Lokmat Sakhi >Food > गडबडीत दूध करपले? ६ सोपे उपाय, करपलेल्या दुधाचा वास काही मिनिटात जाईल उडून...

गडबडीत दूध करपले? ६ सोपे उपाय, करपलेल्या दुधाचा वास काही मिनिटात जाईल उडून...

How to remove burnt smell & taste from milk : How to remove burnt smell in milk : सकाळच्या घाई गडबडीत दूध हमखास करपत, अशा करपट दुधाचा वास घालवण्यासाठी उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 07:04 PM2024-08-22T19:04:53+5:302024-08-22T19:23:23+5:30

How to remove burnt smell & taste from milk : How to remove burnt smell in milk : सकाळच्या घाई गडबडीत दूध हमखास करपत, अशा करपट दुधाचा वास घालवण्यासाठी उपाय...

How to remove burnt smell & taste from milk Smart hacks to fix burnt milk Trick To Remove Smell From Burnt Milk | गडबडीत दूध करपले? ६ सोपे उपाय, करपलेल्या दुधाचा वास काही मिनिटात जाईल उडून...

गडबडीत दूध करपले? ६ सोपे उपाय, करपलेल्या दुधाचा वास काही मिनिटात जाईल उडून...

'दूध' हे नेहमी आपल्याला लागतेच. आपल्या सगळ्यांच्याच घरी रोज सकाळी दूध आणले जाते. दिवसभरात चहा करायचा म्हटलं की दूध लागतेच. सकाळी दूध आणल्यानंतर ते सर्वात आधी आपण गरम करतो, नंतरच त्या गरम दुधाचा वापर करतो. सकाळी घाई  गडबडीच्या वेळी दूध गरम करायला ठेवणे हा खूप मोठा टास्कच असत. काहीवेळा कामाच्या गडबडीत दूध गॅसवर ठेवले आहे याचा आपल्याला विसर पडतो. यामुळे दूध गरजेपेक्षा जास्त गरम होऊन करपते किंवा भांड्याच्या तळाशी लागते. याचबरोबर काहीवेळा हे दूध ओतू देखील जाते(How to remove burnt smell in milk).

दूध ओतू गेलं तर थोडं दूध वाया जात परंतु दूध जर का करपलं तर त्याचा जळका वास दुधाला येतो, असे जळके दूध वापरण्यायोग्य रहात नाही. दूध जळून भांड्यांच्या तळाशी लागले की हे जळालेले दूध कशाच्याच उपयोगी नाही असे समजून अनेकजणी दूध फेकून देतात. अशा जळक्या दुधाचा वापर करुन जर कोणताही पदार्थ तयार केला तर त्या पदार्थाला देखील असाच जळका (Trick To Remove Smell From Burnt Milk) वास येतो. अशावेळी हे दूध फेकून देण्याऐवजी आपल्याकडे काहीच उपाय उरत नाही. परंतु आपण हे जळालेले दूध न फेकता काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून या जळक्या दुधाचा वास अगदी चुटकीसरशी घालवू शकतो. या टिप्स फॉलो केल्याने दुधाचा वास काही मिनिटांतच निघून जाईल(How to remove burning odour from milk).

करपलेल्या दुधाचा वास कसा दूर करावा ? 

१. सर्वात आधी हे करा :- जेव्हा आपल्या लक्षांत येते की आपले दूध करपले आहे तेव्हा सर्वात आधी गॅस बंद करुन हे दूध गॅसवरुन खाली उतरवून घ्या. त्यानंतर लगेच हे दूध एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात काढलेले हे दूध लगेच फॅनखाली किंवा थंड हवेच्या ठिकाणी ठेवू द्यावे. दूध दुसऱ्या भांड्यात हलवताना जळालेला थर दुसऱ्या भांड्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्या.यासाठी बारीक चाळणी किंवा कापडाच्या मदतीने दूध गाळून घ्या. जळलेल्या भागांचे कण दुधात राहिल्यास चमच्याने काढून टाका. दुधात बर्फाचे तुकडे घाला, थंडपणामुळे दुधाची उष्णता कमी होईल तसेच जळक्या दुधाचा वास देखील कमी होण्यास मदत मिळेल. 

फिल्टर नाही घरी, डोन्ट वरी! फिल्टर न वापरता ५ मिनिटांत करा फेसाळती फिल्टर कॉफी... 

२. साखर - वेलची घाला :- दूध उकळताना जळाल्यास त्यात साखर - वेलची घालावी. दूध उकळल्यानंतर त्यात साखर घालून गोडपणा आणि चव यांचे संतुलन  ठेवता येते. साखर जळालेल्या दुधाचा कडूपणा कमी करेल आणि ते चवदार बनवेल. तर वेलची घातल्याने दुधाला एक प्रकारचा सुवासिक आणि सुगंधी वास  येतो. वेलचीच्या सुगंधामुळे जळालेल्या दुधाचा वासही कमी होतो आणि त्याला चांगली चव येते.

३. बेकिंग सोडा मिक्स करा :- जळालेल्या दुधात बेकिंग सोडा घातल्यास जळका वास आणि चव कमी होऊ शकते. वास्तविक, बेकिंग सोडा दुधाचे अम्लीय गुणधर्म तटस्थ करते, ज्यामुळे चव सुधारू शकते. एवढेच नाही तर बेकिंग सोडाचा वापर दुधापासून येणारा कोणताही विचित्र वास कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो.

चपातीचा मोमो? १० मिनिटात करा भरपूर भाज्या घालून मो, भाजीपोळी होईल फस्त...

४. ब्रेड स्लाईसचा करा वापर :- ब्रेड स्लाइस जळणाऱ्या दुधाचा करपट वास आणि कडूपणा शोषून घेऊन दूध पूर्वीसारखे आहे तसेच करण्यास मदत करते. जर दुधात ब्रेडचे तुकडे घातले तर जळणारा वास आणि दुर्गंधी निघून जाईल. एवढेच नाही तर ब्रेडचे तुकडे दुधाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात. 

५. विड्याच्या पानांचा वापर :- विड्याच्या पानांचा (betel Leaf) वापर करून देखील आपण दुधाचा जळका वास घालवू शकतो. यासाठी करपलेले दूध दुसऱ्या एका स्वच्छ भांड्यात काढून घ्या आणि त्यात थोडी विड्याची पाने घाला. अर्ध्या तासासाठी ही पाने दुधात घालून ठेवा. हळूहळू दुधाचा करपट वास कमी होतो.

६. दालचिनीचा वापर करा :- दूध करपलं असेल आणि जळका, करपट वास येत असेल तर दालचिनीचा (Cinnamon) वापर करून हा वास घालवता येतो. यासाठी करपलेल्या भांड्यातील दूध दुसऱ्या स्वच्छ भांड्यात ओता. त्यानंतर दुसर्‍या एका भांड्यात एक चमचा तूप घाला आणि गरम करा. गरम झाल्यावर त्यात दालचिनीचे काही तुकडे घाला. ते जरा परतल्यानंतर त्यात दूध घाला आणि ढवळत राहा. हळूहळू करपट वास कमी होईल. मग हे दूध तुम्ही वापरू शकाल. तरीही ते दूध चहा किंवा खीर यामध्ये वापरण्याची इच्छा होत नसेल तर पुरी किंवा पराठ्याचे पीठ मळण्यासाठी याचा उपयोग करता येईल किंवा ते आटवून तुम्ही बासुंदी, रबडी बनवू शकता किंवा त्यापासून पनीरही बनवू शकता.

Web Title: How to remove burnt smell & taste from milk Smart hacks to fix burnt milk Trick To Remove Smell From Burnt Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.