Join us  

अरे बापरे भात करपला? भाताचा जळका वास झटपट घालवण्यासाठी ५ टिप्स, जळका वास गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 3:46 PM

How to remove burnt rice smell भात खाली लागला, जळाला-करपला तर भाताला जळका वास येतो, तो खावासा वाटत नाही, पण भात फेकणार कसा? त्यावर हे उपाय..

किचनमध्ये कधी - कधी गृहिणींची धांदल ही उडतेच. कितीही लक्ष देत आपण पदार्थ बनवत असलो तरी, कोणती न कोणती चूक ही घडतेच. दूध उतू जाणे, फोडणी घालताना मीठ - तिखटचे प्रमाण कमी - जास्त होणे, भात शिजताना करपणे. या समस्या किचनमध्ये गृहिणींसोबत घडतात. मुख्य म्हणजे थोडे फार भात शिजत असताना, आपले लक्ष विचलित झाले की, भात करपतो.

भात करपला की, संपूर्ण भातामधून करपलेला वास सुटतो. हा वास सहसा निघत नाही. भात खाताना देखील करपलेली चव भातामध्ये उतरते. अशा परिस्थितीत भात करपल्यावर काय करावे? हे आपल्याला चटकन सुचत नाही. आपल्याला जर भातामधून करपलेला वास काढायचा असेल तर, काही टिप्स आपल्याला मदत करतील. या टिप्समुळे भातामधील करपलेला वास निघून जाईल. व भात चवीला उत्तम लागेल(How to remove burnt rice smell).

कणिक मळून ठेवली की काळी पडते? ४ टिप्स, सकाळी मळून ठेवली तरी कणिक दिसेल ताजी

कांद्याच्या मदतीने घालवा वास

जळलेल्या भाताचा वास काढण्यासाठी आपण कांद्याचा वापर करू शकता. यासाठी कांद्याचे चार भाग करा. कांदा कापताना त्याची साल काढू नका. आता कांद्याचे काप भातावर ठेवा, व त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. यानंतर झाकून उघडून कांदा बाहेर काढा. या उपायामुळे भातामधून जळालेला वास निघून जाईल. आता आपण खालील जळालेला भाग सोडून वरील भाग खाऊ शकता.

भातामधून जळालेला वास काढण्यासाठी तुपाचा वापर करा

तुपाचा वापर फक्त फोडणीसाठी नाही तर, भातामधून जळालेला वास काढण्यासाठीही होऊ शकतो. यासाठी करपलेला भाग सोडून वरील पांढरा भाग एका प्लेटमध्ये काढून घ्या. एका कढईत तूप गरम करा, त्यात जिरं घाला. जिरं तडतडली की त्यात पांढरा भात मिक्स करा. अशा प्रकारे आपला साधा सोपा जीरा राईज रेडी होईल. यासह त्यातून करपलेला वासही निघून जाईल.

मोकळा-चविष्ट परफेक्ट पुलाव करण्यासाठी योग्य तांदूळ कसा निवडायचा? कोणता तांदूळ पुलावासाठी चांगला

लसणाच्या वापरामुळे निघून जाईल वास

लसणाच्या छोट्या पाकळ्या संपूर्ण पदार्थाची रंगत वाढवते. भातामधून करपलेला वास घालवण्यासाठी एका कढईत तेल किंवा तूप गरम करा. त्यात लसणाच्या पाकळ्या भाजून घ्या. आता हे मिश्रण करपलेल्या भातावर घाला, व त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. अशाप्रकारे भातामधून करपलेला वास निघून जाईल.

जळालेल्या भातावर ब्रेडचे तुकडा ठेवा

भातामधून करपलेला वास घालवण्यासाठी भातावर ब्रेडचा तुकडे ठेवा, व त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. अशा प्रकारे ब्रेड करपलेला वास शोषून घेईल. ज्यामुळे भातामधून करपलेला वास निघून जाईल.

भातामधून जळालेला वास काढण्यासाठी बटाट्याचा वापर करा

भात करपला की, संपूर्ण भातामधून करपूस वास येतो. हा वास घालवण्यासाठी आपण बटाट्याचा वापर करू शकता. भात शिजत असताना करपला असेल, तर भातावर बटाट्याचे काप ठेवा. यानंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.  अशाप्रकारे बटाटा करपलेला वास शोषून घेईल. व भातामधून करपलेला वास निघून जाईल.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.