प्रेशर कुकरचा (Pressure Cooker) वापर बहुतांश घरांमध्ये होतो. त्यात स्वयंपाक केल्याने, पदार्थ लवकर शिजते (Cooking Tips). पण प्रेशर कुकर जस जसा जुना होतो, तस तसं शिट्टीतून (Pressure Cooker Whistle) फसफसून पाणी बाहेर येतं. विशेषतः तांदूळ किंवा डाळ (Kitchen Tips) शिजत असताना, त्यातून पाणी बाहेर येतं. शिट्टीतून डाळ - तांदूळ आणि पाणी बाहेर आल्यामुळे आजूबाजूची भिंत आणि स्टोव्ह खराब होते.
भिंत आणि शेगडी साफ करण्यात बराच वेळ जातो. प्रेशर कुकरमुळे गॅसची बचत होते, पण साफ सफाई करण्याचं डबल काम समोर उभं राहतं. पण प्रेशर कुकरमधून फसफसून पाणी बाहेर का येतं? यावर उपाय काय? याची माहिती रणवीर ब्रार यांनी दिली आहे. पाणी फसफसून येऊ नये म्हणून त्यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. यामुळे नक्कीच समस्येपासून सुटका मिळेल(How To Prevent Water Leakage From Your Pressure Cooker; Ranveer Brar Trick).
शेफ रणवीर ब्रारची हटके किचन टिप्स
सेलिब्रिटी रणवीर ब्रार यांनी एक नुकतीच ट्रिक शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रेशर कुकरमधून फसफसून पाणी येऊ नये, यासाठी माहिती दिली आहे.
- प्रेशर कुकरमधून पाणी येऊ नये, यासाठी डाळ - तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घाला. नंतर पाणी घाला. पाण्यात नंतर तूप घाला. यासोबतच शिट्टीला चारही बाजूने तूप लावा. या हॅकमुळे प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी फसफसून येणार नाही.
- आपण तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. यामुळेही प्रेशर कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी बाहेर येणार नाही.
- याव्यतरिक्त प्रेशर कुकरच्या शिट्टीतून पाणी येऊ नये म्हणून, जास्त प्रेशर कुकरमध्ये जास्त पाणी घालणं टाळावे.
- प्रेशर कुकरमध्ये पदार्थ शिजवताना, गॅस मध्यम आचेवर ठेवावे. यासह वेळोवेळी त्याचे रबर आणि शिट्टी तपासत राहा, कधीकधी शिट्टीमध्ये अन्न अडकते, ज्यामुळे त्यातून पाणी गळते.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
- जर प्रेशर कुकरचं गॅस्केट खराब झालं असेल तर, गॅस्केटही महिन्याला बदलत राहा.
- बऱ्याचदा कुकरचं रबर किंवा सिलिंग योग्य पद्धतीने सेट न झाल्यास कुकरमधलं पाणी बाहेर येतं.
प्रेशर कुकरचा वापर करताना या गोष्टींची काळजी घ्या
- जेव्हा स्वंयपाक कराल तेव्हा कुकरमध्ये जास्त पाणी घालू नका. पाणी नेहमी अर्ध्यापेक्षा थोडं जास्त असावं. गॅस्केट नेहमी तपासत राहा. शिवाय प्रेशर कुकरची शिट्टी देखील नियमित साफ करत राहा.
आवळा मीठ लावून खा, तब्येतीसाठी वरदान ठरणारे केवळ १० रुपयांचा उपाय - तारुण्य टिकेल कायम
- यासह जेवढी प्रेशर कुकरची क्षमता असेल तितकंच साहित्य घाला. जर कुकरचा साईज लहान असेल आणि त्यात जर आपण पदार्थ शिजवत असाल तर, निश्चितच त्यातून पदार्थ बाहेर येईल. त्यामुळे प्रमाण जाणून घेऊन त्यात पदार्थ शिजवावे.