स्वयंपाक करत असताना आपल्या मनात अनेक प्रश येतात, चिरलेल्या काही भाज्या काळे का बरं पडत असावेत? त्यात मुख्य म्हणजे वांगी. कोणत्याही प्रकारची वांगी असो, चिरल्यानंतर त्या लगेच काळपट पडतात. असे का होते? केळी, सफरचंद, बटाटे यांचं देखील असच आहे. वांगी काळपट पडू नये, यासाठी आपण अनेक उपाय करून पाहिले असतील. त्यापैकी अनेक उपाय फेल देखील ठरले असतील. वांगी चिरल्यानंतर ते लगेच काळे पडू नये, यासाठी या ४ किचन टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे वांगी काळी पडणार नाही, व त्याची चव देखील बदलणार नाही(How to Prevent Eggplant from Turning Brown).
वांगी काळी पडू नये म्हणून उपाय
पाण्यात भिजत ठेवा
वांगी चिरल्यानंतर लगेच पाण्यात भिजत घालून ठेवा, चिरल्यानंतर ती तशीच प्लेटमध्ये ठेऊ नका. यामुळे वांगी लवकर काळी पडणार नाही. फ्रेश दिसतील.
इडलीसाठी डाळ-तांदूळ भिजवताना त्यात घाला १ पांढरीशुभ्र ‘सिक्रेट’ गोष्ट, इडली होईल मऊ-हलकी
दूध
ही पद्धत काही लोकांनाच माहित असेल. एका वाटीत २ चमचे पाणी व एक चमचा दूध घ्या, यात चिरलेली वांगी घालून ठेवा. यामुळे वांगी लवकर काळी पडणार नाही.
लिंबाचा रस
कोणतीही भाजी लवकर काळी पडू नये असे वाटत असे तर, लिंबाच्या रसाचा वापर करा. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या, त्यात एक टेबलस्पून लिंबाचा रस मिक्स करा. त्यात चिरलेली वांगी घालून ठेवा. यामुळे वांगी काळी पडणार नाही.
साखर-तूप-गुळ न घालता करा प्रोटीन लाडू, केस गळणे-थकवा-स्किन प्रॉब्लम्स होतील कमी
व्हिनेगर
चिरलेली वांगी काळी पडू नये, यासाठी व्हिनेगरचा वापर करा. एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात एक मोठा चमचा व्हिनेगर मिक्स करा. त्यात चिरलेली वांगी किंवा इतर चिरलेल्या भाज्या घालून आपण धुवू शकता. यामुळे वांगी लवकर काळी पडणार नाही.