Lokmat Sakhi >Food > नारळातून खोबरं काढणं होईल सोपं, २ भन्नाट ट्रिक्स! कष्ट विसरा- खोबरं मिळेल झटपट

नारळातून खोबरं काढणं होईल सोपं, २ भन्नाट ट्रिक्स! कष्ट विसरा- खोबरं मिळेल झटपट

How to remove coconut from shell; Easy 2 Tricks : नारळातून खोबरं बाहेर काढण्यासाठी लावा शक्कल; अवघड काम होईल सोपं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 03:22 PM2024-03-19T15:22:46+5:302024-03-19T15:23:30+5:30

How to remove coconut from shell; Easy 2 Tricks : नारळातून खोबरं बाहेर काढण्यासाठी लावा शक्कल; अवघड काम होईल सोपं..

How to remove coconut from shell; Easy 2 Tricks | नारळातून खोबरं काढणं होईल सोपं, २ भन्नाट ट्रिक्स! कष्ट विसरा- खोबरं मिळेल झटपट

नारळातून खोबरं काढणं होईल सोपं, २ भन्नाट ट्रिक्स! कष्ट विसरा- खोबरं मिळेल झटपट

ओल्या खोबऱ्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. त्याशिवाय ते पदार्थ पूर्ण होत नाही. तिखट असो किंवा गोड बऱ्याच पदार्थांमध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर करताच चव वाढते (Kitchen Tips and Tricks). काही लोकं खोबऱ्याचे किस वापरतात. तर काही खवून, तर काही त्याच वाटण तयार करतात. नारळ फोडणं, खोवणं कितीही किचकट काम असलं तरी, खोबऱ्याशिवाय पर्याय उरत नाही.

नारळ फोडण्यापासून ते खोबरं काढण्यापर्यंत खूप वेळ जातो (Coconut Shell). शिवाय मेहनत घेऊन ही प्रोसेस करावी लागते. जर आपल्याला मेहनत न घेता, काही मिनिटात नारळातून खोबरं काढायचं असेल तर, ही ट्रिक वापरून पाहा. या ट्रिकच्या मदतीने काही मिनिटात नारळातून खोबरं बाहेर येईल(How to remove coconut from shell; Easy 2 Tricks).

नारळातून खोबरं काढण्याची सोपी ट्रिक

- सर्वप्रथम, नारळाच्या शेंड्या काढून सोलून घ्या. नंतर नारळाच्या मध्यभागी हातोडा किंवा जाड वस्तूने झोरात मार द्या, आणि नारळातील पाणी एका वाटीमध्ये काढून घ्या. या ट्रिकने नारळाचे दोन भाग होतील.

चवळी भिजत न घालता, झणझणीत हॉटेलस्टाईल उसळ करण्याची सोपी कृती; १० मिनिटात उसळ तयार

- आता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर चाळण ठेवा, आणि चाळणीवर नारळ ठेऊन त्यावर प्लेट झाका. गॅस १० मिनिटांसाठी मध्यम आचेवर ठेवा. वाफ दिलेयाने नारळातून खोबरं काढणं सोपे होईल.

- १० मिनिटानंतर गॅस बंद करा, व त्यातून नारळ बाहेर काढून एका प्लेटमध्ये ठेवा. नारळ थंड झाल्यानंतर सुरी किंवा चमच्याच्या मदतीने नारळातून खोबरे बाहेर अलगद काढा. वाफेमुळे नारळातून खोबरं सहज बाहेर येईल.

नारळातून खोबरं काढण्याची दुसरी ट्रिक

मोजून १० सेकंदात करा अननसाचे सरबत, कसे-पाहा ही सोपी ट्रिक-उन्हाळा होईल गारेगार

नारळातून खोबरं काढण्यासाठी नारळ गॅसवर ठेवून साधारण २ मिनिटे भाजून घ्या. २ मिनिटानंतर भाजलेलं नारळ एका प्लेटवर ठेवा. नारळ थंड झाल्यानंतर, सुरीने नारळाच्या कडेतून खोबरं काढण्याचा प्रयत्न करा. या ट्रिकमुळेही नारळातून खोबरं बाहेर येईल.

Web Title: How to remove coconut from shell; Easy 2 Tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.