Join us  

कारल्याचा कडवटपणा काही केल्या कमी होतच नाही? २ मस्त उपाय, कडू कारले होईल एकदम चमचमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2023 3:05 PM

How To Reduce The Bitterness Of Bitter Gourd?: तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच... असं कारल्याची भाजी करताना तुमचंही होत असेल तर हे काही उपाय एकदा करून पाहाच...

ठळक मुद्दे कारल्याची भाजी किंवा कारल्याचा कोणताही पदार्थ करण्यापुर्वी या ट्रिक्स एकदा करून पाहा.

काही जणींच्या हातची कारल्याची भाजी अजिबातच कडू होत नाही. तर काही जणींच्या हातच्या कारल्याचा भाजीचा कडवटपणा जाता जात नाही. मग असं झालं की आपल्याला प्रश्न पडतो की कारल्याचा कडवटपणा जाण्यासाठी त्या नेमक्या काय करत असाव्यात.... त्याच प्रश्नाचं सोप्पं उत्तर आता आपण जाणून घेणार आहोत. कारल्याची भाजी किंवा कारल्याचा कोणताही पदार्थ करण्यापुर्वी या ट्रिक्स एकदा करून पाहा. यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल. कारण कडू कारलं अतिशय पौष्टिक असतं. ते पोटात गेलंच पाहिजे. (How to reduce the bitterness of bitter gourd?) म्हणूनच कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून हे २ उपाय करून पाहा... (How to make bitter gourd sabji more delicious?)

 

कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून काय करावं....

१. मीठ

मीठाचा वापर करून कारल्याच्या भाजीचा कडवटपणा निश्चितच कमी करता येतो. भाजी करण्यासाठी तुम्ही कारल्याचे काप करता. ते काप एका भांड्यात घ्या आणि त्या कारल्याच्या फोडींवर मीठ घाला.

पालेभाजी घेतली पण निवडायला वेळच मिळेना? २ उपाय, निवडून न ठेवताही भाजी चांगली टिकेल

फोडींवर मीठ घातल्यानंतर त्या हलक्या हाताने थोड्या चोळून घ्या. जेणेकरून मीठ फोडींना व्यवस्थित लागले जाईल. त्यानंतर १० ते १५ मिनिटे फोडी तशाच मिठात राहू द्या. नंतर कारल्याला पाणी सुटलेलं दिसेल. पाणी भांड्यात तसंच राहू द्या आणि फोडी उचलून त्याची भाजी करा. भाजीमध्ये कारल्याचा कडवटपणा जाणवणार नाही.

 

२. लिंबू

हा उपाय वरीलप्रमाणेच करायचा आहे. त्यासाठी आधी वर सांगितल्याप्रमाणे फोडींवर मीठ लावा आणि नंतर लिंबू पिळा. मीठ आणि लिंबू एकत्रितपणे कारल्याच्या फोडींवर चोळून घ्या.

झाडं लावण्याची हौस, पण बागेची काळजी घ्यायला वेळच नाही? ही ५ 'लो मेंटेनन्स' झाडं लावा- बाग छान फुलेल!

ते मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर त्या कारल्याची भाजी करा. भाजी कडू तर होणार नाहीच, पण त्याला लिंबाचा एक वेगळाच चवदार स्वादही लागेल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स