Lokmat Sakhi >Food > स्टीलच्या कढईत पदार्थ लागतो - लवकर करपतो? १ खास ट्रिक, स्टील कढई वापरण्याची योग्य पद्धत...

स्टीलच्या कढईत पदार्थ लागतो - लवकर करपतो? १ खास ट्रिक, स्टील कढई वापरण्याची योग्य पद्धत...

What is the best way to cook with stainless steel pans : स्टीलच्या कढईत पदार्थ करताना ती तळाशी चिकटून राहू नये म्हून ही खास टीप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2024 06:53 PM2024-08-15T18:53:23+5:302024-08-15T19:03:30+5:30

What is the best way to cook with stainless steel pans : स्टीलच्या कढईत पदार्थ करताना ती तळाशी चिकटून राहू नये म्हून ही खास टीप...

How to Properly Cook with Stainless Steel Cookware What is the best way to cook with stainless steel pans? | स्टीलच्या कढईत पदार्थ लागतो - लवकर करपतो? १ खास ट्रिक, स्टील कढई वापरण्याची योग्य पद्धत...

स्टीलच्या कढईत पदार्थ लागतो - लवकर करपतो? १ खास ट्रिक, स्टील कढई वापरण्याची योग्य पद्धत...

आपल्या किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंपासून तयार केलेली भांडी असतात. जेवण स्वादिष्ट होण्यासाठी गृहिणी वेगवेगळ्या धातूंपासून तयार केलेल्या भांड्यांचा वापर करतात. आपण आपल्या रोजच्या वापरात अ‍ॅल्युमिनियम, तांबे, स्टील, काच, लोखंड, सिरॅमिक यांसारख्या धातूंपासून बनवलेल्या भांड्यांचा वापर करतो. शक्यतो सध्या आपण किचनमध्ये स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्वात जास्त करतो. स्टीलचे ग्लास, टोप, वाटी, पेला, कढई अशी भांडी आपल्या रोजच्या वापरात असतात. पूर्वी साधारणतः लोखंडी किंवा अ‍ॅल्युमिनियमची कढई वापरली जायची पण बदलत्या काळानुसार आता सगळेच स्टीलच्या कढईचा वापर करतात(What's The Correct Way To Cook With A Stainless Steel Pan).

स्टीलच्या कढई मध्ये अन्नपदार्थ तयार करताना फक्त एकच अडचण येते ती म्हणजे स्टील कढईच्या तळाशी काही पदार्थ तयार करताना चिकटले जातात. स्टीलच्या कढईमध्ये अन्नपदार्थ तयार करताना ते कढईच्या तळाशी चिकटू नये याची खबरदारी घ्यावी लागते. यासाठी स्टीलच्या कढईत कोणताही पदार्थ बनवण्याआधी ती कढई पदार्थ तयार करण्यासाठी योग्य पद्धतीने तयार आहे की नाही हे तपासून पहाणे गरजेचे असते. स्टीलची कढई पदार्थ बनवण्यासाठी तयार आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण एक साधी सोपी ट्रिक फॉलो करु शकतो. ही ट्रिक फॉलो केल्याने स्टीलच्या कढईचे तापमान पदार्थ तयार करण्यासाठी योग्य आहे की नाही हे तपासून पाहता येईल(Food Sticking to Stainless Steel Pans? 1 Common Mistakes to Avoid)

स्टीलच्या कढईच्या तळाशी पदार्थ चिकटू नये म्हणून... 

स्टीलच्या कढईचे तापमान पदार्थ बनवण्यासाठी योग्य आहे की नाही, तसेच या कढईच्या तळाशी पदार्थ चिकटू नये म्हणून एक ट्रिक momandthebeauty या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे.        

१. स्टीलची कढई गॅसवर ठेवून आधी थोडी गरम करुन घ्यावी. त्यानंतर त्या कढईत अर्धा टेबलस्पून पाणी ओतावे. हे पाणी ओतल्यानंतर जर त्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन क्षणार्धात पाणी कढईतून वाफ होऊन निघून जात असेल तर स्टीलच्या कढईत कोणताही अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्टीलची कढई अजून तयार नाही असे समजावे. असे झाल्यास कढईचे तापमान कोणताही अन्नपदार्थ बनवण्यासाठी योग्य नाही असे समजावे.   

कुकरमध्ये प्रेशर तयार होत नाही? यामुळे अन्नपदार्थ नीट शिजत नाहीत, तुम्हीसुद्धा करता या ३ चुका.... 

२. त्यानंतर कढई आणखीन १० ते १५ सेकंद व्यवस्थित मंद आचेवर तापवून घ्यावी. त्यानंतर पुन्हा कढईत अर्धा टेबलस्पून पाणी ओतावे. हे पाणी ओतल्यावर कढईच्या योग्य तापमानामुळे त्या कढईत पाण्याचे थेंब तयार होऊन कढईच्या पृष्ठभागावर तरंगू लागतील. तेव्हा ही स्टीलची कढई योग्य प्रकारे व्यवस्थित गरम झाली आहे असे समजावे. तसेच असे केल्यावर कढईचे तापमान त्यात कोणताही पदार्थ बनवण्यासाठी योग्य आहे असे समजावे. अशाप्रकारे कढई व्यवस्थित तापमानाला तापवून घेतल्यावर स्टीलच्या कढईच्या तळाशी कोणताच पदार्थ चिकटत नाही.  

स्वयंपाकात आले तर वापरता पण लक्षात ठेवा ४ सोप्या टिप्स, पदार्थाची चव अशी की भूक खवळेल...   

३. यासोबतच स्टीलच्या कढईत कोणतीही सुकी भाजी कमी तेलाचा वापर करून तयार करताना ती कढईच्या पृष्ठभागावर चिकटू नये म्ह्णून त्यात २ ते ३ बर्फाचे लहान खडे टाकावेत. यामुळे स्टीलच्या कढईच्या तळाशी कोणताही पदार्थ चिकटत नाही.


Web Title: How to Properly Cook with Stainless Steel Cookware What is the best way to cook with stainless steel pans?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.