Join us  

पावसाळ्यात धान्यात अळ्या-पोरकिडे होऊन नयेत म्हणून ५ उपाय, धान्य वर्षभर टिकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 3:44 PM

(How to Get Rid of Weevils in Your House : वातावरणात आद्रता असल्यानं धान्यात पोरकिडे होतात किंवा बुरशी लागते.

आजकाल दुकानांमध्ये वेगवेगळ्या पीठांचे वेगवेगळे ब्रॅण्डस  दिसून येतात. पॅकेजबंद पीठात मैदा मिसळला जातो. जे तब्येतीसाठी नुकसानकारक ठरते. घरात गहू, तांदूळ भरून ठेवले तरी त्यांना किड लागते आणि ते पदार्थ लवकर खराब होतात. पावसाळ्यात घरातील धान्य काळजीपूर्वक ठेवावे लागते. (How to Get Rid of Weevils in Your House) वातावरणात आद्रता असल्यानं धान्यात पोरकिडे होतात किंवा बुरशी लागते. बरेच दिवस लक्ष न दिल्यास हे धान्य खाण्यायोग्य राहत नाही. गहू साठवून ठेवण्याच्या किचन ट्रिक्स वापरून तुम्ही  धान्य वर्षभर चांगले ठेवू शकता. (How do you preserve wheat at home know the home remedy for weevils)

१) स्वच्छता

 सगळ्यात आधी व्यवस्थित स्वच्छ करा. नंतर दोन ते चार वेळा  स्वच्छ पाण्यानं धुवून सुकवा. सुकल्यानंतर एका हवाबंद डब्बात ठेवा. धान्याचा डबा स्वच्छ असावा आणि हा डबा तुम्ही ज्या ठिकाणी ठेवणार आहात ती जागा स्वच्छ असेल याची काळजी घ्या.

२) कडूलिंब

कडूलिंबाची पानं किटकनाशकाच्या स्वरूपात कार्य करतात. जर तुम्ही दीर्घकाळ गहू साठवून ठेवणार असाल तर त्यात कडुलिंबाची पानं घाला.  कडुलिंबाच्या  तीव्र वासानं किडे- अळ्या होत नाहीत. कडुलिंबाची फांदी किंवा ३ ते ४ कडुलिंबाची पानं तुम्ही घालू शकता. 

३) गव्हात लसूण ठेवा

लसणाच्या सुगंधानं इतर किडे आजूबाजूला येत नाहीत.  जर तुम्ही गहू घरात साठवत असाल तर पोरकिडे  होऊ नयेत म्हणून तुम्ही त्यात लसूण ठेवू शकता. लसूण सुकल्यानंतर ते काढून पुन्हा ताजे लसूण डब्यात ठेवा.

४) लाल सुक्या मिरच्या ठेवा

धान्यांमध्ये किडे होऊ नये यासाठी डब्यात लाल सुक्या मिरच्या घाला. यात तुम्ही मीठ घालूनही ठेवू शकता. एका कॉटनच्या कापडात मीठ  घालून एका कापडात गुंडाळून ठेवा.

५) तमालपत्र

पीठात तमालपत्रही ठेवू शकता. त्यामुळे पिठात किडे पसरणार नाहीत. तमालपत्राचा तीव्र वास किड्यांना दूरर ठेवतो.

इतर उपाय

- पोर किड्यांपासून बचाव करण्यासाठी रवा हलका भजून घ्या. याशिवाय रव्यात 8 ते 10 लवंगा टाका. यामुळे किटक येणार नाहीत.

- कडधान्ये आणि धान्यांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही माचिस देखील ठेवू शकता. माचिसमध्ये सल्फर असते, जे कीटकांना मारते.

- डाळी हवाबंद डब्यात ठेवा. आता त्यात १-२ चमचे मोहरीचे तेल घालून चांगले मिक्स करा. त्यामुळे डाळ लवकर खराब होणार नाही आणि किडेही पडणार नाहीत.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स