'पास्ता' हा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच विशेष आवडीचा पदार्थ. आजकाल हमखास प्रत्येक घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे आणि चवीचा पास्ता केला (How to Recognize Good Pasta) जातोच. इटालियन पास्ता सध्या भारतात देखील तितकाच लोकप्रिय होऊ लागला आहे. इटालियन पास्ता वगळता, भारतात आपले घरगुती भारतीय मसाले ( 3 Tips to Buy Pasta Like an Italian) घालून पास्ता तयार करतात. देसी पास्ता खाल्ल्याने पोट (How to Choose High-Quality Pasta for Your Cooking) तर भरतेच, शिवाय चवीलाही भन्नाट लागते. जर आपल्याला भूक लागली असेल, आणि चमचमीत काहीतरी झटपट खाण्याची इच्छा झाली असेल तर, आपण पटकन तयार होणाऱ्या पास्त्याचा सोपा पर्याय निवडतो(Here are 3 tips to recognize good quality pasta).
चमचमीत सॉस, चीज, मसाले वापरून बनवलेला पास्ता म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर चायनीज, इटालियन असे वेगवेगळे क्युझिन आपण मागवत असतो. त्यातही पिझ्झा, पास्ता हे आपले आवडते इटालियन पदार्थ आहेत. पास्ता ही अशी रेसिपी आहे की जी खूप कमी वेळांत झटपट घरी बनवू शकतो. असा हा पास्ता घाई गडबडीच्या वेळी झटपट करुन खाता येईल किंवा भूक लागल्यावर चमचमीत खाता यावे म्हणून अशा अनेक कारणांसाठी तयार केला जातो. बऱ्याच घरांमध्ये पास्ता एकदमच विकत आणून ठेवला जातो. परंतु पास्ता विकत घेताना तो पास्ता अस्सल आहे की नाही तसेच त्यात भेसळ तर नाही ना, अशा काही बेसिक गोष्टी तपासून घ्याव्या लागतात. यासाठी पास्ता खरेदी करताना काही गोष्टींची लक्षपूर्वक काळजी घेऊ आणि त्या नेमक्या कोणत्या हे पाहूयात. cookistwow या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अस्सल- चांगल्या क्वालिटीचा पास्ता कसा ओळखावा याच्या सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत..
अस्सल चांगल्या दर्जाचा पास्ता कसा ओळखावा?
१. रंग :- आपण बाजारांत पाहिले असेल की पास्ता दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये विकायला येतो. पास्त्याचा रंग हा फिकट पिवळा किंवा गडद पिवळा अशा दोन रंगांमध्ये विकायला असतो. यातील गडद पिवळ्या रंगाचा पास्ता हा शक्यतो विकत घेणं टाळावं. कारण अशा गडद पिवळ्या रंगाचा पास्ता हा अतिशय कृत्रिम पद्धतीने वाळवून कोरडा केलेला पास्ता असतो, आणि याच प्रक्रियेमुळे त्याला गडद पिवळा रंग येतो. हा पास्ता खूप जास्त प्रमाणांत कोरडा झालेला असतो. खूप कमी वेळात उच्च-तापमानात इतर कृत्रिम प्रक्रिया करून वाळवल्याने त्या पास्त्याला असा गडद पिवळा रंग येतो. अशाप्रकारे पास्त्याचा गडद पिवळा रंग असेल तर तो विकत घेऊ नये. नैसर्गिकरित्या चांगल्या दर्जाचा पास्ता हा फिकट पिवळ्या रंगाचा असतो.
हिरव्यागार मटारचे पौष्टिक आप्पे - हिवाळ्यातला खास चविष्ट बेत, करायलाही एकदम सोपा बेत...
२. टेक्श्चर :- अस्सल, भेसळविरहित पास्ता हा थोडा खरखरीत असतो. असा पास्ता हातात घेतल्यावर त्याचा पृष्ठभाग हाताला खरखरीत लागतो. पास्त्याला हा खडबडीतपणा ब्रॉन्झ डायजपासून दिला जातो. पास्त्याच्या याच खडबडीतपणामुळे पास्त्याला सॉस चांगले चिकटून राहण्यास मदत होते. यामुळे पास्ता चवीला अधिक जास्तच टेस्टी लागतो. यामुळे पास्ता विकत घेताना तो नेहमी हाताला थोडा खरखरीत किंवा खडबडीत लागेल असाच पास्ता विकत घ्यावा. शक्यतो पास्त्याला लहान बारीक रेषा असलेला ब्रॉन्झ कट असणारा पास्ताचं विकत घ्यावा, प्लेन पास्ता विकत घेऊ नये.
रात्रीचा डाळ - भात उरला ? १५ मिनिटांत करा सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत धिरडं, घ्या सोपी रेसिपी...
३. पास्त्याचा आकार :- पास्ता योग्य पद्धतीने शिजण्यासाठी त्याला त्याचा असा योग्य आणि पुरेसा असा वेळ द्यावा. पास्ता शिजवताना घाई करु नये. पास्ता शिजवताना पाण्याचे प्रमाण योग्य आणि पुरेसे असे पाणी ठेवावे. गॅसची फ्लेम एकदम मोठी करुन पटापट पास्ता शिजवण्याची घाई करु नये. तसेच पास्ता शिजवल्यानंतर, त्याचा मूळ आकार बदलून थोडा वेगळा झाला असेल तर असा पास्ता चांगल्या क्वालिटीचा नाही हे ओळखावे.
हिवाळ्यात स्वस्त मिळतात मटार, घरी ‘असे’ करा फ्रोजन मटार, रंग आणि स्वाद वर्षभर टिकेल...