भाज्यापैकी काही ठराविक भाज्या या आपल्या आवडीच्या असतात तर काही भाज्या नावडत्या असतात. एखादी आवडती भाजी ताटात असली की आपण त्यावर ताव मारतो. तेच जर भाजी आवडती नसली तर आपण भाजी खायला कंटाळा करतो किंवा नाक मुरडतो. त्यातही जर ती भाजी मेथी किंवा कारलं असली तर आणखीनच खायला नको वाटत. खरंतर, मेथी ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. हिरव्या पालेभाज्या खा, असं डॉक्टर वारंवार सांगतात. पालेभाज्या फेश असतील तर त्यांचा शरीरावर चांगला परिणाम होतो. मेथीमध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते आणि त्यातील बायोएक्टिव्ह घटकांमुळे मेथीच्या भाजीमध्ये औषधी गुणधर्म असतात. मेथीचा कडूपणा त्यामध्ये असलेल्या कडू सॅपोनिन प्रोटोडिओसिनमुळे येतो(How to remove the bitterness from fenugreek (Methi) leaves)
आजही अनेकांना मेथीची भाजी किंवा मेथीदाणे खायला (How to get rid of fenugreek bitterness) आवडत नाही. कडू असले तरी कारले ज्याप्रमाणे औषध म्हणून खायला हवे, त्याचप्रमाणे मेथीही कडू (How to reduce the bitterness of fenugreek (methi) असली तरी खायला हवी हे नक्की. सध्या हिवाळ्यात बाजारात सगळ्या भाज्या अतिशय स्वस्त आणि मस्त मिळतात. अशावेळी भरपूर मेथी आणली जाते. मग कधी परतून भाजी, कधी पातळ भाजी, कधी मेथीची कढी तर कधी पकोडे. मेथीचे पराठे आणि पुऱ्या तर नेहमीच्याच. काहीजण मेथी अगदी आवडीने खातात तर काही जण औषध म्हणून पण मेथी कडू लागते म्हणून नाक मुरडणारेही बरेचजण असतात. पण आरोग्यासाठी फायदेशीर असलेली ही मेथीची भाजी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खायला हवी. आता मेथीच्या भाजीचा किंवा पराठ्याचा कडूपणा कमी करण्यासाठी काय करता येईल ते पाहूया(How To Remove Bitterness From Fenugreek Leaves).
मेथीच्या भाजीचा कडवटपणा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय :-
१. लसूण - मेथी, आलू - मेथी अशी एकत्रित भाजी केल्यास मेथीचा कडवटपणा जाणवत नाही. टोमॅटो, कांदे बारीक चिरून त्यात स्वच्छ धुतलेली, बारीक चिरलेली मेथी, वरून हलकसं तेल आणि तिखट, किसलेलं खोबरं, मीठ टाकून सुकी भाजी केल्यास खायला छान लागते. यासगळ्यामुळे मेथीच्या भाजीचा कडवटपणा कमी करता येऊ शकतो.
२. मेथीच्या भाजीला मुळातच थोडासा कडवटपणा असतो. मेथीची भाजी विकत घेताना जर जास्त जाड पाने व गडद हिरवा रंग, उंचीला वाढलेली भाजी व बाजूला न फुटलेली पानाची सरळ जाड काडी असेल तर अशी भाजी जास्त कडवट लागते. याउलट उंचीला छोटी एकाच मुळातून अनेक पालवी फुटलेली एकदम कोवळी पाने, त्याच्या काड्या बारीक असलेली अशी भाजी विकत घेतल्यास ती चवीला जास्त कडवट लागत नाही.
साखर नको म्हणून गूळ खाता ? पण तुम्ही खाता आहात तो गूळ योग्य आहे का ?
३. मेथीची कोणत्याही प्रकाराने भाजी करत असाल तरी त्यात थोडीशी चवीपुरती साखर घातली तर हा कडवटपणा दूर होण्यास मदत होते.
४. मेथीचे पराठे करताना मेथी थोडी परतून घेतल्यास पीठ मळणे सोपे जाते. पीठ एकजीव होते आणि पराठे कोरडे आणि कडवट न होता अतिशय लुसलुशीत होण्यास मदत होते.
५. मेथीची परतून भाजी किंवा पराठे करताना मेथी निवडल्यानंतर ती चिरु नये. भाजी किंवा पराठे, पुऱ्या करण्यासाठी पूर्ण पाने धुवून तशीच्या तशी वापरावीत. त्यामुळे मेथी कडू लागत नाही.
६. मेथीची परतून भाजी भाजी करताना त्यामध्ये कांदा जास्त प्रमाणात घालावा म्हणजे मेथीचा कडवटपणा मारला जातो. तसेच यामध्ये तुम्ही दाण्याचा कूट किंवा ओले खोबरे यांचाही वापर करु शकता. याबरोबरच मूगाची भिजवलेली डाळ आणि लसूण घालूनही आपण मेथीची परतून भाजी करु शकतो. लसूण आणि मूग डाळ यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते.
विकतच्या मेदूवड्याला असतो तसा गोल आकार जमत नाही ? २ झटपट ट्रिक्स, करा उडपीस्टाइल वडा...
७. मेथीच्या पानांमधील कडूपणा दूर करण्यासाठी आपण लिंबाचा देखील वापर करु शकता. यासाठी उकळलेल्या पाण्यात २ चमचे लिंबाचा रस मिसळा आणि त्यात चिरलेली मेथीची पाने ५ मिनिटे भिजवा. नंतर थंड पाण्याने धुवून वापरा. यामुळे मेथीचा कडवटपणा दूर होतो.
८. मेथीची भाजी कापल्यानंतर, मिठाच्या पाण्यात किमान २० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे मेथीच्या पानांमधील कडूपणा बर्याच प्रमाणात दूर होतो.
९. मेथीची भाजी निवडण्याची पद्धत देखील त्याच्या कडूपणाचे कारण ठरु शकते. जर आपण मेथीची भाजी त्याच्या देठासकट कापली तर ती चवीला अधिक कडू लागेल, म्हणून, फक्त त्याची पाने नेहमी कापून वेगळी करावी.