Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात दह्याला तार सुटते, वास येतो? ४ टिप्स - खराब न होता दही आठवडाभर राहील घट्ट -मस्त

उन्हाळ्यात दह्याला तार सुटते, वास येतो? ४ टिप्स - खराब न होता दही आठवडाभर राहील घट्ट -मस्त

Smart Ways To Store Curd In Summer : Curd Storing Tips In Summer : Smart Ways To Store Curd In Summer And Keep It Fresh For Long : How To Keep Curd Fresh And Creamy In Summer : How To Prevent Souring Of Curd in Summer And Tips To Store it Right : उन्हाळ्यात घरी लावलेलं दही लवकर खराब होऊ नये म्हणून लक्षात ठेवा खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2025 18:36 IST2025-04-23T16:46:04+5:302025-04-23T18:36:57+5:30

Smart Ways To Store Curd In Summer : Curd Storing Tips In Summer : Smart Ways To Store Curd In Summer And Keep It Fresh For Long : How To Keep Curd Fresh And Creamy In Summer : How To Prevent Souring Of Curd in Summer And Tips To Store it Right : उन्हाळ्यात घरी लावलेलं दही लवकर खराब होऊ नये म्हणून लक्षात ठेवा खास टिप्स...

How To Prevent Souring Of Curd in Summer And Tips To Store it Right Smart Ways To Store Curd In Summer And Keep It Fresh For Long How To Keep Curd Fresh And Creamy In Summer | उन्हाळ्यात दह्याला तार सुटते, वास येतो? ४ टिप्स - खराब न होता दही आठवडाभर राहील घट्ट -मस्त

उन्हाळ्यात दह्याला तार सुटते, वास येतो? ४ टिप्स - खराब न होता दही आठवडाभर राहील घट्ट -मस्त

उन्हाळ्यात दही, ताक यांसारख्या शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करतोच. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं दही (Smart Ways To Store Curd In Summer) खायला आवडत. सध्या बाजारांत रेडिमेड दही विकत मिळते, परंतु अजूनही काही घरांमध्ये पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीनेच दही तयार केले जाते. अजूनही ( Curd Storing Tips In Summer) अनेकजणींना विकतचे दही आणण्यापेक्षा घरात दही तयार करण्याची सवय असते( Smart Ways To Store Curd In Summer And Keep It Fresh For Long).

काहीवेळा कडक उन्हाळ्यात, दही व्यवस्थित तयार होत नाही किंवा लवकर आंबट होते आणि खराब होऊ लागते. इतर सर्व गोष्टींप्रमाणे, वातावरणातील उष्णता देखील त्यावर परिणाम करते, म्हणून काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन, आपण त्यात खराब बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखू शकता, जेणेकरून ते लवकर आंबट होणार नाही आणि ते सहजपणे (How To Keep Curd Fresh And Creamy In Summer) दीर्घकाळ ताजे राहील. दही (How To Prevent Souring Of Curd in Summer And Tips To Store it Right) व्यवस्थित सेट करून ठेवले नाही तर दही खराब होण्याची शक्यता अधिक असते. उन्हाळ्यात दही खराब होऊ नये म्हणून ते योग्य पद्धतीने स्टोअर करणे देखील तितकेच महत्वाचे असते. उन्हाळ्यात घरी लावलेले दही खराब होऊ नये म्हणून नेमकं काय करावं ते पाहूयात. 

उन्हाळ्यात दही लवकर का खराब होते ? 

दुधाचे दह्यात रूपांतर करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस आणि स्ट्रेप्टोकॉकस नावाचे बॅक्टेरिया आवश्यक असतात. परंतु जर आपण दूध काही काळासाठी फ्रिजमधून बाहेर ठेवले किंवा व्यवस्थित गरम केले नाही तर, तर हेच बॅक्टेरिया दूध खराब देखील करू शकतात. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेमुळे या बॅक्टेरियांना  वाढण्यासाठी पुरेशी संधी मिळते. यामुळे, उन्हाळ्यात दही पटकन आंबट कोव खराब होते. याचबरोबर दह्याला बुरशी देखील लागू शकते. यासोबतच, काहीवेळा दही योग्य पद्धतीने स्टोअर न केल्यास देखील खराब होऊ शकते. उन्हाळ्यात दही लवकर खराब होऊ नये म्हणून ते योग्य पद्धतीने स्टोअर करणे देखील गरजेचे असते. 

आंबा चिरण्याच्या ७ पद्धती, प्रत्येक फोडीप्रमाणे वेगळी लागेल आंब्याची चव! पाहा कशासाठी - कसा चिराल आंबा...

फक्त ३ पदार्थांत करा १० मिनिटांत दहीकांडी, - बालपणीची आठवण सांगणारा गोड थंडगार पदार्थ...

उन्हाळ्यात दही लवकर खराब होऊ नये यासाठी टिप्स... 

१. उन्हाळ्यात दही स्टोअर करण्यासाठी माती, काचेच्या किंवा सिरॅमिकच्या भांड्यांची निवड करावी. यात दही व्यवस्थित सेट होते तसेच लवकर खराब देखील होत नाही. 

२. उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्त वेळ बाहेर ठेवू नका. दही व्यवस्थित सेट झाल्यावर लगेच फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून त्यांतील बॅक्टेरियाची वाढ होणार नाही आणि दही बरेच दिवस चांगले टिकून राहील. 

३. दही स्टोअर करुन ठेवायचं भांडं स्वच्छ आहे याची खात्री करा. जर भांड खराब असेल तरी देखील दही लगेच खराब होऊ शकत. दही नेहमी स्वच्छ आणि कोरड्या भांड्यात ठेवा. 

साजूक तूप करण्याची पाहा नवी पद्धत, घरचे तूप होईल झटपट आणि छान रवाळ...

४. उन्हाळ्यात दही पटकन खराब होऊ नये म्हणून त्यात चिमुटभर मीठ घालावे. मीठामुळे त्यातील बॅक्टेरियाची वाढ रोखली जाऊन ते दीर्घकाळ चांगले टिकून राहण्यास मदत होते. मीठ अगदी किंचितच घालावे जास्त मीठ घालणे टाळा. 

५. जर तुम्ही ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणासाठी दही घेऊन जात असाल तर ते इन्सुलेटेड डब्यात पॅकिंग करून न्या. यामुळे दही बराच वेळ ताजे आणि थंड राहील. ते खराबही होणार नाही. याचबरोबर, तुम्ही तुमच्या बॅगमध्ये बर्फाची पिशवी देखील ठेवू शकता, यामुळे दही खराब होणार नाही. 

६. जर तुम्ही विकतचे दही आणत असाल तर त्याची एक्सपायरी डेट चेक करूनच मग ते खरेदी करा.

Web Title: How To Prevent Souring Of Curd in Summer And Tips To Store it Right Smart Ways To Store Curd In Summer And Keep It Fresh For Long How To Keep Curd Fresh And Creamy In Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.