Join us  

आईस्क्रीम फ्रिजरमध्ये ठेवून सुद्धा विरघळते ? तुम्हीसुद्धा ‘या’ चुका नेहमी करता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2024 8:49 PM

Why Your Freezer Is Not Keeping Ice Cream Frozen : आईस्क्रीम फ्रिजरमध्ये स्टोअर करताना होतात काही बेसिक चुका, म्हणून ते विरघळते, असे होऊ नये म्हणून खास टिप्स...

थंडगार गोड आईस्क्रीम खायला कुणाला नाही आवडणार. घरातील लहान मुलांपासून ते वयस्कर आजी - आजोबांपर्यंत सगळ्यांनाच आईस्क्रीम खायला आवडते. जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटलं की आपण आईस्क्रीम हा पर्यायच निवडतो. आपल्यापैकी काहीजणांच्या फ्रिजरमध्ये आईस्क्रीम कायम स्टोअर करून ठेवलेलं असते. कुल्फी असो किंवा कोन, स्लाइस आईस्क्रीम असो किंवा कँडी आईस्क्रीम, फक्त आईस्क्रीम म्हटलं की कुणीही त्याचा स्वाद घेण्यासाठी एका पायावर तयार असत(The Best Way to Store Ice Cream in Your Freezer).

आईस्क्रीम विकत आणल्यावर ते लगेच विरघळू नये म्हणून फ्रिजरमध्ये स्टोअर करून ठेवावे लागते. हे आईस्क्रीम लगेच व्यवस्थित फ्रिजरमधले स्टोअर करून ठेवले नाही तर विरघळते. त्याचबरोबर उन्हाळ्यात वाढत्या गरमीमुळे हे आईस्क्रीम लगेच विरघळण्याची शक्यता असते. आपल्यापैकी बरेचजण वितळलेले आईस्क्रीम परत गोठवून खातात, परंतु यामुळे त्या आईस्क्रीमची चव बदलते. फ्रिजरमध्ये ठेवलेले आईस्क्रीम वितळलेले असेल तर ते खायला मजा येत नाही, आईस्क्रीम खाण्याचा सगळा मूड ऑफ होतो. यासाठी फ्रिजरमध्ये स्टोअर (Tips on Storing & Handling Ice Cream) करून देखील जर आईस्क्रीम विरघळतअसेल तर ते स्टोअर करताना होणाऱ्या चुका टाळा(How to prevent ice creams melt in Freezer).

१. अशी करा आईस्क्रीम स्टोअर... 

आईस्क्रीम स्टोअर करताना ती फ्रिजमध्ये न ठेवता फ्रिजरमध्ये ठेवा. आईस्क्रीम फ्रिजरमध्ये ठेवताना ती दरवाज्याच्या बाजूला असलेल्या भागामध्ये स्टोअर करून ठेवू नका. फ्रिजरच्या आतील तापमानाच्या तुलनेत दरवाजा जवळचे तापमान तुलनेने कमी असते, ज्यामुळे आईस्क्रीम लगेच वितळू शकते. याचबरोबर जिथे आईस्क्रीम ठेवली आहे त्याच्या बाजूला कोणत्याही उग्र वासाचा पदार्थ ठेवू नये, कारण त्या उग्र पदार्थाचा वास आईस्क्रीमला येण्याची शक्यता असते. यामुळे आईस्क्रीमच्या चवीत देखील बदलू होऊ शकतो. 

२. फ्रिजच्या तापमानावर लक्ष ठेवा... 

बऱ्याच वेळा फ्रिजरमध्ये बर्फ गोठतो पण आइस्क्रीम नाही. तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आईस्क्रीम गोठवण्यासाठी किमान - १२ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. अशा परिस्थितीत, आईस्क्रीम जर वितळत असेल तर आधी फ्रिजचे तापमान चेक करावे. 

३. आईस्क्रीमच्या डब्याचे झाकण लावा... 

आईस्क्रीम डब्यांत ठेवताना डब्याचे झाकण व्यवस्थित लावून घ्यावे. खरंतर, झाकण नीट न लावल्यास आईस्क्रीम हवेच्या संपर्कात येते, त्यामुळे ते वितळण्याची शक्यता अधिक असते. काहीवेळा फ्रिजर खूप रिकामा असल्यानेही फरक पडतो कारण फ्रिजरमध्ये इतर वस्तू असल्याने थंड हवा फ्रिजरमध्ये जमून बसते  आणि आईस्क्रीम गोठून राहते.  

नवाकोरा दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य करण्याची पाहा योग्य पद्धत, फार झंझट नाही - अवघड तर काहीच नाही... 

४. एअर व्हेंटची खराबी... 

बऱ्याच वेळा फ्रिजरमध्ये थंड हवा पुरवणारे एअर व्हेंट नीट काम करत नाहीत, त्यामुळे फ्रिजरमध्ये हवा नीट पसरत नाही. परिणामी, फ्रिजमधील बाकीच्या वस्तू थंड राहतात पण एअर व्हेंटमध्ये दोष असल्यामुळे आईस्क्रीम गोठू शकत नाही. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीकडेही लक्ष द्यावे.

एकदाच बनवून ठेवा हे डोसा प्रिमिक्स आणि अगदी १० मिनिटांत करा उडुपी डोसा...

टॅग्स :अन्नकिचन टिप्स