Lokmat Sakhi >Food > डाळ, वरण खाल्लं की ॲसिडिटी होते, घशाशी येतं, पोट फुगतं? डाळ शिजवताना करा ४ गोष्टी

डाळ, वरण खाल्लं की ॲसिडिटी होते, घशाशी येतं, पोट फुगतं? डाळ शिजवताना करा ४ गोष्टी

How to Reduce Gas from Eating Lentils : चण्याची डाळ खाल्ल्यानं पोटात गॅस तयार होतो. ही डाळ पचायला कठीण असते.  चण्याची डाळ रात्री खाणं टाळून दिवसा खायला हवी.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 01:33 PM2023-04-24T13:33:56+5:302023-04-24T14:33:33+5:30

How to Reduce Gas from Eating Lentils : चण्याची डाळ खाल्ल्यानं पोटात गॅस तयार होतो. ही डाळ पचायला कठीण असते.  चण्याची डाळ रात्री खाणं टाळून दिवसा खायला हवी.

How to Reduce Gas from Eating Lentils : How to Make Beans and Lentils Less Gassy | डाळ, वरण खाल्लं की ॲसिडिटी होते, घशाशी येतं, पोट फुगतं? डाळ शिजवताना करा ४ गोष्टी

डाळ, वरण खाल्लं की ॲसिडिटी होते, घशाशी येतं, पोट फुगतं? डाळ शिजवताना करा ४ गोष्टी

तब्येतीला उत्तम म्हणून रोजच्या जेवणात डाळींचा समावेश करणं फार महत्वाचं आहे. डाळीत प्रोटीन्स, मिनरल्स, व्हिटामीन्स असतात. अनेकांना जेवणात डाळ भात असल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही. अनेकांसाठी डाळ पचायला जड जाते. म्हणून ते रात्री डाळ खाण्याऐवजी दुपारी डाळ खाणं पसंत करतात. (How to Reduce Gas from Eating Lentils) डाळ हे उच्च प्रथिनयुक्त आहार आहे तरी डाळ खाल्ल्यानंतर अनेक वेळा गॅसची समस्याही सुरू होते, काहीजणांचे पोट फुगते, डाळी खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्सची समस्या सुरू होते. अशा स्थितीत काही डाळींचे सेवन करू नये. (know about the three rules of eating pulses or dals)

चण्याची डाळ खाल्ल्यानं पोटात गॅस तयार होतो, ही डाळ पचायला कठीण असते.  चण्याची डाळ रात्री खाणं टाळून दिवसा खायला हवी. उडीदाची डाळही पचायला वेळ लागतो. म्हणून पचनाचे त्रास असलेल्यांनी उडीदाची डाळ खाणं टाळायला हवं. जर तुम्हाला रात्री डाळ खायची असेल तर मुगाची डाळ खा कारण ही डाळ पचायला हलकी असते. मुगाच्या  डाळीत पोषक घटकही असतात. मुगाच्या डाळीचा डोसा किंवा खिचडी तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. (How to Make Beans and Lentils Less Gassy)

डाळ बनवण्याची योग्य पद्धत कोणती?

1) डाळ भिजवून ठेवा- डाळ बनवण्यासाठी रात्रभर  कमीत कमी १२ तास पाण्यात भिजवून ठेवा. असं केल्यानं डाळीतील फायटिक एसिड निघून पोटाचे त्रास उद्भवत नाहीत.

2) कोमट पाणी- डाळ शिजवण्याआधी कोमट पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी जास्त गरम किंवा थंड असू नये. उकळत्या पाण्यात तुम्ही लिंबू पिळूनही घालू शकता. डाळ शिजवण्याआधी हे पाणी बदलून घ्या.

3)उच्च आचेवर शिजवून नका- डाळ कधीही उच्च आचेवर शिजवू नका. डाळ नेहमीच मंद आचेवर शिजवा. यामुळे डाळ चांगली शिजेल आणि पचायलाही चांगली ठरेल.

4) मसाल्यांचा वापर - डाळ शिजवताना त्यात मसाल्यांचा वापर करता. यामुळे चव वाढेल आणि पोटाचे त्रासही दूर राहतील. डाळ बनवताना त्यात काळी मिरी, जीरं, हिंग, धणे, दालचिनी हे मसाले घाला. यामुळे त्यातील गॅस तयार करणारे घटक  निघून जाण्यास मदत होईल.

Web Title: How to Reduce Gas from Eating Lentils : How to Make Beans and Lentils Less Gassy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.