Join us  

बर्थडे केक कटिंगनंतर केकचे एकसारखे-त्रिकोणी पेस्ट्रीसारखे तुकडे पटकन कसे करायचे? सोपी भन्नाट युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2023 2:30 PM

How to quickly cut the cake into equal-triangle pastry pieces : प्रसिध्द शेफ पंकज भदौरिया सांगतात केक कापण्याची सोपी ट्रिक

आजकाल प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे मग तो वाढदिवस असो किंवा कोणतीही पार्टी असो. कोणतंही सेलिब्रेशन म्हटलं की गोड काहीतरी हवंच. जिथे गोडाचा विषय येतो तिथे केक आणि डेझर्ट तर हमखास असतातच. काळानुसार आनंद साजरा करण्याच्या प्रथासुद्धा बदलत गेल्या. पूर्वी आपण घरीच काहीतरी गोडधोड करायचो पण आता आपण घरीच केक बनवतो किंवा लगेच दुकानातून विकत आणतो. पूर्वी केकच आकर्षण जास्त होतं कारण फक्त वाढदिवसालाच घरी केक आणला जायचा. आता मात्र ही गोष्ट पूर्णपणे बदलली आहे. कोणत्याही गोष्टीचं सेलिब्रेशन म्हटलं की आधी आपण केक आणतो.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा केक नुसता पाहिला तरी आपले अर्धे पोट भरते. कितीही काहीही झालं तरी केक कापायची मजा ही अजूनही तशीच आहे, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की, आपण दुकानातून जर पेस्ट्री किंवा कटिंग केक आणला तर त्याचे तुकडे बरोबर त्रिकोणी आकारात कापलेले असतात. परंतु आपण घरी केलेल्या केकचे किंवा आपण विकत आणलेला केक कापताना  त्याचे तुकडे परफेक्ट त्रिकोणी आकारात कापले जात नाहीत. दुकानांत मिळणाऱ्या केकसारखा केक आपण घरी बनवतो खरं पण तो कापताना त्याचे परफेक्ट त्रिकोणी तुकडे व्हावेत यासाठी काय करता येईल ते सुप्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांच्याकडून समजून घेऊयात(How to quickly cut the cake into equal-triangle pastry pieces). 

सुप्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांच्या MasterChef Pankaj Bhadouria या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

 

असे करा केकचे परफेक्ट त्रिकोणी आकारातील तुकडे....

१. केक कापण्यासाठी तुम्ही जो चाकू किंवा सूरी वापरणार आहात ती संपूर्णपणे पाण्यात बुडून जाईल असं एक मोठं भांड घ्या. २. हे भांड गरम पाण्याने संपूर्ण भरा. ३. आता या गरम पाण्यात तुमची सूरी किंवा चाकू ५ ते ७ मिनिटांसाठी बुडवून ठेवा. ४. ५ मिनिटांनंतर सूरी किंवा चाकू गरम पाण्यातून बाहेर काढून टिश्यू पेपर किंवा कोरड्या कापडाच्या मदतीने पुसून घ्या. ५. आता या सूरी किंवा चाकूने केक कापून घ्या. 

ही छोटीशी पण महत्वाची टीप वापरून तुम्ही घरी बनवलेल्या किंवा विकत आणलेल्या केकचे परफेक्ट त्रिकोणी आकारातील तुकडे सहज करू शकता.         

हे पण लक्षात ठेवा... 

१. केकचे परफेक्ट त्रिकोणी आकारातील तुकडे कापण्यासाठी वरील टीपचा वापर तर कराच. त्यासोबतच, केक कापण्याआधी किमान १ तास त्याला रेफ्रिजरेट करून घ्या. यामुळे तुमच्या केकचे परफेक्ट त्रिकोणी आकारातील तुकडे कापण्यास अजून मदत होईल.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स