स्वादिष्ट आणि हेल्दी जेवणासाठी योग्य भांडी निवडणे आवश्यक असते. भारतीय स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या सर्वात कॉमन भांड्यांपैकी एक म्हणजे लोखंडी कढई. असे मानले जाते की, लोखंडी कढईत शिजवलेले (How To Prevent Vegetables Turning Black In Iron Pan) अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता (How to stop cast iron from turning food black) दूर होते. लोखंडी कढई हे एक पारंपारिक भांड देखील आहे जे विविध भारतीय पदार्थ शिजवण्यासाठी वापरले जाते, ज्यामध्ये मुख्यतः कोरडे पदार्थ किंवा कोरड्या भाज्या बनवल्या जातात. याचबरोबर प्रामुख्याने तळलेले स्नॅक्स, करी आणि तळलेल्या भाज्या बनवण्यासाठी वापरले जाते( how a simple trick can prevent your cast Iron cookware from making food black).
साधारणतः आपण लोखंडी कढईत सुक्या भाज्या करतो. लोखंडी कढईत या भाज्या तयार केल्याने त्यांची पौष्टिकता देखील दुपटीने वाढते. परंतु असे असले तरीही शक्यतो लोखंडी कढईत तयार केलेल्या अन्नपदार्थांचा रंग हा हलकासा काळा होतो. अनेकदा आपण कितीही प्रयत्न करून देखील लोखंडी कढईत शिजवलेले अन्नपदार्थ हे रंगाने काळेच होतात. परंतु आपण काही साध्या सोप्या टिप्स लक्षात ठेवून लोखंडी कढईत शिजवलेल्या अन्नपदार्थांचा रंग काळा होण्यापासून वाचवू शकतो. यासाठीच लोखंडी कढईत अन्नपदार्थ शिजवताना पदार्थांचा रंग काळा पडू नये यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात.
लोखंडी कढईत अन्नपदार्थ तयार करताना काळे पडू नयेत म्हणून...
१. लोखंडी कढईत अन्नपदार्थ तयार केल्यानंतर ते तयार झालेले अन्नपदार्थ त्याच लोखंडी कढईत ठेवू नयेत. लोखंडी कढईत अन्नपदार्थ शिजवून झाल्यावर ते एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावेत, ज्यामुळे त्यांचा रंग काळा पडत नाही.
२. लोखंडी कढईत अन्नपदार्थ शिजवल्यानंतर ती कढई स्वच्छ केल्यानंतर कढई ओली असतानाच त्यात मोहरीचे तेल घालून संपूर्ण कढईला लावून घ्यावे.
ख्रिसमस स्पेशल : महागडा प्लम केक करा घरच्याघरीच, करायला सोपा-खायला टेस्टी, ही घ्या रेसिपी...
३. लोखंडी कढई स्वच्छ केल्यानंतर त्यातील पाणी संपूर्णपणे निथळून जाऊ द्यावेत. याचबरोबर लोखंडी कढई स्वच्छ केल्यानंतर ती संपूर्णपणे पुसून कोरडी करून घ्यावी. लोखंडी कढई ओली ठेवू नये.
४. लोखंडी कढईत अन्नपदार्थ शिजवताना ज्यामध्ये लिंबू, टोमॅटो, चिंच इत्यादी आंबट पदार्थ वापरले जातात असे पदार्थ तयार करु नका. आंबट पदार्थांचा लोखंडी कढईच्या तळाशी प्रक्रिया होऊ शकतात. त्यामुळे अन्नपदार्थांचा रंग गडद होऊ शकतो.
गाजर हलवा तर नेहमीचाच! यंदा हिवाळ्यात गाजराची खीर करुन तर पाहा, सुगंध-चव एकदम भारी...
५. लोखंडी कढईत कोणतीही भाजी शिजवताना अगदी शेवटी मीठ घाला.
६. भाज्या नेहमी मध्यम आचेवर शिजवा आणि जास्त तळू नका.