Lokmat Sakhi >Food > लसूण - कांदा चिरला की हाताला उग्र वास येतो ? ६ उपाय - कांदा लसणाचा वास होईल गायब एका मिनिटांत...

लसूण - कांदा चिरला की हाताला उग्र वास येतो ? ६ उपाय - कांदा लसणाचा वास होईल गायब एका मिनिटांत...

How to Remove Garlic Smell from Hands Fast : लसूण - कांदा कापल्यानंतर काही सिंपल ट्रिक्स वापरुन आपण काही मिनिटातच कांदा - लसणाचा हातांवर येणारा उग्र वास काढून टाकू शकतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 05:56 PM2023-11-17T17:56:20+5:302023-11-17T18:07:32+5:30

How to Remove Garlic Smell from Hands Fast : लसूण - कांदा कापल्यानंतर काही सिंपल ट्रिक्स वापरुन आपण काही मिनिटातच कांदा - लसणाचा हातांवर येणारा उग्र वास काढून टाकू शकतो...

How to Remove Garlic Smell from Hands Fast, 6 Tips That Work to Remove the Smell of Garlic from Your Hands | लसूण - कांदा चिरला की हाताला उग्र वास येतो ? ६ उपाय - कांदा लसणाचा वास होईल गायब एका मिनिटांत...

लसूण - कांदा चिरला की हाताला उग्र वास येतो ? ६ उपाय - कांदा लसणाचा वास होईल गायब एका मिनिटांत...

'लसूण' हा असा एक महत्वाचा घटक आहे, की तो रोजच्या स्वयंपाकात लागतोच. रोजची डाळ, भाजी, आमटी यांना खमंग फोडणी देण्यासाठी लसणाचा रोजच्या जेवणात आवर्जून वापर केला जातो. काही पदार्थ असे असतात की ज्यात लसूण घातल्याशिवाय त्या पदार्थांचा स्वाद वाढतच नाही. कोणत्याही पदार्थाला खमंग, चटपटीत फोडणी द्यायची म्हटलं की, लसूण हा आवर्जून वापरला जातोच(How to Remove the Garlic Smell from Your Hands).

'लसूण' हा जरी आपण रोजच्या जेवणात वापरत असलो तरीही, तो सोलणे हे कंटाळवाणे काम असते. कांदा व लसूण हे रोजच्या जेवणात वापरले जाणारे उग्र वासाचे पदार्थ आहेत. कांदा व लसणाचा वास हा इतका उग्र येतो की, ते कापल्यानंतर त्याचा वास हाताला सारखाच येत राहतो. असा लसूण व कांद्याचा वास हा हाताला दिवसभर येतच राहतो. या हाताला येणाऱ्या उग्र वासाने आपल्याला नकोसे होते. काहीवेळा आपण हा हाताला येणारा उग्र वास घालवण्यासाठी (6 Hacks for Getting Garlic Odors Off Our Fingers ) अनेक उपाय करुन बघतो. कित्येक उपाय करूनही हा हाताला येणारा लसणाचा वास काही जात नाही. इतकेच नाही तर भरपूर प्रमाणात लसूण कापल्यानंतर हातांची जळजळ किंवा आग व्हायला लागते, असे होऊ नये म्हणून काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(6 Tips That Work to Remove the Smell of Garlic from Your Hands).

लसूण कापल्यानंतर त्याचा उग्र वास हाताला येऊ नये म्हणून... 

१. लसूण कापल्यानंतर त्याचा उग्र वास हा हाताला कायम येत राहतो. असा उग्र वास हाताला येऊ नये म्हणून मास्टरशेफ पंकज भदौरिया एक सोपा उपाय सांगत आहेत. भरपूर प्रमाणांत लसूण कापल्यानंतर त्याचा उग्र वास हाताला येऊ नये म्हणून आपण एक सोपा उपाय करु शकतो. हातांना येणारा हा लसणाचा उग्र वास घालवण्यासाठी आपण आपले हात कोणत्याही स्टीलच्या भांड्यावर २ ते ३ मिनिटांसाठी घासू शकता. स्टीलच्या भांड्यावर हात घासून घेतल्याने हाताला येणारा लसणाचा उग्र वास चुटकीसरशी नाहीसा होण्यास मदत मिळते. 

२. बेकिंग सोडा आणि पाणी वापरून घट्टसर पेस्ट तयार करा. आपल्या हातांना ही पेस्ट लावा आणि पाण्याने धुण्यापूर्वी एक किंवा दोन मिनिटे आपले हात घासून घ्यावेत. बेकिंग सोडा दुर्गंधी कमी करण्यास मदत करतो आणि लसूण किंवा कांद्याचा वास दूर करण्यात प्रभावी ठरू शकतो.

उरलेल्या चिवड्यापासून बनवा, खमंग - खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या कचोऱ्या, टी टाईम स्नॅक्ससाठी बेस्ट पर्याय...

३. हातांना येणारा लसणाचा वास घालवण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा देखील वापर करु शकता. यासाठी ताज्या लिंबाचा रस काढून घेऊन तो रस हातांवर घेऊन चोळावा, लिंबाच्या रसातील नैसर्गिक ऍसिड हाताला येणारा लसणाचा तीव्र गंध दूर करण्यास मदत करतात.

गारठ्याच्या थंडीत घरगुती आवळा कँडी खाऊन ठेवा स्वतःला फिट अँड फाईन, घ्या आवळा कँडीची सोपी रेसिपी...

मुळ्याला येणारा उग्र वास, कडवटपणा - तिखटपणा होईल मिनिटांत दूर, सोपे ४ उपाय...मुळाही खाल आवडीने...

४. हाताला लसणाचा वास येत असेल तर एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर घेऊन हात चांगले चोळा. काही वेळाने हात पाण्याने धुवा, वास नाहीसा होईल.

रोजच्या आहारातील हे ६ पदार्थ शिजवून खाणे टाळाच, त्यातील पोषणमूल्य होईल कमी...

५. हातांना येणारा लसणाचा उग्र वास घालवण्यासाठी हातांना अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर लावा आणि त्याने हात एकमेकांवर घासून घ्या. अल्कोहोल गंध निर्माण करणारी संयुगे विरघळण्यास आणि काढून टाकण्यास मदत करू शकते.

६. हातांना येणारा लसणाचा उग्र वास घालवण्यासाठी, हातांना अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर लावावे आणि हात एकमेकांवर घासून घ्यावे. अल्कोहोल गंध निर्माण करणारी संयुगे विरघळण्यास आणि काढून टाकण्यास मदत करू शकते.

Web Title: How to Remove Garlic Smell from Hands Fast, 6 Tips That Work to Remove the Smell of Garlic from Your Hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.