किडनीस्टोनचा त्रास कमी करण्यासह ५ फायदे
३. कणिक फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच पोळ्या लाटायला सुरुवात करू नका.
४. फ्रिजमधली थंडगार कणिक आधी रुम टेम्परेचरला येऊ द्या. त्यानंतर त्या कणकेवर थोडी कोरडी कणिक घाला आणि सगळी कणिक एकदा व्यवस्थित मळून घ्या. हाताला तेल लावून पुन्हा एखाद्या मिनिटासाठी कणिक मळा आणि त्यानंतर त्याच्या पोळ्या लाटा. मऊसूत पोळ्या होतील.