Join us

साचवून ठेवलेल्या तुपाला काही दिवसांनी कुबट वास येतो? तुपात २ पदार्थ मिसळा, तूप छान राहील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 18:10 IST

How To Keep Ghee Fresh & Fragrant : Best ways & tips to store ghee to make it last long : How To Keep Ghee Smell As Fresh As Day One For A Long Time : Old smelly ghee re-process fresh aromatic : How to remove Bad smell from Ghee : जर तूप दीर्घकाळ स्टोअर करुन ठेवायचे असेल तर त्यात मिसळा खास दोन सिक्रेट पदार्थ... तुपाला खराब दुर्गंधी येणार नाही...

'तूप' हा नेहमीच्या जेवणात वापरला जाणारा खास (How To Keep Ghee Fresh & Fragrant) पदार्थ आहे. वरण - भात, पोळी, खिचडी यांसारख्या गरमागरम पदार्थांवर आपण तूप घालून खातो. तूप हे रोजच्या रोज स्वयंपाक करण्यासाठी लागते म्हणून ते मोठ्या प्रमाणांत पुरवठ्याला येईल असे साठवले जाते. तूप हे आपण काहीवेळा (How To Keep Ghee Smell As Fresh As Day One For A Long Time) घरीच बनवतो तर काहीवेळा ते बाहेरुन विकत आणतो. बाहेरून विकत आणलेले तूप हे बरेचदा महाग असते व ते तितकेसे पुरवठ्याला येत नाही. अशा परिस्थितीत, गृहिणी घरीच तूप तयार करण्याला प्राधान्य देतात(How to remove Bad smell from Ghee).

आजही कित्येक घरात दुधावरची साय साचवून त्याचे तूप तयार केले जाते. तूप (Old smelly ghee re-process fresh aromatic) बनवून तयार झाल्यानंतर आपण ते एका मोठ्या काचेच्या स्वच्छ बरणीत स्टोअर करुन ठेवतो. परंतु काहीवेळा आपला ओला हात लागून किंवा इतर काही कारणांमुळे हे तूप खराब होते किंवा काहीवेळा या तुपाला कुबट असा वास येऊ लागतो. तूप व्यवस्थित साठवून (Here Is Your Guide To Store Ghee In The Right Way) ठेवले नाही तर त्याला बुरशी लागते, किंवा दीर्घकाळ तूप स्टोअर करून ठेवल्यास त्याला कुबट वास येऊ लागतो. असे खराब - कुबट वास येणारे तूप फेकून द्यावे लागते. तूप बनवून झाल्यानंतर ते दीर्घकाळ स्टोअर करायचे असेल आणि त्याला कुबट - घाणेरडा वास येऊ नये म्हणून आपण त्यात खास दोन पदार्थ मिसळून ठेवू शकतो.   यामुळे तूप खराब देखील होत नाही किंवा तूप दीर्घकाळ स्टोअर करून देखील त्याला कुबट वास येत नाही. 

दीर्घकाळ स्टोअर करून ठेवलेल्या तुपातून कुबट दुर्गंधी येऊ नये म्हणून... 

बरेचदा घरातील गृहिणी तूप पुरवठ्याला यावे यासाठी एकदाच भरपूर प्रमाणात तूप करून स्टोअर करून ठेवतात. याचबरोबर तूप तयार करण्याची प्रक्रिया ही थोडी किचकट आणि भरपूर वेळखाऊ असते. यासाठी, तूप एकदाच भरपूर प्रमाणांत तयार करून साठवले जाते. परंतु अशाप्रकारे तूप एकदाच तयार करून दीर्घकाळ स्टोअर करून ठेवले तर त्याला काही कालावधी नंतर कुबट वास येण्याची शक्यता असते. यामुळे काहीवेळा तुपाला कुबट - घाणेरडी दुर्गंधी येऊन त्यातील ताजेपणा कमी होऊन तुपाची चव देखील बदलू शकते.

‘आवळा राईस’ नाही खाल्ला हिवाळ्यात? आवळा म्हणजे आरोग्यासाठी अमृत, ही घ्या रेसिपी...

यासाठीच दीर्घकाळ स्टोअर करून ठेवलेल्या तुपाचा ताजेपणा कमी होऊ नये किंवा त्याला कुबट दुर्गंधी येऊ नये म्ह्णून आपण त्यात गुळाचा खडा किंवा चमचाभर मीठ घालून स्टोअर करून ठेवू शकतो. 

ढोकळा कायम फसतो, फुगतच नाही? ८ टिप्स- विकतपेक्षा हलका ढोकळा करा घरच्याघरीच...

दीर्घकाळ स्टोअर करून ठेवलेल्या तुपाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी त्यात गुळाचा खडा किंवा चमचाभर मीठ घालून त्याचा हरवलेला ताजेपणा आणि पुन्हा आणू शकता. तुपात गुळाचा खडा किंवा चमचाभर मीठ घातल्याने तूप पुन्हा पहिल्यासारखे फ्रेश तर होतेच शिवाय त्यातून येणारा कुबट वास देखील कमी होतो.

गुळातील गोडवा आणि इतर पोषक घटक तुपातील बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत करतात, ज्यामुळे तूप खराब न होता जास्त काळ चांगले राहते. याशिवाय, मीठ तुपातील ओलावा शोषून घेण्यास मदत करते, त्यामुळे तूप खराब होण्यापासून रोखले जाते. 

तोंडी लावण्यासाठी करा हिवाळा स्पेशल हिरव्यागार ओल्या लसणाच्या पातीचा ठेचा, घ्या झणझणीत झटपट रेसिपी...

तुपात गूळ आणि मीठ मिसळणे ही एक नैसर्गिक पारंपरिक पद्धत आहे. पण त्यामुळे तुपाच्या चवीवर कोणताही परिणाम होत नाही. उलट ते तुपाचा सुगंध आणि चव आणखीनच वाढवण्यास मदत करते. तुपाचा ताजेपणा आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे, जो तुम्ही घरी अगदी सहजपणे करु शकता.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.