Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात पदार्थ आंबू नयेत म्हणून ५ टिप्स, पदार्थ नासणार नाहीत...

उन्हाळ्यात पदार्थ आंबू नयेत म्हणून ५ टिप्स, पदार्थ नासणार नाहीत...

5 Tips to Prevent Food from Spoiling in Summer Season : उन्हाळ्यात शिजवलेले अन्नपदार्थ लवकर खराब होतात, अशा परिस्थितीत अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आणि ते जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी खालील टिप्स फॉलो करु शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2023 07:14 PM2023-06-02T19:14:47+5:302023-06-02T19:31:51+5:30

5 Tips to Prevent Food from Spoiling in Summer Season : उन्हाळ्यात शिजवलेले अन्नपदार्थ लवकर खराब होतात, अशा परिस्थितीत अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आणि ते जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी खालील टिप्स फॉलो करु शकता.

How to Prevent Food From Spoiling During a Summer Season | उन्हाळ्यात पदार्थ आंबू नयेत म्हणून ५ टिप्स, पदार्थ नासणार नाहीत...

उन्हाळ्यात पदार्थ आंबू नयेत म्हणून ५ टिप्स, पदार्थ नासणार नाहीत...

उन्हाळ्यात उष्णतेमुळे अंगाला येणाऱ्या घामाबरोबरच इतर अनेक समस्यांचा देखील सामना करावा लागतो. या समस्यांपैकी एक सर्वात मोठी समस्या म्हणजे अन्नपदार्थ लगेच खराब होणे. उन्हाळ्यात शिजवलेले अन्न मोठ्या प्रमाणात खराब होत असते. दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे शिजवलेल्या अन्नपदार्थांमध्ये बुरशी वेगाने वाढू लागते. त्यामुळे उन्हाळ्यात शिजवलेले अन्न जास्त काळ ताजे ठेवणे हे एक मोठे आव्हानच असते. पण आता बहुतेकांच्या घरी फ्रिज असल्याने ही समस्या बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे. मात्र कामाच्या गडबडीत अनेकदा अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवायचा राहून जातो आणि तो खराब होतो. 

सगळ्या ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यांत अन्नपदार्थ लगेच खराब होण्याची जास्त शक्यता असते. अशा परिस्थितीत, हे खराब झालेले अन्नपदार्थ फेकून देण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय उरत नाही.  यामुळे अन्नाची फार मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. परंतु उन्हाळ्यात या शिजवलेल्या अन्नपदार्थाची योग्य ती काळजी घेतल्यास किंवा काही सोप्या पद्धतीने स्टोअर करून ठेवल्यास अन्नपदार्थ खराब होण्याच्या या समस्येला आपण आळा घालू शकतो. काही नाशवंत पदार्थ आणि शिजवलेले अन्न यांची योग्य काळजी घेतली तर ते लगेच खराब होत नाहीत. उन्हाळात शिजवलेले अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून काही सोप्या किचन टिप्स लक्षात ठेवूयात(How to Prevent Food From Spoiling During a Summer Season).

उन्हाळात अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून नेमके काय करावे ? 

१. जेवणात गरम मसाल्यांचा वापर कमी करावा :- उन्हाळ्यात गरम मसाले, लसूण, आले मोठ्या प्रमाणात असलेले पदार्थ लवकर खराब होतात. अशा वेळी अन्न दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी शक्य तितके कमी मसाले वापरावेत. यामुळे आपल्या शरीरातील उष्णताही कमी होईल. म्हणूनच आहारतज्ज्ञ उन्हाळ्यात कमी तेलकट आणि मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यांत जेवण बनवताना त्यात गरम मसाल्यांचा वापर थोडा कमी करावा यामुळे अन्नपदार्थ लगेच खराब होत नाहीत. 

आता चिकाच्या दुधाशिवाय बनवा तितक्याच सुंदर चवीचा खरवस...खरवसाची जिभेवर रेंगाळणारी चव...

२. पदार्थांत टोमॅटो, कांद्याचा वापर कमी करावा :- टोमॅटो आणि कांद्याशिवाय कोणत्याही भाज्या किंवा कोणत्याही पदार्थांना चव लागत नाही. पण स्वयंपाकात याचा कमीत कमी वापर केल्याने अन्न जास्त काळ टिकून राहते. जर आपल्याला टोमॅटो, कांद्याशिवाय कोणताही पदार्थ खायला आवडत नसेल तर तुम्ही तो पदार्थ शिजवल्यानंतर तीन ते चार तासांच्या आत खाऊन संपवा, जेणेकरून तो खराब होण्याच्या आत संपवला जाईल. शक्यतो उन्हाळ्यांत अन्नपदार्थांमध्ये टोमॅटो, कांद्याचा वापर कमी करावा म्हणजे पदार्थ लगेच खराब न होता जास्त काळ टिकून राहतो. 

भरली मिरची करण्याची झटपट झणझणीत सोपी रेसिपी, भरली मिरची खाल्लीच नाही तर काय मजा जेवणाची...

३. अन्न वारंवार गरम करू नका :- बहुतेक लोकांना थंड झालेले पदार्थ खायला आवडत नाही. म्हणून ते कोणताही पदार्थ आधी गरम करतात आणि मगच खातात. परंतु कोणताही पदार्थ एकपेक्षा जास्त वेळा गरम केल्यास तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच उन्हाळ्यात अन्नपदार्थ वारंवार गरम करणे टाळा.

४. पदार्थ वेळीच फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवा :- अनेकवेळा फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही अन्न खराब होते. याचे एक सामान्य कारण म्हणजे ते बराच वेळ बाहेर ठेवल्यानंतर स्टोअर केले जाते. यामुळे तज्ज्ञांकडून नेहमी स्वयंपाकाच्या एक ते दोन तासांनंतरच अन्न फ्रिजमध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवण्याची शिफारस करतात. फ्रीजमध्ये जास्त गरम अन्न ठेवल्याने देखील तो पदार्थ लवकर खराब होते. 

काही केल्या इडल्या फुगून येत नाहीत ? वापरा झटपट सोप्या टिप्स... इडली फुगेल पुरीसारखी टम्म...

५. उरलेले अन्नपदार्थ एकमेकांमध्ये मिक्स करू नका :- अनेकांना उरलेले पदार्थ एकाच भांड्यात मिक्स करून ठेवण्याची सवय असते, त्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक शिजवलेला पदार्थ वेगवेगळ्या स्वच्छ भांड्यात स्टोअर करावा, यामुळे पदार्थ जास्त वेळ ताजा राहू शकतो. उरलेले शिळे अन्नपदार्थ एकमेकांमध्ये मिक्स करून ठेवल्यास ते खराब होण्याची शक्यता जास्त असते.

Web Title: How to Prevent Food From Spoiling During a Summer Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न