लोणचे हा शब्द ऐकताच तोंडातून पाणी सुटते (Mango Pickle). काहींना कितीही भाज्या असल्या तरी, तोंडी लावण्यासाठी लोणचं लागतेच. लोणचं अनेक प्रकारचे केले जातात. कैरी, गाजर, मिरची इत्यादी (Kairiche Lonche). पण या सगळ्यात अनेकांची पसंती कैरीच्या लोणच्याकडे वळते (Cooking Tips). उन्हाळ्यात कैरीचे लोणचे अधिक प्रमाणात केले जाते. कारण यादरम्यान कैऱ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
अनेकदा कैरीचे लोणचे पटकन खराब होते. कैरीचे लोणचे खराब होण्यामागे अनेक कारणे आहेत. पण कैरीचे लोणचे पटकन खराब होऊ नये, यासह वर्षभर चांगले टिकून राहावे असे वाटत असेल तर, या पद्धतीने लोणचे तयार करून पाहा. चटकमटक चवीचे हे लोणचे कसे तयार करायचे? पाहूयात(How To Quick-Pickle Mango, Step by Step).
कैरीचे लोणचे करण्यासाठी लागणारं साहित्य
कैरी
मोहरी
बडीशेप
ताज्या पोळ्या तासाभरात कडक-वातड होतात? कणिक 'या' पाण्याने भिजवा; परफेक्ट चपात्यांचं सिक्रेट
लवंग
काळीमिरी
मीठ
हिंग
मेथी दाणे
लाल तिखट
हळद
लोणचं मसाला
शेंगदाणा तेल
कृती
सर्वप्रथम, एका पॅनमध्ये एक छोटी वाटी मोहरी, एक छोटी वाटी बडीशेप, ७ ते ८ लवंग, १० ते १२ काळीमिरी घालून भाजून घ्या. मसाले भाजून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. भाजलेला मसाला थोडा थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व जाडसर पावडर तयार करून घ्या.
आता अर्धा किलो फ्रेश कैरी घ्या. कैरी कच्ची आणि कडक असणे खूप महत्त्वाचे आहे. थोडाशी पिकलेली कैरीदेखील लोणच्याची चव खराब करू शकते. त्यामुळे कच्ची आणि कडक कैरी विकत आणून त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. कैरीच्या फोडी स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
इडली दडस होते-डोसे तव्याला चिकटतात? पिठात घाला एक पान; इडली-डोसे होतील परफेक्ट
नंतर त्यात वाटलेली पावडर, ५० ग्रॅम मीठ, एक छोटा चमचा हिंग, एक चमचा मेथी दाणे, २ मोठे चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, ५० ग्रॅम रेडीमेड लोणचं मसाला, चवीनुसार गुळ १०० ग्रॅम कडकडीत गरम करून थंड केलेलं शेंगदाणा तेल घालून हाताने सर्व मिश्रण एकजीव करा. काही वेळानंतर काचेच्या बरणीत लोणचे भरून ठेवा. अशा प्रकारे कैरीचे लोणचे खाण्यासाठी रेडी.