कोणताही पदार्थ तयार करताना त्याची चव अगदी परफेक्ट होण्यासाठी आपण त्यात वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करतो. कोणताही पदार्थ तयार करताना त्यात आपण काही पदार्थ हे आवर्जून घालतोच. या पदार्थांमध्ये मीठ, हळद, लाल तिखट अशा पदार्थांचा समावेश होतो. भाजी, आमटीपासून ते अगदी पुलाव भातापर्यंत सगळ्या पदार्थांना परफेक्ट रंग आणि टेस्ट येण्यासाठी आपण त्यात हळद घालतो. हळदीमुळे पदार्थाची चव आणि रंग यात अधिक भर पडते. पदार्थांमध्ये आपण हळद चिमूटभरच घालतो. पदार्थ तयार करताना त्यात घातल्या जाणाऱ्या सगळ्या पदार्थांचे प्रमाण हे योग्य असले पाहिजे(Excess Turmeric In Your Food? 5 Tips To Salvage The Dish).
एखादा जरी पदार्थ कमी जास्त झाला तरीही पदार्थाच्या चवीत खूप मोठा बदल होतो. रोजचा स्वयंपाक करताना आपण त्यात हळद घालतो. परंतु काहीवेळा कामाच्या घाई गडबडीत आपल्याकडून चुकून हळद जास्त घातली जाते. पदार्थांत जास्तीची हळद पडल्यास पदार्थ बिघडून त्याला हलकीशी कडवट चव येते. अशावेळी तो पदार्थ खावासा वाटत नाही. आपल्याकडून जर कधी घाईगडबडीत चुकून एखाद्या पदार्थात हळद जास्त झाल्यास काही सोप्या टिप्स वापरून आपण या जास्त झालेल्या हळदीची चव बॅलेन्स करु शकतो. जेणेकरुन पदार्थातील हळदीची चव व्यवस्थित बॅलेन्स होऊन पदार्थाच्या मूळ चवीत बदल होणार नाही(how to reduce turmeric taste in food).
स्वयंपाक करताना चुकून हळद जास्त पडली तर...
१. टोमॅटो किंवा लिंबाचा रस :- जर एखाद्या पदार्थामध्ये हळद जास्त झाली तर आपण त्यात टोमॅटोची प्युरी किंवा लिंबाचा रस घालू शकता. हळदीचा तिखट, उग्र स्वाद आणि सुगंध कमी करण्यासाठी त्यात टोमॅटोची प्युरी किंवा लिंबाचा रस घालू शकता.
२. नाराळाचे दूध :- नाराळाचे दूध अनेक पदार्थांमध्ये वापरलं जातं. आपल्या पदार्थांत हळद अधिक प्रमाणात घातली गेली असेल तर आपण नाराळाचे दूध घालून ते बॅलेन्स करु शकता.
३. कच्चे बटाटे :- पदार्थात कच्चे बटाटे घातल्याने मीठ आणि हळद बॅलेन्स करण्यास मदत होते. एका कच्च्या बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करुन ग्रेव्हीत घालावे आणि ५ मिनिटे मंद आचेवर पदार्थ शिजवून घ्यावा. बटाटा हळद आणि मीठ शोषून घेण्यास मदत करेल आणि पदार्थ फसणार नाही.
४. मलई किंवा दही :- दही, मलई किंवा दूध यासारखे दुग्धजन्य पदार्थ हळदीची तिखट चव कमी करण्यास मदत करतात. या घटकांमध्ये असलेले फॅट्स चवीला अशा प्रकारे संतुलित करतात की हळदीचा कडूपणा कमी होतो.
आंबटगोड चिंच टिकेल वर्षभर, पाहा पारंपरिक पद्धत - चिंच पावसाळ्यातही खराब होणार नाही...
५. आमचूर पावडर किंवा आवळा पावडर :- अनेक पदार्थांमध्ये आंबटपणा यावा म्हणून आमचूर पावडर घातली जाते. तसेच आंबट पावडर हळदीचे स्वाद सुंतलित करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.