उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेकांना विविध त्रास उद्भवतात. लोकांना उष्णतेमुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. अन्न पदार्थ देखील लवकर खराब होते. घरात फ्रिज जरी असले तरी, अति उष्णतेमुळे शिजवलेले अन्न पदार्थ खराब होते. मुख्य म्हणजे दूध लवकर फाटते किंवा नासते. काही लोकांकडे फ्रिज नसते, अशा परिस्थितीत दूध कुठे साठवून ठेवावे असा प्रश्न पडतो. ज्यामुळे दुधाची नासाडी होते, व नुकसान होते.
उन्हाळ्यात जर आपल्याला दूध लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर, काही ट्रिक्स आपल्याला मदत करतील. या ट्रिक्समुळे अति उष्णतेतही दूध चांगले टिकून राहेल, व खराब ही होणार नाही(How to prevent milk from spoiling in the summer).
दूध गरम करण्यासाठी स्वच्छ भांडी वापरा
अनेकांच्या घरी दूध गरम करण्यासाठी वेगळी भांडी असते. आपण ज्या भांड्यात दूध गरम करत आहात, ते भांडं स्वच्छ आहे की नाही याची नीट तपासणी करा. कारण काही वेळेला भांड्यात साबण तसेच राहते. त्यामुळे निदान २ वेळा तरी भांड्याला चांगले धुवून घ्या, यानंतर त्यात दूध तापवण्यासाठी ठेवा.
रसाळ आंब्याचा सिझन आला, पण आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे की केमिकल घालून, कसे ओळखाल?
दिवसभरात ४ वेळा दूध गरम करा
उन्हाळ्यात दूध २४ तासात ४ वेळा गरम करा. दूध उकळवत ठेवताना गॅसचा फेम कमी ठेवा. दूध उकळवून झाल्यानंतर लगेच झाकून ठेऊ नका. त्यामधील वाफ कमी झाल्यानंतर झाकून ठेवा. भांडं दुधाने पूर्णपणे भरलेले नसावे, त्यावर थोडी मोकळी जागा ठेवा.
दूध प्यायल्याने वजन वाढते की कमी होते? वजन कमी करताना दूध पिणे फायद्याचे की...
पॅकेटमधील दूध कशाप्रकारे साठवून ठेवाल
बऱ्याचदा पॅकेटमधील दूध लवकर खराब होते. त्यामुळे अनेक जण दूध बाजारातून आणल्यानंतर लगेच तापवण्यासाठी ठेवतात. दूध रूम टेंपरेचर आल्यानंतर तापवावे. दरम्यान, पाश्चराइज्ड दूध जास्त वेळ तापवू नये. कारण कंपनी पॅक करण्यापूर्वी चांगल्या प्रकारे दूध पाश्चराइज्ड करते. जास्त वेळ दूध तापवल्याने त्यातील पोषद्रव्य कमी होते. त्यामुळे हे दूध लवकर संपवून टाकावे.
दुधात घालून खाऊ नयेत ४ गोष्टी, मुलांचंही पोट बिघडेल आणि होईल त्रास
सामान्य तापमानावर असलेले दूध लवकर खराब होते. म्हणूनच खूप गरम किंवा थंड दूध लवकर होत नाही. अशा स्थितीत दूध लवकर खराब होऊ नये, असे वाटत असल्यास दूध गरम करून किंवा थंड ठिकाणी ठेवा.