डाळ तांदूळाचा डोसा घरीच बनवायचं म्हटलं की थोडं किचकट काम वाटतं कारण थंडीच्या दिवसात वातावरणात जराही उष्णता नसल्यामुळे डोळ्याचे पीठ लवकर आंबत नाही आणि फुलतही नाही. (Cooking Hacks) बरेचजण तांदूळाच्या पीठाचा डोसा बनवतात. नाश्ता आणि दुपारच्या जेवणाला डोसा खायला अनेकांना आवडते. (Smart Tips To Make Perfect Dosa How to Cook Perfect Dosa) डोश्याचे बॅटर तयार करताना थोडी जरी चूक झाली तर डोसा व्यवस्थित बनत नाही. डोसा व्यवस्थित फुलावा यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरतील. तांदूळाच्या पीठाचा डोसा कसा तयार करायचा ते पाहूया. (How to Prevent Dosa From Sticking)
1) बॅटर तयार करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करू नका (Use Hot Water For Dosa Batter)
तांदूळाच्या पीठाचा डोसा बनवण्यासाठी थंड पाण्याचा वापर करणं टाळा. नेहमी गरम पाण्यानेच बॅटर तयार करा. गर पाण्याचे मिश्रण तयार केल्यास डोसा तुटत नाही. पिठात सगळ्यात आधी गरम पाणी घाला मिक्स करून त्यात भाज्या घाला.
2) तांदूळाचे पीठ जास्त पातळ असू नये (Rice Batter Should Not Be Too Thin)
तांदळाचे पीठ जास्त पातळ किंवा जाड असू नये. डोसा कधी तुटतो तर कधी जास्त जाड राहतो. तव्यात तेल आणि चिला सेट व्हायला वेळ लागतो. जर पीठ पातळ करायचं असेल तर त्यात गर पाणी मिसळा. थंड पाण्यामुळे डोसा तुटू शकतो.
तांदूळाच्या पीठात कधीही जास्त कांदा, टोमॅटोचा वापर करू नका. यामुळे पीठ व्यवस्थित पसरलं जात नाही आणि डोसा तुटण्याची शक्यता असते.
काजू-बदाम सोडा; कॅल्शियम, प्रोटीननं खच्चून भरलीये ही भाजी; हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल
3) तांदूळाचे पीठ भिजवण्याऐवजी तांदूळ भिजवून बॅटर तयार करा ( Don't Use Rice Flour Prepare Batter by Soaking Rice)
तांदूळाच्या पीठाचा डोसा बनवण्यासाठी तांदूळ भिजवून त्याचे बॅटर तयार करून ठेवा. इतर पिठाच्या तुलनेत भिजवलेल्या तांदूळाचा डोसा जास्त चांगला तयार होतो. अन्यथा डोसा तुटण्याची शक्यता असते.
4) तव्याला व्यवस्थित तेल लावा
तव्यात ते मिश्रण घालण्याआधी तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्या. जेणेकरून डोसा अगदी सहज उलटा करता येईल. तव्यातून व्यवस्थित वाफ बाहेर येईल असे पाहा. डोसा उलटा करण्याआधी व्यवस्थित तेला घाला. त्यानंतर तेल घालून डोसा व्यवस्थित पलटून घ्या.
पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? रोजचं जेवण 'या' पद्धतीनं खा, महिन्याभरात चरबी होईल कमी
5) नॉनस्टिक तव्याचा वापर करा
डोसा फिरवताना तुटतो म्हणूनच त्यासाठी नॉन स्टिक तव्याचा वापर करा. डोसा कितीही पातळ असेल किंवा नॉन स्टिक तवा असेल तरी चिकटणार नाही आणि सहज पलटला जाईल.